श्रीमद्भगवद्गीता - अध्याय पहिला

  श्री परमात्मने नमः यथार्थ गीता

(श्रीमद्भगवद्गीता)

॥ अथ प्रथमोऽध्यायः ॥

अध्याय पहिला

धृतराष्ट्र उवाच

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥१॥

धृतराष्ट्राने विचारले, “हे संजया, धर्मभूमी अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पाण्डूच्या पुत्रांनी काय केले ?"

अज्ञानरूपी धृतराष्ट्र आणि संयमरूपी संजय ! अज्ञान हे मनाच्या अंतरंगात वसत असते. या अज्ञानात मन गुरफटले जाते. धृतराष्ट्र हा जन्मांध आहे; परंतु संयमरूपी संजयाच्या माध्यमातून तो कुरुक्षेत्रावरील घडामोडी पाहू शकत आहे, ऐकू शकत आहे. त्याला निश्चित माहीत आहे की परमात्मा हेच एकमेव सत्य आहे; परंतु त्याचा मोहरूपी पुत्र दुर्योधन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचे लक्ष कौरवांवर म्हणजेच पर्यायाने विकारांवर केंद्रित झाले आहे.

धर्म हे एक पवित्र क्षेत्र आहे. जेव्हा हृदयरूपी देशात दैवी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा हे शरीर धर्मक्षेत्र बनते. आणि जेव्हा येथे आसुरी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा तेच शरीर कुरुक्षेत्र बनते. 'कुरु' म्हणजे 'करा' हा शब्द आदेशात्मक आहे. श्रीकृष्ण म्हणतात-" प्रकृतीतून निर्माण होणाऱ्या त्रिगुणांनी प्रवृत्त होऊन, मनुष्य कर्म करीत असतो. तो क्षणमात्रही कर्माशिवाय राहू शकत नाही". ते गुण त्याच्याकडून कर्म करवून घेत असतात. तो झोपलेला असला तरी त्याचे कर्म चालूच असते. अर्थात ते कर्म म्हणजे शरीर निरोगी ठेवण्याचा तो एक प्रकारचा आहारच आहे. हे तिन्ही गुण मनुष्याला देवापासून क्षुद्र किड्यापर्यंत देहबद्ध करीत असतात. जोपर्यंत प्रकृती व प्राकृतीपासून उत्पन्न होणारे तिन्ही गुण अस्तित्वात आहेत, तोपर्यंत 'कुरु-करा' चालूच राहील व म्हणून जन्ममृत्यूचे क्षेत्र, विकारांचे क्षेत्र हे कुरुक्षेत्र आहे व परम श्रेष्ठ परमात्म्यात प्रवेश देणारे, विलीन करणारे पुण्यशील प्रवृत्तींचे (पांडव) क्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र आहे.

पुरातत्त्ववेते पंजाब, काशी, प्रयाग, मध्यप्रदेश तसेच इतरही अनेक I ठिकाणी कुरुक्षेत्राचा शोध घेत आहेत. परंतु गीताकार श्रीकृष्णाने स्वतःच युद्ध कोठे झाले ते सांगितले आहे- 'इदं शरीर कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते ।' "हे अर्जुना, हे शरीर हेच क्षेत्र आहे आणि जो हे जाणतो, त्याची मर्यादा समजतो तो क्षेत्रज्ञ आहे." पुढे त्यांनी या क्षेत्राची व्याप्ती सांगितली आहे. त्यात दहा इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, पाच विकार आणि त्रिगुणांचे वर्णन केले आहे. शरीर हेच क्षेत्र आहे, एक आखाडा आहे. त्यात परस्परांशी झुंजणाऱ्या-झगडणाऱ्या दोन प्रवृत्ती आहेत. एक दैवी संपत्ती व दुसरी आसुरी संपत्ती-पाण्डवरूपी सत् प्रवृत्ती व कौरवरूपी असत्-दुष्ट प्रवृत्ती.

अनुभवी महापुरुषाला शरण गेल्यानंतर या दोन्ही प्रवृत्तींमधील संघर्ष संपुष्टात येतो. हा क्षेत्र व क्षेत्रज्ञामधील संघर्ष आहे आणि हाच वास्तविक लढा आहे, युद्ध आहे. विश्वयुद्धांनी इतिहासाची पाने भरून गेलेली आहेत. परंतु त्या युद्धांत विजयी झालेल्या पक्षालासुद्धा शाश्वत विजय मिळू शकला नाही. जय-पराजय हे बदल असतात. प्रकृतीचे संपूर्णपणे शमन करून, तात्पुरते प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या सत्तेचे दर्शन घेणे, ज्ञान मिळवणे व त्यात प्रवेश करणे हा वास्तविक विजय आहे. हा एक असा विजय आहे की ज्याच्या नंतर कधीही हार नाही पराजय नाही. हीच खरी मुक्ती आहे की जिला जन्ममृत्यूचे बंधन नाही.

या प्रकारे अज्ञानाने प्रभावित असणारे प्रत्येक मन संयमाच्या द्वारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या युद्धात काय झाले हे जाणू शकते. अर्थात संयम जेवढा जागृत होईल त्याच प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होईल.

संजय उवाच

यूवा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।

आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् ।।२।।


संजय म्हणाला पाण्डवांचे सैन्य व्यूहरचनेने उभे राहिलेले पाहताच, राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन असे म्हणाला

द्वैतभावाचे आचरण म्हणजेच “दोणाचार्य". जेव्हा परमात्म्यापासून आम्ही अलग झालो आहोत, वेगळे झालो आहोत याची जाणीव होते (हेच द्वैतभावाचे ज्ञान होय ) तेव्हा त्या भगवंताच्या प्राप्तीची तळमळ, अभिलाषा मनात निर्माण होते. त्यामुळे गुरूची आवश्यकता वाटून आम्ही गुरुचा शोध घेऊ लागतो. दोन प्रवृत्तींमधील प्रथम गुरू हाच असतो ज्याचा शोध घेतो; परंतु त्यानंतरचे सद्गुरु योगेश्वर श्रीकृष्ण हेच असतात जे योगसिद्ध आहेत.

राजा दुर्योधन आचार्यांच्या जवळ जातो. मोहरूपी दुर्योधन! मोह हे सर्व व्याधींचे मूळ आहे. मुख्य कारण आहे. दुर्योधन दुर् म्हणजे दोषयुक्त, योधन म्हणजे आत्मिक दूषित संपत्ती असे धन, आत्मिक संपत्ती हीच स्थिर शाश्वत संपत्ती आहे. तिच्यात जो दोष निर्माण करतो तोच मोह असतो. तो मनुष्याला प्रकृतीकडे खेचत असतो तसेच तो वास्तव ज्ञान प्राप्त करून घेण्याची प्रेरणाही देत असतो. मोह असतो तोपर्यंत प्रश्न शिल्लक असतात, मोह संपला की मग सर्व पूर्णच असते.

व्यूहरचनायुक्त पांडवांचे सैन्य पाहून म्हणजेच पुण्यशील सत् प्रवृत्तीचा जमाव संघटन पाहून दुर्योधन गुरू द्रोणांच्या जवळ जाऊन उपहासाने म्हणाला

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् । व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ।।३।।

आचार्य, दुपदाचा पुत्र आणि तुमचा बुद्धिमान शिष्य धृष्टद्युम्न याने व्यूह रचना केलेली ही मोठी पाण्डवसेना पहा.

शाश्वत व स्थिर परमात्म्यावर श्रद्धा असणारा, दृढ मनोबळ असणारा तो धृष्टद्युम्न ! तोच पुण्यशील प्रवृत्तींचा नेता आहे, प्रमुख आहे. 'साधन कठिन न मन कर टेका' नुसते साधन बळकट असून उपयोग नाही तर मनाची सिध्दता बळकट असली पाहिजे. मनोनिग्रह असला पाहिजे.

आता सेनेचा विस्तार बघा

अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि । युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ।।४।।

या सेनेत 'महेष्वासा'- महान अशा ईश्वराच्या ठिकाणी आश्रय देणारे, भावरूपी भीम, अनुरागरूपी 'अर्जुना' सारखे अनेक शूर वीर, जसे सात्विकतारूपी 'सात्यकी', चराचरात सर्वत्र ईश्वर भरून राहिलेला असे ईश्वराचे विराटत्व सुचवणारा विराट, तसेच अचल-स्थिर स्थितीचे द्योतक असा महारथी राजा द्रुपद

षष्टकेतुश्चेकितानः कशीराजश्च वीर्यवान । पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुड्वः ।।५।।

'धृष्टकेतुः' - कर्तव्यात दृढ असणारा, 'चेकितान' स्वैरभैर भटकणाऱ्या मनाला लगाम घालून योग्य स्थळी मन स्थिर ठेवणारा, काशिराजाः' - कायारूपी काशीमध्येच साम्राज्य आहे 'पुरुजित्'- स्थळ, सक्ष्म व कारण अशा शरीरावर विजय मिळवून देणारा, 'कुन्तिभोजः' - कर्तव्याच्या सहाय्याने मृत्युलोकावर विजय मिळवणारा, सर्व मनुष्यांमध्ये श्रेष्ठ, शैब्य' - म्हणजे सत्य व्यवहार.

युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्। सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एक महारथाः ॥६॥

युद्धाला आवश्यक मनोधारणा असणारा पराक्रमी 'युद्धामन्यु' ज्याच्याजवळ उत्तम प्रकारचे ओज आहे, तेज आहे असा उत्तमौजा' भक्कम आधार, पाठबळ मिळाले की मन निर्भय बनते, अशा भक्कम आधारामुळे जो निर्भय आहे असा सुभद्रपुत्र अभिमन्यु. ध्यानरूपी द्रौपदीचे पाच पुत्र वात्सल्य, लावण्य, सहृदयता, सौम्यता व स्थिरता हे सर्वजण थोर महारथी आहेत. साधनेच्या मार्गावर वाटचाल करण्याची त्यांची संपूर्ण योग्यता आहे, क्षमता आहे.

अशा प्रकारे पांडवांच्या पक्षातील दैवी संपत्तीने युक्त असणाऱ्या पंधरा वीस योद्धयांची नावे दुर्योधनाने घेतली. असत् प्रवृत्तीचा राजा असूनही 'मोहा' मुळेच सत् प्रवृत्ती समजणे शक्य होते. 'मोह' तसे करण्याला बाध्य करतो.

त्यानंतर स्वतःच्या पक्षातील योद्धयांविषयी तो संक्षेपाने द्रोणाचार्यांना सांगतो. जर बाह्य युद्ध असेल तर आपल्या फौजेची बढाई त्याने मारली असती. येथे विकार कमी सांगितले गेले; कारण विकार नाशवंत असतात व त्यांच्यावर विजय प्राप्त करावयाचा आहे. फक्त सहा-सात विकारच त्याने सांगितले की ज्यांच्या अंतरंगात संपूर्ण बहिर्मुखी प्रवृत्तीचा वास आहे. जसे

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य सज्ञार्थं तान्द्रवीमि ते ।।७।।

हे द्विज श्रेष्ठा, आता आमच्या सैन्यात जे जे प्रमुख आहेत, जे माझ्या सैन्याचे अधिकारी आहेत त्यांची नावे आपल्याला कळण्यासाठी सांगतो; ते आपण ऐकून घ्या, जाणून घ्या.

बाह्य युद्धात सेनापतीला द्विज श्रेष्ठ म्हणून संबोधणे समयोचित नाही. वास्तविक गीता म्हणजे अंतःकरणातील दोन प्रवृत्तीचा संघर्ष आहे व तेथे द्वैत वृत्तीच्या आचरणाचे प्रतीक म्हणजे गुरू द्रोण आहेत. जोपर्यंत आम्ही आमच्या आराध्यापासून लेशमात्रही अलग असतो तोपर्यंत तेथे प्रकृती विद्यमान असते, द्वैतभाव उपस्थित असतो. या 'द्वि' वर विजय मिळवण्याची प्रेरणा आम्हाला गुरू द्रोणाचार्यापासून मिळत असते. आमचे अर्धवट अपूर्ण ज्ञानच आम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त करण्याची प्रेरणा देत असते. ते पूजास्थल नाही, मंदिराचे प्रांगण नाही. ती युद्धभूमी आहे. तेथे शौर्यसूचक संबोधन असायला हवे.

आता असत् प्रवृत्तीचे प्रमुख कोण कोण आहेत? भवान्मीष्मश्च कर्णश्च कृपश्च समिर्तिजयः। अत्यामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च।।८।।

एक तर स्वतः आपण (द्वैतभावाचे आचरणरूपी द्रोणाचार्य) आहात. भ्रमरूपी संदेहरूपी पितामह भीष्म' आहेत. भ्रम हे या विकारांचे उद्गम स्थान आहे आणि अंतापर्यंत तो जिवंत रहात असतो; म्हणून तो पितामह आहे. सर्व सेना मरून गेली तरी हा जिवंत होता. शरशय्येवर निश्चेतन अवस्थेत पडून होता; पण तरीही तो जिवंत होता. म्हणून भीष्म हा भ्रमरूप आहे. या प्रमाणेच असत् कर्मरूपी कर्ण व संग्रामात सदैव विजयी होणारे 'कृपाचार्य' ( आमच्या पक्षात ) आहेत. साधनेच्या अवस्थेत साधकाकडून घडणारे कृपेचे आचरण म्हणजेच कृपाचार्य होय. परमेश्वर कनवाळू आहे, तो कृपेचे घाम आहे. त्याच्या प्राप्तीनंतर संताचे स्वरूपही असेच कनवाळू बनते. परंतु या साधनेच्या कालात जोपर्यंत आम्ही परमेश्वरापासून अलग राहतो, तोपर्यंत तोही आमच्यापासून दूरच असतो, अलग असतो. असत् प्रवृत्ती जिवंत असते, ती मोहाने गुरफटलेली असते. अशा परिस्थितीत साधक जर कनवाळूपणाने वागला तर तो नष्ट होऊन जातो.

सीतेने दया दाखवली; त्यामुळे तिला काही काळ लंकेत राहून प्रायश्चित करावे लागले. विश्वामित्र क्षणभर दयाद्र बनले त्यामुळे त्यांना पतीत व्हावे लागले. योग सूत्रकार महर्षि पतंजलीही म्हणतात ते समाधावुपसगि व्युत्थाने सिद्धयः' (३/३७). व्युत्थान कालात ( समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर) सिद्धी प्रकट होतात. वास्तविक त्या सिद्धी आहेत. परंतु काम, क्रोध, मोह या विकारांइतक्याच कैवल्य प्राप्तीमध्ये त्या अडसररूप विघ्नरूप

आहेत. गोस्वामी तुलसीदासांचेही असेच आहे. विघ्न अनेक करइ तब माया ।।

छोरत ग्रन्थि जानि खगराया।

रिद्धि सिद्धि प्रेरइ बहु भाई। बुद्धिहि लोभ दिखावहिं आई ।।

( रामचरितमानस)

माया अनेक विघ्ने, अडचणी निर्माण करत असते. ती साधकाला अनेक सिद्धि प्रदान करते. साधकाला ती सिध्द बनवते. असा सिद्धी प्राप्त झालेला साधक मरणासन्न मनुष्याच्या जवळून गेला तरी तो मनुष्य उठून उभा राहील; एवढी सिद्धी त्याला प्राप्त होते. अर्थात तो मनुष्य भले जिवंत झाला; पण साधकाने ते स्वतःचे सामर्थ्य समजले तर तो नष्ट होऊन जाईल. एक रोगी बरा झाला की त्याच्या जागी अनेक रोगी जमतील. त्यामुळे भजन-चिंतनामध्ये खंड पडेल व साधक त्यामुळे इतका बहकत जाईल की प्रकृतीचे बाहुल्य वाढून तो प्रकृतीच्या पाशात अडकला जाईल. जर लक्ष्य दूर असेल आणि जर साधकाने कृपाळूपणा केला तर त्याच्या त्या कृपेच्या आचरणामुळे 'समितिंजय' ( संग्रामात सदैव विजयी होणारी ) अशा सर्व सेनेवर तो विजय मिळवू शकेल व म्हणूनच जोपर्यंत लक्ष्यपूर्ती होत नाही तोपर्यंत साधकाने अत्यंत सतर्क, सावध राहिले पाहिजे. 'दया बिनु सन्त कसाई, दया करी तो आफत आई। परंतु अपूर्ण अवस्थेत ही दया म्हणजे ज्याचे दमन करण्यास अशक्य अशा असत् प्रवृत्तीच्या दुर्धर्ष योद्धयासारखी आहे. या प्रकारे आपल्या पक्षात आसक्तीरूपी आश्वत्थामा आहे, विकल्परूपी विकर्ण आहे व भ्रममयी श्वासासारखा असणारा भुरिश्रवा आहे. हे सर्व बहिर्मुखी प्रवाहाचे मुख्याधिकारी आहेत.

अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।

नानाशस्त्र प्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ।।९।।

माझ्यासाठी जीवावर उदार झालेले, अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज व युद्धात कुशल असणारे पुष्कळ वीर येथे युद्धासाठी सिद्ध झालेले आहेत. ते सर्व माझ्यासाठी आपले प्राण द्यायलाही तयार आहेत. अर्थात, ते निश्चितपणे किती आहेत हे सांगता येणार नाही. आता कोणती सेना कोणामुळे सुरक्षित आहे? यावर दुर्योधन म्हणतो

अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् । पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ।।१०।।

भीष्माने रक्षण केलेली आमची सेना अफाट सेना असून ती अजिंक्य

आहे. तर भीमाने रक्षण केलेली पांडवांची सेना जिंकण्यास सोपी असून ती पर्याप्त म्हणजे मोजकी आहे. येथे 'पर्याप्त' व 'अपर्याप्त' हे क्लिष्ट दुर्बोध शब्द दुर्योधनाच्या मनातील शंका-संदेह व्यक्त करीत आहेत. आता ज्यांच्यावर कौरवांची भीस्त आहे ते पितामह भीष्म म्हणजे कोणती सत्ता आहे ? तसेच ज्याच्यावर पांडव अवलंबून आहेत तो भीम म्हणजे कोणती सत्ता आहे हे पहावयाचे आहे. यानंतर दुर्योधन सेनेला सूचना देताना सांगत आहे.

अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः । भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ।।११।।

तेव्हा सेनाव्यूहरचनेत आपापल्या मोक्याच्या जागी उभे राहून आपण सर्वांनी मिळून भीष्माचार्यांचेच रक्षण केले पाहिजे. जर भीष्माचार्य जिवंत राहतील तरच आम्ही अजिंक्य राहणार आहोत. तेव्हा पांडवांशी लढण्यापेक्षा तुम्ही फक्त भीष्माचार्यांचेच रक्षण करावे. जो स्वतःचे रक्षण करू शकत नाही, ज्याच्या रक्षणाचा भार कौरवांना उचलावा लागत आहे, त्या भीष्माला योध्दा कसे म्हणावे ? तो कसला योध्दा ? पण येथे भीष्म म्हणजे भ्रम, विपरीत ज्ञान, संदेह भ्रांती. भीष्म म्हणजे हाडामांसाचा योद्धा नव्हे. म्हणून भीष्म म्हणजे भ्रम भ्रांती जोपर्यंत टिकून आहे, तोपर्यंत विजातीय म्हणजे दुष्ट प्रवृत्ती अजिंक्य आहेत, अजेय आहेत. अर्थात 'अजेय' म्हणजे ज्याला जिंकताच येत नाही. असा नव्हे तर अजेय म्हणजे दुर्जय, म्हणजेच कष्टाने ज्याला जिंकता येते असा.

महा अजय संसार रिपु, जीति सकइ सो बीर।।

(रामचरितमानस, ६/८० क )

जेव्हा भ्रम किंवा भ्रांती नाहीशी होते तेव्हा अज्ञान संपूर्णपणे नष्ट होते. ते अस्तित्वहीन बनते. आणि आंशिकरूपाने उरलेले मोह वगैरे रिपूही शीघ्र नाहीसे होतात. भीष्माची इच्छा होती इच्छामरण! पण इच्छा म्हणजेच भ्रांती. इच्छेचा अंत व भ्रम नष्ट होणे या दोन्ही गोष्टी एकच आहेत. ही गोष्ट संत कबीराने अगदी सोप्या शब्दांत सांगितली आहे.

इच्छा काया इच्छा माया, इच्छा जग उपजाया।

कह कबीर जे इच्छा विवर्जित, ताका पार न पाया।।

जेथे भ्रम भ्रांती नसते, तो अमर्याद व अव्यक्त असतो. हे शरीर निर्माण होण्याचे कारणही इच्छा हेच आहे. इच्छा म्हणजेच माया आहे आणि इच्छा हीच जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे. ('सोऽकामयत् तदैक्षत बहुस्यां प्रजायेय इति' छान्दोग्य ६/२/३). कबीर म्हणतात, जे संपूर्णत: निरिच्छ आहेत, तिनका पार न पाया'- ते अपार, अनंत व असीम अशा परमात्म स्वरूपात प्रवेश मिळवू शकतात. ('योऽकामो निष्काम आप्तकाम आत्मकामो न तस्य प्राणा उत्क्रामन्ति ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति ।' (बृहदारण्यक ४/४/६) जे कामनारहित आहेत, जे आत्म्यामध्ये स्थिर म्हणजे आत्मस्वरूप बनले आहेत, त्यांचे कधीच पतन होत नाही. ते ब्रह्माशी एकरूप होऊन जातात. सुरुवातीला इच्छा अनंत असतात. पण अनंत-अपार अशा परमेश्वरप्राप्तीची इच्छा मात्र बाकी असते. परंतु जेव्हा परमेश्वरप्राप्तीची इच्छाही पूर्ण होते, तेव्हा इच्छाही शिल्लक राहत नाही. जर यापेक्षाही मोठी किंवा श्रेष्ठ अशी दुसरी कोणती वस्तू असती तर तुम्ही तिच्या प्राप्तीची इच्छा नक्की ठेवली असती. जर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अशी दुसरी कोणती वस्तूच नाही तर मग कशाची इच्छा करणार? जेव्हा प्राप्त होण्यासारखी वस्तूच शिल्लक रहात नाही, तेव्हा इच्छेचे तेथून समूळ उच्चाटण होते आणि इच्छा नष्ट होताच भ्रांतीही समूळ नष्ट होते. हेच भीष्माचे इच्छामरण आहे. म्हणून दुर्योधन म्हणतो की, भीष्माकडून रक्षित असणारी आमची सेना अजेय आहे. सारांश जोपर्यंत भ्रांती अ तोपर्यंत अज्ञानाचे अविद्येचे वास्तव्य असते. भ्रांती नष्ट होताच अज्ञानही नाहीसे होते.

भीम म्हणजे भावरूप आहे. त्याच्याकडून रक्षण केली गेलेली पांडवांची सेना जिंकण्यास सुलभ आहे. 'भावे विद्यते देव:'- अविदित परमेश्वराला विदित - ज्ञात करण्याचे सामर्थ्य क्षमता भावामध्ये आहे. 'भाव वस्य, भगवान, सुख निधान करूना अयन' ( रा. मानस ७ / ९२ ख ). श्रीकृष्णाने या भावालाच श्रद्धा म्हटले आहे. या श्रद्धेमध्ये परमेश्वराला वश करण्याचे सामर्थ्य असते. या भावातून, श्रद्धेतूनच संपूर्ण पुण्यमय प्रवृत्तीचा विकास होतो. हा भावच पुण्याचे संरक्षण करतो. ही श्रद्धा, हा भाव इतका सामर्थ्यवान आहे की, परमदेव परमात्म्याला तो जन्म घ्यायलाही भाग पाडतो. परंतु

त्याबरोबरच हा भाव इतका नाजूक असतो की, आज भाव आहे तर उद्या त्याचे अभावात परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. कारण इच्छिलेल्या म्हणजे इष्ट गोष्टीत थोडी जरी त्रुटी जाणवली की भाव-श्रद्धा डळमळू लागते, पुण्यमय सात्विक प्रवृत्ती विचलित होते व 'इष्ट' शी संबंध दुरावला जातो. व म्हणून भीमाकडून रक्षण केली जाणारी पांडवांची सेना जिंकणे सोपे आहे. महर्षि पंतजलीचेही हेच म्हणणे आहे- 'स तु दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारासेविंतो दृढभूमि:'( १/१४) दीर्घकालपर्यंत निरन्तर श्रद्धा व भक्तिपूर्वक केलेली गोष्टच दृढ भक्कम होऊ शकते.

तस्य सञ्जनयन्हवं कुरुवृद्धः पितामहः । सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ।।१२।।

अशा प्रकारे प्रत्येकाने आपापल्या शक्तीप्रमाणे शंख फुंकले. हा शंखध्वनी म्हणजे त्या त्या वीरांनी आपल्या शक्तीप्रमाणे केलेली पराक्रमाची घोषणा होती. कुरुवंशातील महान पराक्रमी पितामह भीष्मांनी दुर्योधनाला आनंद व्हावा म्हणू सिंह गर्जनेप्रमाणे मोठ्या जोराने आपला शंख फुंकला. हा ध्वनी फार भयावह होता. सिंह म्हणजे भयाचेच प्रतीक; निबीड जंगलात एकांत स्थळी या सिंहाची गर्जना आपल्या कानावर पडली; तर सिंह आपल्यापासून कितीतरी मैल लांब असला तरी भीतीने आपल्या हृदयाचा थरकाप होतो व भयाने शरीरावर सरसरून काटा उभा राहतो, शरीर भीतीने कापू लागते. आपली अशी दशा होण्याचे कारण काय? कारण सिंहाविषयीचे भय आपल्या मनात दडून बसलेले असते. म्हणजे हे भय आपल्या प्रकृतीमध्ये असते, परमात्म्याच्या ठिकाणी नसते. कारण परमात्मा म्हणजे निर्भयतेचे साम्राज्य! जर भ्रमरूपी भीष्माचार्य विजयी होणार असतील तर आपण ज्या मायारूपी जंगलात भरकटत आहोत ते जास्तच भरकटले जाऊन भयाची मात्रा वाढेल, भयाचे काळोखी आवरण अधिक दाट होईल, भयाची तीव्रता वाढेल. भयाचा अंध:कार मनात अधिक दाटेल, भय भयाशिवाय आपल्याला दुसरे काही देऊ शकत नाही. तेव्हा या प्रकृतीपासून निवृत्त होणे हाच खरा मोक्षाचा मार्ग आहे. ही माया (प्रकृती ) म्हणजे घोर अंध:काराची पडछाया आहे. कौरव म्हणजे या मायेचे प्रतीक ! ते भयाशिवाय दुसरे काही देऊ शकणार नाहीत. त्यामुळे कौरवांच्या सैन्यात सर्व रणधुरंधरांची रणवाद्ये एकदम वाजली तरी भयाशिवाय दुसरे काहीही उत्पन्न झाले नाही. लक्षात ठेवा की प्रत्येक विकाराच्या मुळाशी काही ना काही भय असतेच! म्हणून त्यांनी आपली रणवाद्ये जोरजोराने फुंकून घोषणा केली.

ततः शङ्खा मेट पणवानकगोमुखाः ।

सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ।।१३।।

त्यानंतर शंख, नगारे, तुताया, ढोल, रणशिंग ही रणवाद्ये एकदम वाजविली गेली, तेव्हा त्यांचा फारच मोठा आवाज झाला. त्यामुळे वातावरण भयावह झाले व पांडव सेनेत भय उत्पन्न करणे हाच तर कौरवांचा उद्देश होता. अशाप्रकारे दुष्ट प्रवृत्तीचे बाह्य आक्रमण सफल झाल्यावर मोहमय बंधन अधिक घट्ट मजबूत बनते.

यानंतर पुण्यप्रवृत्तीच्या पांडव सेनेत रणवाद्ये फुंकली गेली यात पहिला मान योगेश्वर श्रीकृष्णाला दिलेला होता.

ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।

माधवः पाण्डवश्चैव दिव्यी शौ प्रदष्मतुः ।।१४।।

पांढऱ्या शुभ्र घोड्यांनी युक्त असणाऱ्या (येथे पांढरा रंग सात्विक व निर्मलतेचे प्रतीक आहे)- 'महति स्यन्दने' म्हणजे महान रथावर आरूढ झालेल्या योगेश्वर श्रीकृष्णाने व अर्जुनाने आपापले अलौकिक शंख फुंकले. येथे अलौकिक या शब्दाचा अर्थ आहे सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ! मृत्युलोक, देवलोक, ब्रह्मलोक व जेथे जेथे जन्ममृत्यूचे भय आहे त्या सर्व लोकांपेक्षा श्रेष्ठ अशी पारलौकिक व पारमार्थिक स्थिती प्रदान करणे हा योगेश्वर कृष्णाच्या घोषध्वनीचा अर्थ आहे. ह्या योगेश्वराचा रथ सोन्याचांदीचा किंवा लाकडाचा नाही तर तो रथ अलौकिक आहे, त्याचा शंख अलौकिक आहे त्यामुळे त्याचा घोषध्वनीही अलौकिकच आहे. लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे

पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः। पौण्ड दम्मी महाशई भीमकर्मा बृकोदरः ।। १५ ।।

'हृषिकेश' जो हृदयाचा जाणता आहे, स्वामी आहे त्या कृष्णाने 'पांचजन्य' शंख फुंकला आणि पाच ज्ञानेंद्रियांना त्यांच्या (शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध) गुणांसह वश करून ( तो निग्रह) आपल्या भक्तगणांना प्रदान करण्याचा घोष श्रीकृष्णाने केला. विक्राळ रूपात बंड करणाच्या इंद्रियांना वश करून आपल्या भक्तांना इंद्रियनिग्रहाची देणगी सद्गुरूच देत असतो आणि योगेश्वर श्रीकृष्ण हे महान सद्गुरू होते. शिष्यस्तेऽहं' भगवन! मी आपला शिष्य आहे. तेव्हा ब्राह्य विषय उपाथी इकडे लक्ष जाऊ न देता इष्ट गोष्टीवरच लक्ष केंद्रित होऊ दे. अयोग्य असे काहीही माझ्या कडून पाहिले जाऊ नये, ऐकले जाऊ नये किंवा स्पर्शिले जाऊ नये. अर्थात या सर्व गोष्टी सद्गुरूवरच अवलंबून असतात.

'देवदत्त धनंजयः', दैवी संपत्ती आपल्या काबूत ठेवणारा अनुराग म्हणजेच अर्जुन होय. येथे अनुराग म्हणजे यथोचित, इष्ट असणाऱ्या गोष्टीबद्दल प्रेम असणे यात विरह, वैराग्य, अश्रुपात याही गोष्टीचा समावेश होतो. 'गदगद् गिरा नयन वह नीरा' रोमांचक गोष्टीही यात येतात, पण येथे विषयवासनेला, विकाराला लेशमात्र शिरकाव असत नाही. जर हा अनुराग यशस्वी झाला तर प्रत्यक्ष परमात्म्यात प्रवेश देणाऱ्या दैवी संपत्तीवर तो अधिपत्य प्राप्त करू शकतो. याचेच दुसरे नाव धनंजय आहे. घन म्हणजे दौलत, संपत्ती यामुळे शरीराचा उदरनिर्वाह व इतर गरजा पूर्ण होत असतात. पण या बाह्य संपत्तीचा आत्म्याशी काहीच संबंध नसतो. या संपत्तीपेक्षा आत्मिक संपत्ती हीच खरी स्वतःची संपत्ती आहे. बृहदआरण्यक उपनिषदात याज्ञवल्क्याने मैत्रेयीला समजवताना हेच सांगितले की, पृथ्वीचे स्वामित्व जवळ असले तरी त्यामुळे अमृतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. ते प्राप्त करण्यासाठी आत्मिक संपत्तीच जवळ असणे आवश्यक आहे. तोच त्यावर एकमेव असे फक्त एक ब्रह्म तेवढे आहे. सरळ त्या ब्रह्माशी संपर्क साधून देणे हा श्रीकृष्णाच्या घोषध्वनीचा अर्थ आहे. परंतु ही स्थिती श्रीकृष्ण कशा प्रकारे प्रदान करतील? उपाय आहे.

यानंतर भयावह, अचाट कर्म करणाऱ्या भीमाने पौण्ड म्हणजे प्रीती नावाचा महाशंख फुंकला. प्रीती म्हणजेच भाव-प्रेम ! त्याचा उद्गम व निवास हृदय असते. म्हणूनच भीमाला वृकोदर असे म्हणतात. हे प्रेम, हा भाव लहान मुलात दिसून येतो; परंतु वस्तुतः ते प्रेम आपल्या हृदयात असते, ते मुलांमध्ये फक्त प्रकट होत असते. हा भाव अगाध आहे, सामर्थ्यवान आहे. त्याने म्हणजे भावरूपी भीमाने पौण्डू-प्रीती नावाचा महाशंख फुंकला, हा भाव महान आहे, बलवान आहे, सामर्थ्यवान आहे पण प्रेमाचे माध्यम असले तरच !

हरि व्यापक सर्वत्र समाना। प्रेम ते प्रगट होहिं मैं जाना।।

(रामचरित मानस, १/१८४/५)

अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः। नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १६ ॥

कुन्तीपुत्र राजा युधिष्ठिराने 'अनंत विजय' नावाचा शंख फुंकला. महाभारतात कुन्ती हे कर्तव्याचे प्रतीक आहे; तर युधिष्ठिर हे धर्माचे प्रतीक आहे. धर्म जर स्थिर व सुदृढ ठेवला तरच 'अनन्त विजय' अनन्त परमात्म्याची स्थिती प्राप्त करून देईल. जो युद्धामध्ये स्थिर असतो, निश्चिल असतो त्याला युधिष्ठिर म्हणतात. जो प्रकृति पुरुष, क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षामध्ये स्थिर राहू शकतो, जो महाभयंकर दुःखानेही विचलित होत नाही असा स्थितप्रज्ञच एक दिवस अनन्त, अविनाशी अशा परमतत्त्व परमेश्वरावर विजय मिळवू शकतो.

नियमरूपी नकुलने 'सुघोष' नावाचा शंख फुंकला. येथे नकुल हा आचारपरंपरेचे नियम पाळण्यात अत्यंत काटेकोर होता व म्हणून त्याला 'नियम' असे म्हटले आहे. तेव्हा जो जो नियम भव्य होईल, उन्नत होईल म्हणजेच शुद्ध आचारविचार वाढतील तेव्हा अशुभ-अमंगल नष्ट होत जाईल व मंगलकारक, कल्याणकारक, शुभकारक स्थिती निर्माण होईल. नंतर सत्संगरूपी सहदेवाने मणिपुष्पक' नावाचा शंख फुंकला. विद्वानांनी प्रत्येक श्वासाला'बहुमूल्य रत्न' असे म्हटले आहे. 'हीरा जैसी स्वांसा बातों में बीती जाय' आता येथे सत्संग व बहुमूल्य श्वास याचा काय संबंध आहे ? त्यासाठी सत्संगाचे स्वरूप समजावून घ्यायला हवे. सत्संग दोन प्रकारचे असतात.

एक सत्पुरूषांच्या सान्निध्यात बसून त्यांची अमृतवाणी श्रवण करणे. हा झाला बाह्य सत्संग पण दुसरा सत्संग हा आंतरिक असतो. भगवान श्रीकृष्णांच्या मते आत्मा हेच एकमेव सनातन सत्य आहे. तेव्हा सर्व प्रकारांनी बाजूंनी इंद्रियांचे नियमन करून जर मन आत्म्याच्या संगतीत राहील, आत्म्याच्या ठिकाणी रत होईल तेव्हा तो खरा, वास्तविक सत्संग होतो. सतत ध्यान, चिन्तन व चित्ताची एकाग्रता याचा सतत सराव, अभ्यास केल्याने हा सत्संग साधला जातो. या सनातन सत्याच्या सान्निध्यात मन जसजसे अधिक रममाण होईल रत होईल तसतसे प्रत्येक श्वासावरही नियंत्रण ठेवणे शक्य होईल व मग मनासहित इंद्रियाचा विरोध होऊ शकेल त्या दिवशी मन संपूर्ण इंद्रिय निग्रह करू शकेल त्या दिवशी त्याला सनातन तत्त्वाची प्राप्ती होईल. त्यानंतर एखाद्या वाद्याच्या सुराप्रमाणे चित्ताचा सूर वाद्याच्या सुरात मिसळून जाईल व हाच खरा सत्संग ठरेल. या अर्थाने सहदेवाला सत्संगरूप असे म्हंटले आहे.

बाह्य रत्न कठीण आहे; परंतु श्वासरूपी रत्न फुलापेक्षाही कोमल आहे. फूल तर विकसित झाल्यानंतर किंवा देठापासून तुटल्यावर कोमेजून जाते, परंतु मनुष्य पुढचा श्वास घ्यायला जिवंत राहू शकेल की नाही याची शाश्वती नाही. परंतु आंतरिक सत्संग सफल झाला तर मात्र प्रत्येक श्वासावर नियंत्रण ठेवून परम लक्ष्याची प्राप्ती करून घेता येते. पांडवांचे हेच लक्ष्य आहे; त्या व्यतिरिक्त दुसरे ध्येय लक्ष्य त्यांना नाही. परंतु प्रत्येक साधन निर्मलतेच्या मार्गात काही ना काही अंतर निर्माण करत असते.

