श्री परमात्मने नमः
॥ अथ द्वितीयोऽध्यायः ॥
अध्याय दुसरा
गीतेतील पहिला अध्याय
म्हणजे गीतेचे जणू प्रवेशद्वार आहे. जिथे प्रारंभी साधकाला ज्या शंका-कुशंका
निर्माण होतात. त्याची जी गोंधळलेली स्थिती निर्माण होते त्या वैचेन करणाऱ्या
अनुभवांचे येथे चित्रण आहे. रणभूमीवर सर्व कौरव-पांडव लढणारे होते. परंतु फक्त
अर्जुनाच्या मनातच विर्तक उभा राहिला. कारण अर्जुन म्हणजे दयाशीलतेचे प्रतीक आहे.
आवडत्या गोष्टींची आसक्ती किंवा प्रेमच क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्यातील संघर्षाला
प्रेरीत करीत असते. अनुराग किंवा दयाशीलता ही त्याची पहिली पायरी असते. पूज्य
महाराजजी म्हणत आश्रमात राहणाचा सद्गृहस्थाला जेव्हा ग्लानी यायला सुरुवात होते
जेव्हा अनुपात होतो, जेव्हा
त्याचा कंठ दाटून येतो तेव्हा समजावे की आता ईश्वराच्या भजन-पूजनाला खरी सुरुवात
झाली आहे. तेव्हा तात्पर्य असे की दयाशीलतेमध्येच सर्व काही समाविष्ट असते. त्यातच
धर्म,
नियम, सत्संग
व भाव सर्व काही विद्यमान असते.
दयाशीलतेच्या पहिल्या
टप्यात कौटुंबिक प्रेम हे अडसररूप ठरत असते. सुरुवातीला सर्वांना असे वाटत असते की, आपण परम श्रेष्ठ सत्याची प्राप्ती करून घ्यावी. परंतु हे
परिपूर्ण सत्य प्राप्त करण्यासाठी कौटुंबिक संबंधाचा प्रेमाचा त्याग करावा लागेल
हे जेव्हा मनुष्याला समजते तेव्हा तो हताश होतो. व मग तो आधीपासून काही धर्म-कर्म
म्हणून करत होता त्यात संतोष मानतो. आणि मग आपल्या विचाराच्या पुष्टीसाठी तो
प्रचलित रूढींचा पुरावा सादर करतो जसे अर्जुनाने म्हटले की 'कुलधर्म सनातन आहे.
युद्धामुळे या सनातन
धर्माचा लोप होईल, कुलक्षय होईल, स्वैराचार वाढेल. अर्थात हे अर्जुनाचे खरे विचार होते असे
म्हणता येणार नाही. तर सद्गुरूच्या सान्निध्यात येण्यापूर्वी अवलंबिलेली ती एक
कुरीत होती. तो एक खोटा आचार होता.
अशा या गैर आचाराच्या
जाळ्यात फसल्यामुळेच मनुष्य नानाविध धर्म, अनेक संप्रदाय, लहान मोठे गट व असंख्य जाती निर्माण करीत असतो. कोणी नाक
दाबत असते, कोणी कान कापत असते, कोणाला स्पर्श केल्याने कोणाचा धर्म नष्ट होत असतो; तर कोणाचे अन्न भक्षण केल्याने कोणाचा धर्म नष्ट होत असतो.
यामध्ये दोष कोणाचा? कोणत्या
जातीत जन्म घेतलेल्या लोकांचा? त्यांच्यामुळे
जातिधर्म बुडतो का? नाही, हे चादांत खोटे आहे. दोष भ्रम निमार्ण करणाऱ्यांचा आहे.
धर्माच्या नावाखाली आम्ही गैर चालींचे, गैर रूढींचे शिकार बनत असतो. त्यामुळे दोष आमचा आहे.
महात्मा बुद्धाच्या वेळी 'केश-कम्बल' नावाचा
एक संप्रदाय होता. या संप्रदायात केस वाढवून त्यांचा घोंगडीसारखा उपयोग करणे
म्हणजे पूर्णत्व प्राप्त होते असे समजले जात असे. तेव्हा कोणी गोवतिक ( गाईप्रमाणे
राहणारा ) असत; कोणी कुक्कुरव्रतिक
(कुत्र्याप्रमाणे स्वतःचे खाणे, पिणे
व फिरणे ठेवणारा) असे. ते आपल्या या व्रताला वर्तनाला धर्म मानत, पण ब्रह्मविद्येशी अशा या रूढींचा काही संबंध नसतो.
संप्रदाय व अशा खोट्या रूढी पूर्वीही होत्या व आजही आहेत. कृष्णाच्या काळात अशाच
प्रकारचे संप्रदाय होते, वाईट रूढी
होत्या. त्यातल्या एका गैर रूढीचा अर्जुन शिकार बनला होता व म्हणून तो म्हणाला की
युद्धामुळे १ ) सनातन धर्म नष्ट होईल, २) त्यामुळे वर्णसंकर निर्माण होईल, ३ ) पिंडोदकादी क्रिया लुप्त होतील व ४) आमच्या हातून
कुलक्षय झाला तर ते एक महा पाप ठरेल; आणि तेच पाप करावयास आज आम्ही उद्युक्त झालो आहोत. या
अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या या प्रांतिमूलक विचारांना उत्तर दिले आहे.
संजय उवाच -
तं तथा
कृपयाविष्टमपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच
मधुसूदनः ||१||
करुणेने व्याप्त झालेल्या
अतिशय दुःखी झालेल्या व ज्याचे डोळे अनूनी भरून आले आहेत अशा त्या अर्जुनाला पाहून
मधुसूदन,
म्हणजे उन्मादाचा मदाचा नाश करणारे भगवान श्रीकृष्ण म्हणाले,
श्रीभगवानुवाच
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे
समुपस्थितम् ।
अनामंजुष्टमस्वयंमकीर्तिकरमर्जुन
||
२ ||
अर्जुना, अरे या विषम अशा स्थळी तुझ्यामध्ये हे अज्ञान कसे निर्माण झाले? येथे विषम स्थळ म्हणजे त्याच्यासारखे दुसरे कोणतेही स्थळ या
पृथ्वीतलावर नाही असे. ज्या स्थळावर लौकीक गोष्टीचा विचार केला जात नाही, पारलौकिक हेच ज्याचे लक्ष्य आहे, अशा निर्विवाद ठिकाणी हे अज्ञान तुझ्या ठिकाणी कोठून
निर्माण झाले? तुम्ही म्हणाल सनातन
धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या अर्जुनाच्या ठिकाणी अज्ञान कोठून असणार? सनातन धर्माच्या रक्षणासाठी अत्यंत तत्पर राहणे किंवा
प्राणांचीही तमा न बाळगणे हे काय अज्ञानाचे द्योतक आहे? यावर भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात हो, ते अज्ञानच आहे. कारण अशा प्रकारचे आचरण आजपर्यंत कोणत्याही
महानुभवाने केलेले नाही. या आचरणाने, या कृतीने स्वर्गही मिळणार नाही व कीर्तीही मिळणार नाही. जो
सत्मार्ग सोडीत नाही, जो
सन्मार्गावर दृढपणे उभा आहे, त्यालाच
श्रेष्ठ समजले जाते. आपल्या कुटुंबासाठी सर्वस्वाचा त्याग करणे, मरायला सिद्ध होणे हे जर अज्ञान नसते; तर अनेक महापुरुष त्याच मार्गाने गेले असते. जर कुलधर्म हे
परम सत्य असते तर कल्याणकारी मार्गाकडे व स्वर्गाकडे जाण्याचा तो एक उत्तम मार्ग
ठरला असता. पण तो तसा ठरला नाही. या मार्गाच्या आचरणाने कीर्तीही प्राप्त होत
नाही. जेव्हा मीरा भगवंताचे भजन करू लागली तेव्हा 'लोग कहे मीरा भई बावरी, सास कहे कुलनाशी रे' लोकांनी तिची 'बावरी' म्हणून
निंदा केली. सासूने तिला
कुलकलंकिनी म्हटले. परंतु
ज्या परिवाराच्या व कुळाच्या मर्यादांसाठी मीराची सासू व्याकूळ झाली होती त्या
सासूला आज जग जाणत नाही. तिला विसरून गेले आहे; पण मीराबाईला आज अखिल विश्व जाणत आहे. अशाच प्रकारे येथे
अर्जुन आपल्या कुटुंबासाठी व्याकूळ झालेला आहे. मग ज्या कृत्याने कीर्ती प्राप्त
होत नाही,
जे कृत्य कल्याणकारक नसते व ज्या कृत्याचे आचरण कोणत्याही
महानुभवाने केलेले नाही ते कृत्य अज्ञानमूलकच नव्हे का?