काश्यश्च परमेष्वासः शिखण्डीच महारथः।

धृष्टद्युम्रो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ।।१७।।

महाधनुर्धारी काशीचा राजा, महापराक्रमी शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट व अजिंक्य असा सात्यकि यांनी आपापले शंख फुंकले. हा शब्दश: अर्थ झाला तरी ध्वन्यार्थ वेगळाच आहे. कायारूपी काशी ! मनुष्य मनासहित सर्व इंद्रियांचा निग्रह करून कायेमध्येच केंद्रित करीत असतो. तेव्हा तो ‘परमेश्वासः 'परमेशाच्या अंतःकरणात प्रविष्ट होतो. परमेश्वराच्या अंतःकरणात प्रवेश देणारी सक्षम शरीर-काया हीच काशी आहे. शरीरात परम श्रेष्ठ ईश्वराचा निवास असतो. 'परमेश्वास' म्हणजे श्रेष्ठ धनुर्धर असा नाही. परंतु परम+ईश वास असा आहे.

शिखा व सूत्राचा (जानव्याचा) त्याग म्हणजे शिखंडी, आजकाल लोक मुंडण करतात, जानवे काढून टाकतात, व अग्नी पेटवणे सोडून देतात व मग स्वतःला संन्यासी समजतात. या गोष्टी न करणे म्हणजे संन्यास ! पण तसे होऊ शकत नाही. कारण शिखा ही ध्येयाचे प्रतीक आहे, जे प्राप्त करावयाचे त्या लक्ष्याचे प्रतीक आहे व जानवे हे संस्काराचे प्रतीक आहे. जोपर्यंत परमेश्वराला प्राप्त करणे बाकी आहे तोपर्यंत मनुष्य कशाचा व कसा त्याग करू शकणार ? मग संन्यास तरी कसला ? अजून तर पथिकाची मार्गक्रमणा सुरू आहे. जेव्हा प्राप्तव्य प्राप्त होईल, मागे चिकटलेला संस्काराचा दोर कापला जाईल तेव्हा भ्रम पूर्णपणे नष्ट होईल व म्हणून शिखंडीच भ्रमरूपी भीष्माचा नाश करणारा आहे. शिखंडी म्हणजे चिंतनाच्या मार्गातील महारथी आहे.

'धृष्टद्युम्न' दृढ आणि अचल, स्थिर मनाचे प्रतीक म्हणजे धृष्टद्युम्न होय. 'विराट'- सर्वत्र भरून राहिलेल्या विराट ईश्वराला पाहण्यासाठी लागणाऱ्या दैवी सम्पदेच्या गुणांनी युक्त असणारा असा योद्धा म्हणजे विराट होय. सात्यकी म्हणजे सात्त्विकता होय. सत्याचे चिंतन करण्याची प्रवृत्ती म्हणजेच सात्त्विकता. ती जर अंगी बाणली तर घसरण्याचे पडण्याचे भय राहणार नाही आणि ही वृती या संघर्षात पराजित होऊ देणार नाही. ती विजयच देईल.

द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते।

सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दष्मुः पृथक्पृथक् ।।१८।

अचल, स्थिर पददायक म्हणजे दुपद आणि सहृदयता, वात्सल्य, लावण्य, सौम्यता इत्यादीमध्ये श्रेष्ठ व महापराक्रमी असणारे दौपदीचे पाच पुत्र व महाबाहू अभिमन्यू या सर्वांनी आपापले शंख फुंकले. महाबाहू हे कार्यक्षेत्राचे प्रतीक आहेत. जेव्हा मन भयरहित होते तेव्हा त्याचे सामर्थ्य खूप वाढत असते.

हे राजन, या सर्वांनी आपापले शंख फुंकले या प्रत्येकाने काही ना

काही ठरवलेले आहे, तेव्हा त्याचे पालन करणे आवश्यक आहे व म्हणून तर त्या सर्वांची येथे नावे सांगितली. याशिवाय काही गोष्टी मनबुद्धीच्या पलीकडे असतात, परमेश्वर स्वतःच अंतःकरणात एकीकडे स्वतः दृष्टी बनून आत्म्यासमोर उभे रहातात आणि निर्णय घेतात आणि स्वतःचीच ओळख करून देतात.

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्।

नमा पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ।।१९।।

आकाश व पृथ्वी दणाणून सोडणाऱ्या आवाजाने धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. मात्र श्रीकृष्ण आपला पाठीराखा आहे या आत्मविश्वासामुळे पांडवांची सेना किंचितही भ्यायली नाही. उलट कुरुक्षेत्रावर पांचजन्यच्या घोषामुळे दैवीशक्तीवरील अधिपत्यामुळे, अनन्तावर मिळवलेल्या विजयामुळे तेथे अशुभ नष्ट होऊ लागले आणि आसुरी संपदा, बहिर्मुखी प्रवृत्ती विदीर्ण झाल्या, त्यांचे सामर्थ्य क्षीण होऊ लागले. सर्वत्र सफलता प्राप्त होऊ लागताच मोहमयी प्रवृत्ती नेहमीच शांत होतात, नाहीशा होतात.

अथ व्यवस्थिता धार्तराष्ट्रान्कपिध्वजः। प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ।।२०।।

अर्जुन उवाच -

हवीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।

सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ।। २१ ।।

संयमरूपी संजयाने अज्ञानाने झाकाळून गेलेल्या धृतराष्ट्राच्या मनाला समजावले की हे राजन, अर्जुनाच्या ध्वजावर वैराग्यरूपी हनुमान विराजले आहेत. येथे कपिध्वज म्हणजे ध्वज चंचल असतो म्हणून त्याला कपिध्वज म्हटलेले नाही. येथे ध्वजावर आरूढ झालेला कपी म्हणजे साधेसुधे सामान्य वानर नाही. ते स्वयं हनुमान आहेत. नरोत्तम श्रीरामांचे सेवक वानरोत्तम आहेत. ते मूर्तिमंत वैराग्य आहेत. ज्यांनी मान-अपमान यांचे हनन केले

आहे- 'राम मान निरादर आदरही प्रकृतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा, विषयांचा विकारांचा त्याग म्हणजेच येथे वैराग्यरूपी ध्वजा म्हटले आहे.

ध्वजा ही राष्ट्राची प्रतीक असते तेव्हा ज्याचे वैराग्य हीच ज्याच्या रथाची ध्वजा आहे अशा अर्जुनाने कौरव युद्धसिद्ध झाले आहेत व शस्त्रास्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली आहे असे पाहून आपले धनुष्य उचलून जो हृदयाचा, स्वामी आहे त्या योगेश्वर कृष्णाला म्हणाला," हे अच्युता, (जो कधी च्यूत होत नाही असा ) दोन्ही सैन्यांच्या मध्यमागी माझा रथ उभा कर". येथे हा सारथ्याला दिलेला आदेश नाही तर सद्गुरुला केलेली प्रार्थना आहे. परंतु हा रथ मध्यमागी कशासाठी न्यायचा आहे ?

यावदेतानिरीक्षेऽहं योद्धकामानवस्थितान्। कैर्मया सह योद्ध व्यमस्मिन् रणसमुद्यमे । २२ ।।

अर्जुन म्हणाला, हे अच्युता, मध्यभागी रथ उभा केल्यास कोणाकोणाला युद्ध करावयाची इच्छा आहे ते मला पाहता येईल. या महायुद्धात मला कोणाकोणाबरोबर युद्ध करावयाचे आहे तेही मला पाहता येईल.

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः । पात॑राष्ट्रस्य दुर्बुद्धे प्रियचिकीर्षवः ।। २३ ।।

धृतराष्ट्राच्या हटवादी पुत्राचे कल्याण इच्छिणारे कोण कोण राजे येथे लढायला आले आहेत ते मला पाहू दे. त्यासाठी हा रथ दोन सैन्यांच्या मध्यभागी उभा कर. दुर्योधन मोहाचे प्रतीक आहे. तेव्हा या मोहमयी प्रवृत्तींचे हित इच्छिणारे असे जे जे राजे येथे आहेत त्या सर्वांना पाहण्याची इच्छा आहे.

संजय उवाच

एवमुक्तोहृषीकेशो गुडाकेशेन भारत।

सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ।।२४।।

भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्।

उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति । । २५ ।। 

संजय म्हणाला निद्राजयी अर्जुनाने असे म्हटल्यानंतर हृदयाचा स्वामी भगवान श्रीकृष्णानी दोन्ही सैन्यांमध्ये भीष्म, द्रोण आणि महीक्षिताम् म्हणजे शरीररूपी पृथ्वीवर अधिकार गाजवणाऱ्या राजांच्या मध्ये आपला उत्तम रथ

उभा केला. आणि ते म्हणाले, पार्था! येथे जमलेल्या कौरवांना पहा.

येथे उत्तम रथ म्हणजे सोन्या चांदीचा रथ असा अर्थ नाही. या जगाच्या परिभाषेत उत्तमता ही नश्वर शरीराच्या अनुकूलतेवरून किंवा प्रतिकूलतेवरून ठरत असते. ही परिभाषा अपूर्ण आहे. जर आमच्या आत्म्याची प्रकृतीला स्वभावाला साथ असेल, जिथे कसलेही म्हणजे लेशमात्रही मालीन्य नसेल तेच उत्तम. उत्तम रथाचा अर्थ असा ध्वनित होतो.