क्लैव्यं मा स्म गमः पार्थ
नैतत्त्वय्युपपद्यते । मुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ।।३।।
अरे अर्जुना, तू असे नामर्द बनू नकोस. येथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत
आहेत की,
तू असा नामर्द बनू नकोस. अर्जुन खरोखर नामर्द पौरुषहीन होता
का?
वास्तविक जे पौरुषविहीन आहेत त्यांना नपुसंक म्हंटले जाते.
त्या दृष्टीने अर्जुन नामद किंवा दुबळा नव्हता तो तर महापराक्रमी होता. अर्जुनाची
गोष्ट सोडली तरी प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार पुरुषार्थ करीत असतो. शेतकरी
रात्रंदिवस शेतात मेहनत करून एक प्रकारे पुरुषार्थच करीत असतो. कोणी चांगला
व्यापार करण्यात पुरुषार्थ समजतो. कोणी आपल्या पदाचा दुरुपयोग करण्यात पुरुषार्थ
समजतो. अर्थात, आयुष्यभर असा
पुरुषार्थ करूनही शेवटी मनुष्याला रिकाम्या हातानेच जावे लागते. याचाच अर्थ असा की, हा खरा पुरुषार्थ नव्हे. 'आत्म-दर्शन' हा खरा पुरुषार्थ आहे. गार्गीने याज्ञवल्क्याला म्हटले आहे
नपुसंक पुमान् ज्ञेयो यो न
वेत्ति इदि स्थितम् ।
पुरुष स्वप्रकाश
तस्मानन्दात्मानमव्ययम् ।।" जे हृदयस्थ आत्म्याला ओळखू शकत नाहीत तेच पुरुष
नपुसंक असतात,
नामर्द असतात, असे समजावे. हा आत्याच पुरुषस्वरूप, स्वयंप्रकाशी, परम आनंदयुक्त आणि अव्यक्त असतो. या आत्म्याला ओळखणे, त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच पुरुषार्थ
करणे होय. तेव्हा हे अर्जुना, तू
असा नपुसंक नामर्द बनू नकोस. हे तुला योग्य नाही. हे शत्रुतापना, हृदयाची ही भीरुता, ही दुर्बलता तू सोडून दे आणि कणखरपणे युद्धासाठी उभा रहा.
कौटुंबिक आसक्तीचा त्याग कर. ही आसक्तीच हृदयाला दुर्बल बनवणारी आहे. तेव्हा या
दुर्बलतेचा तू त्याग कर. यावर अर्जुनाने तिसरा प्रश्न उपस्थित केला -
अर्जुन उवाच -
कथं भीष्ममई संख्ये द्रोणं
च मधुसूदन । इषुभिः प्रति बोत्स्यामि पूजाहविरिसूदन ।।४।।
अंहकाराचे दमन करणाऱ्या हे
मधुसूदना,
जे आम्हाला अत्यंत पूजनीय आहेत अशा पितामह भीष्मांवर आणि
गुरु द्रोणाचार्यांवर या युद्धात बाणांनी मी उलट प्रहार कसा करू? हे शत्रुनाशना, मला हे शक्य होणार नाही.
द्रोणाचार्य हे द्वैताचे
प्रतीक आहेत. आम्ही वेगळे आहोत, परमेश्वर
वेगळा आहे. द्वैताची ही जाणीवच परमेश्वर प्राप्तीच्या प्रेरणेचा प्रारंभिक स्त्रोत
आहे;
आणि हेच तर द्रोणाचार्यांचे गुरुत्व आहे. तर भीष्म हे
भ्रमभ्रांतीचे प्रतीक आहे. जोपर्यंत मनावर या भ्रांतीचा कब्जा असतो तोपर्यंत मुले, कुटुंब, नातेवाईक
हे सर्व आपले वाटतात. या आपुलकीचे, आसक्तीचे माध्यम आहे भ्रम! व मग हृदयस्थ आत्मा त्यानाच
पूज्य समजून त्यांच्या मोहात गुरफटतो व म्हणू लागतो हे माझे आजोबा आहेत, हे कुलगुरु आहेत. परंतु जेव्हा साधकाची साधना परिपूर्ण होते
तेव्हा 'गुरु न चेला, पुरुष अकेला '
न बन्धुनं मित्रं गुरुर्नैव
शिष्यः ।
चिदानन्दरूपः शिवोऽहम्
शिवोऽहम् ।।
जेव्हा चित्त त्या
परमानन्दात विलीन होते तेव्हा तेथे ज्ञान देणारा गुरु व ग्रहण करणारा शिष्य असा
भेदच राहत नाही. हीच सर्वश्रेष्ठ अवस्था असते. गुरुचे गुरुत्व प्राप्त केल्यानंतर
गुरुत्व एकरूपच होऊन जाते. कृष्ण अर्जुनाला म्हणतात- 'अर्जुना, तू
माझ्यात निवास करशील' म्हणजे
जसे श्रीकृष्ण तसाच अर्जुन! अशा प्रकारे परमानन्द प्राप्त करणारा महापुरुष बनतो.
अशा अवस्थेत गुरुचाही विलय होऊन जातो. गुरुत्व हृदयात प्रवाहित होऊन जाते. येथे
अर्जुन गुरुपदाची ढाल बनवून या संघर्षातून परावृत्त होऊ इच्छित आहे व म्हणून तो
म्हणतो
गुरुमहत्वा हि महानुभावान्
श्रेयो भोक्तुं भक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिव
मुजीय
भोगान्रुधिरप्रदिग्धान् ।।५।।
माझ्या परमपूज्य व श्रेष्ठ
गुरूवर्यांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. येथे
भिक्षा याचा अर्थ उदरभरणासाठी भीक मागणे असा नाही; परंतु सज्जनांची सत्पुरुषांची सेवा करून त्यांच्याकडून
अक्षय्य सुखाची, कल्याणाची याचना करणे
असा त्याचा अर्थ आहे. 'अन्न
बह्येति व्यजानात' (तैत्तिरीय
३/२/१) अन्न म्हणजे एकमात्र परमात्मा आहे. त्याची प्राप्ती करून आत्मा नेहमीसाठी
तृप्त होत असतो. कधीही तो अतृप्त राहत नाही. महात्म्यांची महापुरुषांची सेवा करून
व त्यांच्याकडून कल्याणप्राप्तीची याचना करून त्याद्वारे हळूहळू ब्रह्मामृताची
प्राप्ती तर व्हावी; आणि
कुटुंबाचाही त्याग करावा लागू नये ही अर्जुनाच्या भिक्षान्नाची इच्छा आहे. या जगात
असेच लोक जास्त असतात. त्यांची अशी इच्छा असते की कौटुंबिक स्नेह संबंध तर तुटू
नये पण हळूहळू मुक्ती मात्र प्राप्त होत जावी. परंतु ज्यांचे संस्कार श्रेष्ठ आहेत, ज्यांच्यात संघर्ष करण्याची क्षमता आहे, ज्यांच्या रक्तात क्षत्रियाचे तेज खेळत आहे अशा सन्मार्गावर
चालणाऱ्या पथिकाला भिक्षान्नाचे हे विधान लागू पडत नाही. जे स्वतः निष्क्रिय राहून
फक्त याचना करतात ती भिक्षा होय, ते
भिक्षान्त्र होय. गौतम बुद्धांनीसुद्धा भिक्षु संप्रदाय असूनही मज्झिम निकायमधील
धम्मदायाद सुत्तामध्ये (१/२/३) या भिक्षान्नाला आमिष एक प्रकारची लाच समजून ते
त्याज्य मानले आहे.