तत्रापश्यस्थिताप्पार्थः पितॄनय पितामहान् ।

आचार्यामातुलान्यातपुत्रान्पौत्रान्सरवींस्तथा ।

शुरासुहृदय सेनयोरुभयोरपि ।। २६ ।।

यानंतर अचूक लक्ष्यवेध साधणाऱ्या आपल्या पार्थिव शरीराला रथ बनवणाऱ्या पार्थाने, दोन्ही पक्षांच्या सैन्यामध्ये आपले वाडवडील, आजे, गुरु, मामे, भाऊ, पुत्र, नातू, मित्र तसेच त्याचे सासरे व हितचिंतक या सर्वांना पाहिले. म्हणजे दोन्ही सेनेत अर्जुनाला आपला परिवार, आपल्या मामाचा, सासरचा परिवार दिसला तसेच आपले मित्र व गुरुजन त्याला दिसले. हे सर्व मिळून अठरा अक्षौहिणी सैन्य होते म्हणजे प्रचलित परिमाणा प्रमाणे साडेसहा अब्ज इतके सैन्य झाले. महाभारत परिमाणा प्रमाणे अठरा अक्षौहिणी म्हणजे अंदाजे चाळीस लाख इतके सैन्य झाले! म्हणजे आजच्या संपूर्ण विश्वाच्या संख्येइतकी ही संख्या झाली. इतक्या लोकांसाठी कधी तरी अन्नसमस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पण विशेष म्हणजे एवढी प्रचंड संख्या फक्त अर्जुनाच्या परिवाराची होती. एवढा मोठा कधी कोणाचा परिवार असू शकतो का ? हे कधीच शक्य असणार नाही. हे हृदयरूपी देशाचे चित्रण होते.

तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान्। कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ।। २७ ।।

जेव्हा कुन्तीपुत्र अर्जुनाने त्या साऱ्या बांधवांना स्वजनांना पाहिले तेव्हा करूणेने अत्यंत व्याकुळ होऊन शोक करू लागला. कारण हा सगळा आपलाच परिवार आहे. त्यांना मारून टाकण्याच्या कल्पनेने तो अत्यंत व्याकूळ झाला व म्हणाला,

अर्जुन उवाच -

मं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ।।२८।।

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति।

वेपबुद्ध शरीरे मे रोमहर्षच जायते ।। २९ ।।

हे कृष्णा, ह्या युद्धात लढण्याच्या इच्छेने आलेल्या माझ्या आप्त स्वजनांना व मित्रांना पाहून माझ्या शरीराचे अवयव गळून जात आहेत, तोंडाला कोरड पडत आहे. शरीराला कंप सुटला आहे व माझ्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत. इतकेच नव्हे तर -

गाण्डीवं वंसते हस्तात्त्वक्वैव परिदह्यते। न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ||३०।।

माझे गाण्डीव धनुष्य माझ्या हातातून गळू लागले आहे. शरीराचा फार दाह होत आहे. एवढा महारथी, पराक्रमी अर्जुन! पण स्वजनांशी लढण्याच्या कल्पनेने तो गलितगात्र झाला. व्याकूळ झाल्याने त्याचे शरीर तापू लागले, विषादाने तो कापू लागला. त्याचे मन भ्रमल्यासारखे होऊ लागले. तो विव्हळ होऊन श्रीकृष्णाला म्हणाला आता उभे राहण्याचेही सामर्थ्य माझ्यात नाही. माझ्या डोळ्यापुढे काळोख पसरत आहे. काही पाहण्याचेही सामर्थ्य माझ्यात नाही.

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे।।३१।।

हे कृष्णा ! या युद्धाची लक्षणे चांगली दिसत नाहीत. मला तर सगळी विपरीतच चिन्हे दिसत आहेत. या युद्धात स्वजनांना मारून कोणतेही कल्याण होणार नाही हेही मला स्पष्ट दिसत आहे. अरे, कुळाचा नाश करून कोणाचे कधी कल्याण होते का ?

म काक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च। किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ।।३२।।

संपूर्ण परिवार रणांगणावर उभा आहे. त्याला मारून विजय मिळवणे व विजय मिळवलेल्या राज्याचे सुख भोगणे ही गोष्ट अर्जुनाला रुचेना. असे लांछित सुख त्याला नको होते व म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणाला हे कृष्णा, मला असा विजय नको आहे. तसेच असे रक्तलांछित राज्य, भोग किंवा असे हे जीवनही मला नको आहे. असले राज्य व सुख प्राप्त करण्यात काय अर्थ आहे ? याचे कारण स्पष्ट करताना अर्जुन म्हणतो

येषामर्थे काक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च।

त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥३३॥

ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, उपभोग व सुखे यांची इच्छा करावयाची तेच हे आप्त-स्वकीय आपल्या जीविताची आशा सोडून युद्धासाठी सिद्ध होऊन या रणांगणावर उभे राहिले आहेत. आम्हाला राज्य हवे होते, सुख, उपभोग, संपत्तीही आम्हाला हवी होती; पण ते सर्व आमच्या आप्त, स्वजन व मित्रांसह हवे होते. त्यांच्यासह ते भोगण्याची इच्छा होती. परंतु ते सर्व आपल्या जीविताची आशा सोडून येथे आले आहेत. तेव्हा आता मला असे राज्य, उपभोग, सुख, संपत्ती काहीही नको आहे. हे सर्व त्यांच्यासाठी व त्यांच्यामुळे प्रिय आहे. तेच जर राहणार नसतील तर सुखभोगाचे व राज्याचे प्रयोजन काय ? आम्हाला ते नको आहे. जोपर्यंत आप्त, स्वजन व मित्र असतात तोपर्यंत मनुष्याच्या इच्छा-वासना तीव्र असतात. आपले वैभव त्यांना दाखवण्याची, त्यांच्यापेक्षा वरचढ होण्याची, त्यांच्याकडून वाहवा मिळवण्याची इच्छा असते. त्यामुळे त्यांच्याशिवाय वैभवाचा उपभोग घेणे हे मानवी मनाला पटत नाही. अहो, झोपडीत राहणारा गरीब मनुष्यही आपल्या स्वजनांना मारून विश्वाचे साम्राज्य स्वीकारणार नाही. अर्जुन येथे हेच सांगत आहे की, आम्हाला उपभोग प्रिय आहेत, विजय हवा आहे परंतु ज्यांच्यासाठी हे सर्व हवे आहे तेच जर जिवंत राहणार नसतील तर त्या सुखवैभवाचे काय प्रयोजन ? कारण या युद्धात ज्यांना मारावयाचे आहे ते लोक कोण आहेत ते पहा.

आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः। मातुलाः श्वशुराः पौत्राः श्याला सम्बन्धिनस्तथा।।३४।।

ह्या युद्धात गुरु, वडील, पुत्र, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे असे अनेक नातलग येथे उपस्थित आहेत.

एताप्न हन्तुमिच्छामि नतोऽपि मधुसूदन । अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ।।३५ ।।

हे मधुसूदना, मला जरी कोणी त्रैलोक्याचे राज्य देऊ केले तरी मला ठार मारण्याची इच्छा करणाऱ्या या लोकांना मी मारू इच्छित नाही; मग या पृथ्वीची काय कथा ?

रणांगणावर उभ्या असणाऱ्या अठरा अक्षौहिणी सैन्यात अर्जुनाला आपले सर्व स्वकीयच दिसले. वास्तविक अर्जुन म्हणजे करूणा करूणेने ओथंबलेल्या प्रत्येक भक्तापुढे उपासनेच्या प्रारंभी हीच समस्या उभी असते. त्यांना वाटते की, भजन-पूजन, उपासना, आराधना करून परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी. परंतु एखाद्या अनुभवी सद्गुरुच्या सहवासात किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली उपासना करणाऱ्या भक्ताला जेव्हा क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्यातील संघर्षाचे स्वरूप समजते व मग आपल्याला खरे कोणाशी लढावयाचे आहे हे समजते तेव्हा तो हताश होतो. त्याला असे वाटत असते की पिल्याकडील परिवार, सासुरवाडीचा परिवार, मामाकडील परिवार, इतर सहृद, मित्र व गुरुजन यांच्यासह रहावे, सर्वांनी सुखी असावे, त्यांची नीट व्यवस्था ठेवावी व ते करत असतानाच परमेश्वराची उपासना करून त्याचीही प्राप्ती करून घ्यावी. परंतु जेव्हा त्याला समजते की, परमेश्वराची आराधना करण्यासाठी प्रथम सर्व आप्तांनांच सोडावे लागते, प्रथम त्यांच्याविषयी असणाऱ्या प्रेमाचाच त्याग करावा लागतो तेव्हा तो व्याकूळ होतो.

पूज्य महाराज श्री म्हणायचे- 'साधू होणे व मृत्यू पावणे या दोन्ही गोष्टी एकच आहेत. त्याच्यासाठी जगात कोणीही जिवंत नसते व कोणी जिवंत असले तर तो मोह, आसक्ती असते. या मोहावर व आसक्तीवर विजय मिळवणे हाच साधूचा खरा विजय असतो. या मोहाचा, आसक्तीचा प्रसार म्हणजे तर आयुष्य असते. अन्यथा आयुष्यात आमचे काय आहे ? 'तुलसीदास कह चिद विलास जग बुझत बुझत बूझे' मनाचा प्रसार म्हणजेच हे जगत आहे. योगेश्वर कृष्णानेही मनाच्या प्रसारालाच 'जगत' म्हंटले. जो या मनाच्या प्रसाराला रोखतो, त्याच्यावर विजय मिळवतो, तो चराचर जगावर विजय मिळवतो. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः (गीता ५/१९)

केवळ अर्जुन व्याकूळ झाला असे नव्हे. अनुराग-प्रेम सर्वांच्या हृदयात असते. ज्याच्या हृदयात हे प्रेम आहे, करुणा आहे ते सर्वच असे व्याकूळ होतात. प्रथम त्यांना वाटते की, भजन-पूजनापासून काही फायदा होईल व त्यामुळे सर्वजण सुखी होतील, त्यांच्याबरोबर सुखाचा उपभोग घेऊ. परंतु ते जर जिवंतच राहणार नसतील तर सुख मिळवून काय उपयोग ? अर्जुनाची दृष्टी राज्यसुखापर्यंतच सीमित होती. त्रैलोक्याच्या साम्राज्य प्राप्तीलाही तो सुखाची पराकाष्ठा समजत होता. त्याच्याही पलीकडे काही सत्य आहे ही गोष्ट अद्याप अर्जुनाला समजलेली नाही.