अर्जुन पुढे म्हणतो, श्रीकृष्णा, आमच्या या गुरूजनांना मारून आम्हाला काय मिळणार आहे? अरे जे भोग भोगायला मिळतील ते सुद्धा त्यांच्या रक्ताने
माखलेले असतील. अर्जुनाला कदाचित असे वाटत असावे की, हे महापाप करण्यापेक्षा भजन-पूजनाने भौतिक सुखाची मात्रा
अधिक वाढेल; कारण इतका भयंकर
संघर्ष करून दुसरे काय मिळणार? शरीराला
सुखकारक वाटणारे
अर्थयोग आणि कामभोगच ना! म्हणून तो पुन्हा म्हणतो
न चैतद्विचः कतरनो गरीयो
यद्वा जयेम यदि वा नो
जयेयुः ।
मानव हत्वा न जिजीविषाम
स्तेऽवस्थिताः प्रमुख
धार्तराशाः ||६||
आम्हाला ऐश्वर्यभोग मिळेल
हेदेखील कुठे निश्चित आहे ? आणि आम्ही
जे समजत होतो ते सर्व
अज्ञान होते हे सिद्ध झाल्यामुळे आता आम्ही काय करणे श्रेयस्कर आहे हेही आम्हांला
समजेनासे झाले आहे. शिवाय आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला
माहीत नाही. हे धृतराष्ट्राचे पुत्र आमच्यापुढे उभे आहेत; पण त्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही. अज्ञानरूपी
धृतराष्ट्रापासून निर्माण झालेले मोहरूपी स्वजन नष्ट झाल्यानंतर आम्ही जिवंत राहून
काय करणार? नंतर अर्जुनाला वाटले
आपण जे म्हणत आहोत, सांगत
आहोत तेही अज्ञान असेल तर? म्हणून तो
श्रीकृष्णाला प्रार्थना करीत आहे
कार्पण्यदोषोपहतस्वभावः
पृच्छामि त्वां
धर्मसंमूढचेताः ।
शिष्यस्तेऽहं शाथि मां
त्वां प्रपन्नम् ।।७।।
माझ्या भेकड दुर्बल
स्वभावामुळे कर्तव्याच्या बाबतीत, धर्माधर्म
जाणण्याच्या बाबतीत मी मोहग्रस्त झालो आहे व म्हणून मी आपल्याला विचारीत आहे की, माझ्या अशा अवस्थेत मला हितकारक, सर्वात कल्याणकारक काय आहे ते सांगा. तुम्ही म्हणाल, मी का सांगावे? भगवन् मी आपला शिष्य आहे, आपल्याला शरण आलेलो आहे, म्हणून मला श्रेयस्कर असलेली गोष्ट सांगा. अर्थात मला केवळ
सांगू नका, केवळ शिकवू नका तर
जेथे मी अडखळेन तेथे मला तुम्ही संभाळून घ्या. "लादणे, लावणे व लावणारा ", तिन्ही गोष्टी एकत्र असलेल्या बच्या समजा एखादा गठ्ठा खाली
पडला तर तो पुन्हा कोण लादायला येणार? अशा प्रकारचे अर्जुनाचे येथे वागणे आहे.