निहत्य धार्तराष्ट्रातः का प्रीतिः स्याज्जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः ।।३६।।

हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला का आनंद होणार आहे ? धृतराष्ट्र म्हणजे धृष्टतेचे राष्ट्र. त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या मोहरूपी दुर्योधनादीना मारून आम्हाला काय समाधान मिळणार आहे ? जनार्दना, या आततायी लोकांना मारून आम्हाला उलट पापच लागेल; जो यत्किंचित लाभासाठी अनीतीच्या मार्गाचा अवलंब करतो, त्याला आततायी म्हंटले जाते. परंतु जो आत्म्याच्या मार्गात अडथळा बनतो तो महा आततायी असतो. काम, क्रोध, लोभ, मोह हे मोक्षाच्या मार्गातील अडथळे आहेत.

तस्मान्नाह तयं हन्तु धार्तराष्ट्रान्स्ववान्धवान्। स्वजन हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ।।३७।।

म्हणून हे माधवा, धृतराष्ट्राच्या या पुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही. अरे, हे स्व-बांधव कसे ? ते तर शत्रू होते ना ? वास्तविक नाती ही अज्ञानातून उत्पन्न होत असतात. हा मामा आहे. हा काका आहे, ही सासुरवाडी आहे, हे आमचे स्वजन आहेत आप्त आहेत हे सर्व संबंध अज्ञानातून उत्पन्न होत असतात. अहो, आमचे हे शरीरच जर नश्वर आहे तर ही नाती कुठून टिकणार ? जोपर्यंत मोह असतो तोपर्यंत आम्हाला परिवार असतो, आमचे सुहृद असतात,

आमची एक दुनिया असते. परंतु जेथे मोह असत नाही, तेथे हे कोणतेही

संबंध ही नाती उपस्थित होतच नाहीत. येथे मोहामुळे अर्जुनाला त्याचे शत्रूही सुहृद वाटू लागले व म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणत आहे की, या आप्तांना मारून आम्ही कसे सुखी होणार ? जर हे अज्ञान आणि मोह नष्ट झाला तर कुटुम्बाचे अस्तित्वच राहणार नाही. अर्थात, हे अज्ञानच ज्ञानाचे प्रेरक बनत असते. भर्तृहरी, तुलसीदास इत्यादी अनेक महानुभवांना वैराग्याची प्रेरणा त्यांच्या पत्नीपासून मिळाली आहे, तर कोणी सावत्र आईच्या वागण्यामुळे खिन्न होऊन वैराग्याचा मार्ग पत्करला आहे असे आपल्याला दिसून येते..

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः। कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ।।३८।।

हे जनार्दना, लोभामुळे ज्यांचे चित्त भ्रष्ट झाले आहे अशा या लोकांना कुलनाश केल्याने लागणारे पाप दिसत नाही. ते जाणून घेण्याची त्यांच्यात कुवत नाही परंतु

कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्माभिवर्तितुम्। कुलक्षयकृत दोष प्रपश्यद्भिर्जनार्दन ।। ३९ ।।

हे जनार्दना, मित्रदोह करणे किंवा कुलनाश करणे हे महापाप आहे हे आम्हाला समजत असताना या विचारापासून आम्हाला परावृत्त व्हायला नको का ? श्रीकृष्णा, मी हे पाप करत आहे असे नाही; तर आपणही चुकत आहात. येथे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णावरही दोषारोप केले आहे. येथे तो स्वतःला श्रीकृष्णाच्या बरोबरीचा समजत आहे. प्रत्येक नवीन साधक जेव्हा सद्गुरूला शरण जातो तेव्हा तो स्वतःला सद्गुरुच्या बरोबरीचा समजतो. ज्ञानामध्ये आपण आपल्या गुरुच्या समान आहोत असे त्याला वाटते. म्हणून येथे अर्जुन म्हणतो की, त्या लोकांना जरी ही गोष्ट समजली नाही तरी तुम्ही आम्ही तर ही गोष्ट जाणत आहोत. तेव्हा मित्रद्रोह व कुलनाश केल्याने लागणाऱ्या दोषांबाबत आम्हाला विचार करायला हवा. या कुलनाशाने काय घडते ?

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।

धर्मे नष्टे कुलं कृमथर्मोऽभिभवत्युत। । ४० ।।


कुलाचा क्षय झाला की, परंपरागत कुलधर्म नष्ट होतात. येथे अर्जुन परंपरागत कुलधर्म व कुलाचार यांनाच सनातन धर्म समजत होता. जेव्हा धर्म नष्ट होतो तेव्हा संपूर्ण कुलावर अधर्माचा पगडा बसतो. संपूर्ण कूळ पापाखाली चिरडले जाते.

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलखियः। स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ||४१ ।।

हे कृष्णा, जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते, पाप वाढते तेव्हा कुलातील स्त्रिया बिघडतात आणि कुलस्त्रिया बिघडल्या की वर्णव्यवस्थेचा नाश होतो. त्यांच्या अध:पतनाने वर्णसंकर होतो. नको असलेली संतती, प्रजा उत्पन्न होते. अर्जुनाला असे वाटत होते की, कुलस्त्रियांच्या अध:पतनाने वर्णसंकर होतो. परंतु अर्जुनाच्या या विचाराचे खंडन करून श्रीकृष्णाने त्याला पुढे सांगितले की, मी किंवा स्वस्वरूपात स्थित असणाऱ्या महापुरुषांनी आराधनाक्रमात भ्रम उत्पन्न केला की वर्णसंकर निर्माण होतो. तेव्हा वर्णसंकराने

कोणते दोष घडतात ते सांगताना अर्जुन म्हणतो

सङ्घरो नरकायैव कुलमानो कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ||४२ ।।

वर्णसंकर हा कुलक्षय करणाऱ्यांना व कुळालाही नरकात नेतो. कारण श्राद्ध-तर्पणादी क्रिया लुप्त झाल्याने त्यांचे पितर अधोगतीला जातात. या वर्णसंकरामुळे वर्तमान पिढीचे अध: पतन होते, त्यांचे पूर्वजही अधोगतीला जातात व भावी पिढीचेही असेच अध:पतन होत असते. इतकेच नाही तर

दोषैरेतैः कुलप्नानां वर्णसरकारकैः । उत्साद्यन्ते जातिधर्माः कुल ४३॥

कुळक्षय करणान्यांच्या ह्या वर्णसंकरकारक दोषांनी जातीधर्म व शाश्चत परंपरागत कुलधर्म उध्वस्त होतात. अर्जुनाला असे वाटत होते की, कुलधर्म हा सनातन आहे. कुलधर्म शाश्वत आहे. परंतु श्रीकृष्णाने त्याच्या या विचारांचे खंडन करून त्याला सांगितले की, आत्मा हाच सनातन शाश्वत धर्म आहे. वास्तविक या सनातन धर्माचे ज्ञान होण्यापूर्वी मनुष्य धर्माच्या नावावर

एखाद्या रुढीला धर्म समजतो. अर्जुनाला यामुळेच कुलधर्मच हा सनातन धर्म वाटला. परंतु कुलधर्म म्हणजे श्रीकृष्णाच्यामते एक रूढी आहे.

उत्कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन

नरकेऽनियत वासो भवतीत्यनुशुशुम ।।४४।।


हे जनार्दना, ज्या लोकांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत त्यांना नरकवास प्राप्त होतो असे ऐकले आहे. त्यांचा केवळ कुलधर्मच नष्ट होत नाही तर शाश्वत सनातन धर्म नष्ट होत असतो. जेव्हा धर्मच नष्ट होतो तेव्हा धर्म नष्ट करणाऱ्या लोकांना अनंत कालापर्यंत नरकवास भोगावा लागतो असे ऐकले आहे. अर्थात पाहिले नाही, केवळ ऐकले आहे.


अहो वत महत्पाप कर्तुं व्यवसिता वयम्। पत्राज्यसुखलोमेन हन्तु स्वजनमुताः ।।४५।।

अहो, आम्ही बुद्धिमान असूनही केवढे महत्पाप करण्यास उद्युक्त झालो आहोत! राज्याच्या व सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांना मारण्यास सिद्ध झालो आहोत.


येथे अर्जुन स्वतःला बुद्धिमान, ज्ञानी समजत आहे. प्रथम प्रत्येक साधक स्वतःला असे ज्ञानीच समजत असतो. महात्मा बुद्ध म्हणतात, 'जेव्हा मनुष्याचे ज्ञान अधुरे अर्धवट असते; तेव्हा तो स्वतःला महान ज्ञानी समजत असतो. परंतु जेव्हा तो खरे ज्ञान प्राप्त करू लागतो तेव्हा तो स्वत:ला महामूर्ख समजू लागतो'. याप्रमाणे येथे अर्जुन स्वतःला ज्ञानी समजत आहे. म्हणून तो प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाला समजावत आहे की, आम्ही जे पाप करावयास निघालो आहे त्याने कोणतेही कल्याण साधणार नाही. आम्ही राज्याच्या व सुखाच्या लोभाने कुलनाश करावयास तयार झालो आहोत. आम्ही खरोखर फार मोठी चूक करीत आहोत. आणि हे श्रीकृष्णा, तूही आमच्याबरोबर मोठी चूक करीत आहेस. परमज्ञानी व परिपूर्ण असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला असे म्हणून अर्जुनाने चांगलाच धक्का दिला व शेवटी तो आपला निर्णय देतो.