येथे अर्जुनाने स्वतःला संपूर्ण
समर्पण केलेले आहे. आतापर्यंत तो श्रीकृष्णाची व स्वतःची योग्यता एक सारखी आहे असे
समजत होता, किंबहुना काही बाबतीत
स्वतःला अधिक विद्वान समजत होता. येथे मात्र आपला स्वतः चा सांभाळ, स्वतःचे रक्षण करण्याचे कार्य अर्जुनाने श्रीकृष्णावर
सोपवले आहे. मनुष्याच्या लक्ष्यपूर्तीपर्यंत, सद्गरू साधकाच्या हृदयात राहून त्याच्या बरोबर वाटचाल
करतात. जर तसे ते त्याच्याबरोबर राहिले नाहीत तर मनुष्य हा भवसागर पार करु शकत
नाही. ज्याप्रमाणे उपवर कन्येला संयमाचे शिक्षण देत तिचा विवाह होईपर्यंत तिचे
कुटुंबिय तिचे रक्षण करतात, त्याच
प्रकारे सद्गुरू शिष्याच्या अंतरात्मारूपी रथाचे सारथी बनून संसाररूपी घाटातून
त्याला बाहेर काढून इप्सित स्थळी त्याला पोहचवतात. येथे अर्जुन धर्माधर्म जाणण्यास
असमर्थ झालेला आहे म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणत आहे, भगवन, आणखी
एक गोष्ट मला समजावून सांगा,
न हि प्रपश्यामि
ममापनुद्याद्
यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्
।
अवाप्य भूमावसपलमृद्ध
राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ।।८।।
पृथ्वीवरील निष्कंटक व
धनधान्याने संपन्न असे राज्य किंवा स्वर्गातील सर्व देवातांवर अधिपत्य गाजवणारे
असे इंद्रपद जरी मला मिळाले तरी मला त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण माझ्या इंद्रियांना शोधून टाकणारा हा शोक मला नाहीसा
करता येणार नाही. माझ्या जीविताचे शोषण करणाऱ्या या शोकाने मला इतके ग्रासले
असल्यामुळे मी हे सर्व घेवून करू तरी काय? जर माझ्या वाटयाला असा हा शोकच येणार असेल तर भगवन्, मला क्षमा करा. अर्जुनाला वाटले आपण असे म्हटल्यांवर
श्रीकृष्ण आपल्याला युद्ध करायला सांगणार नाहीत. संजय उवाच -
एवमुक्तया इमीकेशं गुडाकेशः
परंतप । नयोत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ।। ९ ।।
संजय म्हणाला हे राजन, मोहनिशाजयी अर्जुनाने हृदयाचा स्वामी असणाऱ्या श्रीकृष्णाला
म्हटले की, हे गोविंदा, मी युद्ध करणार नाही आणि असे सांगून तो स्तब्ध झाला. अजून
अर्जुनाची वृत्ती सनातनी आहे की ज्यामध्ये कर्मकांड, सुखभोग यावर भर असून स्वर्ग म्हणजे अंतिम लक्ष्य समजले
जाते. आता श्रीकृष्ण अर्जुनाची ही विचारसणी कशी चुकीची आहे ते पुढे सांगतील.
तमुवाच इषीकेशः प्रहसन्निव
भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये
विषीदन्तमिदं वचः ।।१०।।
त्यानंतर हे भरतकुलोत्पन्ना
धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्याच्या
मध्यभागी अशा प्रकारे
हातपाय गाळून बसणाऱ्या अर्जुनाला पाहून किंचित हसल्यासारखे करून, भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले
श्रीभगवानुवाच
अशोच्यानन्यशोचस्त्वं
प्रज्ञावादांच भाषसे । .गतासूनगतासू नानुशोचन्ति पण्डिताः ।।११।।
अरे अर्जुना, तू ज्यांचा शोक करणे योग्य नाही त्यांचा तू शोक करीत आहेस
आणि वर पांडित्याच्या पोकळ गोष्टी करीत आहेस. जे ज्ञानी आहेत, जे खरे पंडित आहेत ते जिवंत असलेल्यांबद्दल किंवा
मेलेल्यांबद्दल शोक करीत
नाहीत. तू पांडित्यपूर्ण गोष्टी खूप करतोस, परंतु तू खरा ज्ञानी नाहीस कारण
न त्वेवाई जातु नास न त्वं
नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ||१२||
अरे, मी म्हणजे अध्यात्मिक सद्गुरु पूर्वी नव्हतो असे नाही.