यदि मामप्रतीकारमशस्त्र शत्रपाणयः ।

धार्तराष्ट्रा रणे हन्दुस्तन्मे क्षेमतरं भवेत् ||४६ ।।


धृतराष्ट्राच्या पुत्रांशी लढण्यापेक्षा त्यांनी शस्त्रविरहित व प्रतिकार न करणाऱ्या मला युद्धभूमीवर ठार मारले तरी ते माझ्यासाठी अधिक कल्याणकारक ठरेल. निदान इतिहास म्हणेल की, अर्जुन खरोखर समजुतदार होता म्हणून त्याने आपले प्राण देऊन एवढी मोठी प्राणहानी करणारे भयंकर युद्ध टाळले. भोळ्याभाळ्या व निष्पाप मुलांचे प्राण वाचवण्यासाठी व कुळ नष्ट होऊ नये म्हणून लोक आपल्या प्राणांची आहुती देत असतात. इथे मोहाचे प्राबल्य वाढल्यामुळे, आत्मज्ञान झाले नसल्यामुळे, अज्ञानामुळे अर्जुन असे म्हणत आहे. जेव्हा मोह प्रबळ होतो तेव्हा असेच घडत असते. मनुष्य अगदी परदेशात जाऊन वैभवशाली प्रासादात राहत असला तरी काही दिवसांनंतर त्याला आपली झोपडी आठवते. अर्जुनाचे इथे असेच झाल्याने तो म्हणत आहे की, धृतराष्ट्राच्या शस्त्रधारी पुत्रांनी शस्त्रांचा त्याग केलेल्या व प्रतिकार न करणाऱ्या मला रणभूमीवर ठार केले करी ते कल्याणकारकच ठरेल. कारण निदान ते तरी सुखी होतील.


संजय उवाच -

एवमुक्तवार्जुनः सङ्घ रथोपस्थ उपाविशत्। विसृज्य सशरं चापं शोकसंविग्रमानसः ।।४७।।


संजय धृतराष्ट्राला म्हणाला की, दुःखाने अति व्याकुळ झालेल्या अर्जुनाने असे म्हणून आपले धनुष्य व बाण बाजूला ठेवून दिले व रथाच्या मागील भागात खाली जाऊन बसला. याचाच अर्थ क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षात भाग न घेता तो त्या संघर्षातून बाजूला झाला.

निष्कर्ष


भगवद्गीता म्हणजे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षाचे निरूपण आहे. गीता म्हणजे ईश्वरी ऐश्वर्याने संपन्न अशा भगवतस्वरूपाचे संगीत आहे. हे संगीत जेथे होते ते युद्ध क्षेत्र आहे 'शरीर'! या शरीरात दोन प्रवृत्ती वसत असतात एक 'धर्मक्षेत्र व दुसरे 'कुरुक्षेत्र' येथे त्या दोन्ही क्षेत्रांतील सेनांचे स्वरूप व त्यांच्या सामर्थ्याचा आधार काय आहे हे सांगितले. शंखध्वनीनी त्यांच्या पराक्रमाचा परिचय करून दिला. त्यानंतर ज्या सेनांबरोबर युद्ध करावयाचे आहे, तिचे निरीक्षण झाले. ती सेना अठरा अक्षौहिणी म्हणजे जवळ साडेसहा


एखाद्या रुढीला धर्म समजतो. अर्जुनाला यामुळेच कुलधर्मच हा सनातन धर्म वाटला. परंतु कुलधर्म म्हणजे श्रीकृष्णाच्यामते एक रूढी आहे.


उत्कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन

नरकेऽनियत वासो भवतीत्यनुशुशुम ।।४४।।


हे जनार्दना, ज्या लोकांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत त्यांना नरकवास प्राप्त होतो असे ऐकले आहे. त्यांचा केवळ कुलधर्मच नष्ट होत नाही तर शाश्वत सनातन धर्म नष्ट होत असतो. जेव्हा धर्मच नष्ट होतो तेव्हा धर्म नष्ट करणाऱ्या लोकांना अनंत कालापर्यंत नरकवास भोगावा लागतो असे ऐकले आहे. अर्थात पाहिले नाही, केवळ ऐकले आहे.


अहो वत महत्पाप कर्तुं व्यवसिता वयम्। पत्राज्यसुखलोमेन हन्तु स्वजनमुताः ।।४५।।

अहो, आम्ही बुद्धिमान असूनही केवढे महत्पाप करण्यास उद्युक्त झालो आहोत! राज्याच्या व सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांना मारण्यास सिद्ध झालो आहोत.


येथे अर्जुन स्वतःला बुद्धिमान, ज्ञानी समजत आहे. प्रथम प्रत्येक साधक स्वतःला असे ज्ञानीच समजत असतो. महात्मा बुद्ध म्हणतात, 'जेव्हा मनुष्याचे ज्ञान अधुरे अर्धवट असते; तेव्हा तो स्वतःला महान ज्ञानी समजत असतो. परंतु जेव्हा तो खरे ज्ञान प्राप्त करू लागतो तेव्हा तो स्वत:ला महामूर्ख समजू लागतो'. याप्रमाणे येथे अर्जुन स्वतःला ज्ञानी समजत आहे. म्हणून तो प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाला समजावत आहे की, आम्ही जे पाप करावयास निघालो आहे त्याने कोणतेही कल्याण साधणार नाही. आम्ही राज्याच्या व सुखाच्या लोभाने कुलनाश करावयास तयार झालो आहोत. आम्ही खरोखर फार मोठी चूक करीत आहोत. आणि हे श्रीकृष्णा, तूही आमच्याबरोबर मोठी चूक करीत आहेस. परमज्ञानी व परिपूर्ण असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला असे म्हणून अर्जुनाने चांगलाच धक्का दिला व शेवटी तो आपला निर्णय देतो.


यदि मामप्रतीकारमशस्त्र शत्रपाणयः ।

धार्तराष्ट्रा रणे हन्दुस्तन्मे क्षेमतरं भवेत् ||४६ ।।


धृतराष्ट्राच्या पुत्रांशी लढण्यापेक्षा त्यांनी शस्त्रविरहित व प्रतिकार न करणाऱ्या मला युद्धभूमीवर ठार मारले तरी ते माझ्यासाठी अधिक कल्याणकारक ठरेल. निदान इतिहास म्हणेल की, अर्जुन खरोखर समजुतदार होता म्हणून त्याने आपले प्राण देऊन एवढी मोठी प्राणहानी करणारे भयंकर युद्ध टाळले. भोळ्याभाळ्या व निष्पाप मुलांचे प्राण वाचवण्यासाठी व कुळ नष्ट होऊ नये म्हणून लोक आपल्या प्राणांची आहुती देत असतात. इथे मोहाचे प्राबल्य वाढल्यामुळे, आत्मज्ञान झाले नसल्यामुळे, अज्ञानामुळे अर्जुन असे म्हणत आहे. जेव्हा मोह प्रबळ होतो तेव्हा असेच घडत असते. मनुष्य अगदी परदेशात जाऊन वैभवशाली प्रासादात राहत असला तरी काही दिवसांनंतर त्याला आपली झोपडी आठवते. अर्जुनाचे इथे असेच झाल्याने तो म्हणत आहे की, धृतराष्ट्राच्या शस्त्रधारी पुत्रांनी शस्त्रांचा त्याग केलेल्या व प्रतिकार न करणाऱ्या मला रणभूमीवर ठार केले करी ते कल्याणकारकच ठरेल. कारण निदान ते तरी सुखी होतील.


संजय उवाच -

एवमुक्तवार्जुनः सङ्घ रथोपस्थ उपाविशत्। विसृज्य सशरं चापं शोकसंविग्रमानसः ।।४७।।


संजय धृतराष्ट्राला म्हणाला की, दुःखाने अति व्याकुळ झालेल्या अर्जुनाने असे म्हणून आपले धनुष्य व बाण बाजूला ठेवून दिले व रथाच्या मागील भागात खाली जाऊन बसला. याचाच अर्थ क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षात भाग न घेता तो त्या संघर्षातून बाजूला झाला.


निष्कर्ष :

भगवद्गीता म्हणजे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षाचे निरूपण आहे. गीता म्हणजे ईश्वरी ऐश्वर्याने संपन्न अशा भगवतस्वरूपाचे संगीत आहे. हे संगीत जेथे होते ते युद्ध क्षेत्र आहे 'शरीर'! या शरीरात दोन प्रवृत्ती वसत असतात एक 'धर्मक्षेत्र व दुसरे 'कुरुक्षेत्र' येथे त्या दोन्ही क्षेत्रांतील सेनांचे स्वरूप व त्यांच्या सामर्थ्याचा आधार काय आहे हे सांगितले. शंखध्वनीनी त्यांच्या पराक्रमाचा परिचय करून दिला. त्यानंतर ज्या सेनांबरोबर युद्ध करावयाचे आहे, तिचे निरीक्षण झाले. ती सेना अठरा अक्षौहिणी म्हणजे जवळ साडेसहा.