किंवा दयाशीलतेचा अधिकारी तू अगर हे राजे म्हणजे राजसी वृत्तीत वसत असणार अहंकार
पूर्वी नव्हता असे नाही. तसेच आपण सर्वजण ह्यापुढे असणार नाही असेही नाही. अरे, सद्गुरुचे अस्तित्व सदैव असते तसेच दयाशीलतेचे अस्तित्व
सदैव असते. येथे योगेश्वर कृष्णाने योगाच्या सनातनात्वावर प्रकाश टाकला आहे व
सांगितले आहे की योग भविष्यातही अस्तित्वात असणार आहे. जे मृत्यू पावले आहेत
त्यांच्याबद्दल शोक का करु नये? त्याचे
कारण सांगताना ते म्हणतात
देहिनोऽस्मिन्यथा देहे
कौमार चौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्षीरस्तन्त्र
न मुति ||१३||
ज्याप्रमाणे देहधारी
जीवात्म्याला बाल्य, तारुण्य, व वृद्धत्व या अवस्था प्राप्त होत असतात त्याप्रमाणे
मृत्युनंतर हा जीवात्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करत असतो. म्हणजे त्याला दुसरा देह
प्राप्त होत असतो व म्हणून ज्ञानी लोक कधीही मोह पावत नाहीत किंवा गोंधळून जात
नाहीत. या देहात काही काळ बाल्य, काही
काळ तारुण्य व काही काळ वृद्धत्व दिसते. तरीपण तो आत्मा एकच असतो, तो मनुष्यही तोच असतो. त्याप्रमाणे मृत्युनंतर त्या
जीवात्म्याला वेगवेगळे देह प्राप्त होत असतात. व जोपर्यंत परिवर्तनापेक्षा श्रेष्ठ
अशी वस्तू-गती मिळत नाही तोपर्यंत जीवात्म्याचे हे परिवर्तन सुरुच असते.
मात्रास्पशांस्तु कौन्तेय
शीतोष्णसुखदुःखदाः । आगमापाथिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्य भारत ।।१४।।
हे कुंतीपुत्रा, शीत उष्ण व सुख-दुःख देणारे इंदिय व विषय ह्यांचे
संयोग ह्याना उत्पत्ती व
नाश आहे,
ते अनित्य आहेत, क्षणभंगुर आहेत. म्हणून रतवंशी अर्जुना, तू त्यांचा त्याग कर, तू ते सहन कर. त्यांनी तू मोहित होऊन विकल होऊ नकोस. अर्जुन
इंद्रिय व विषय यांच्या संयागातून निर्माण होणाऱ्या सुखाच्या चिंतनाने विव्हळ झाला
होता. इतका सद्गुणी व श्रेष्ठ आचरण असणारा अर्जुन इतका गोंधळून गेला होता की
कुलधर्म,
कुलगुरुंची पूजनीयता किंवा त्यांच्याबद्दल असणारा नितांत
आदर या सर्व गोष्टी म्हणजे इंद्रियांची क्षणिक ओढ आहे. या भावना, स्नेह, आदर
हे सर्व क्षणिक आहे, नाशवंत
आहे. विषयांचा संयोग कधीच नित्य असत नाही व असणारही नाहीआणि इंद्रियांची तेवकी
क्षमताही नाही, ही गोष्ट त्याला समजत
नव्हती म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, हे
अर्जुना,
या इंद्रियापासून निर्माण होणाऱ्या जाणिवांचा तू त्याग कर
किंवा तू त्या सहन कर. पण अर्जुनाला ते सहन करणे का अशक्य आहे? ती काय हिमालयातील लढाई होती की रेगिस्तानमधील ? की अर्जुनाला तीव्र थंडीत किंवा तीव्र उष्णतेला तोंड द्यावे
लागणार होते? ही तर समशीतोष्ण
वातावरण असणाऱ्या कुरुक्षेत्रावरील लढाई होती. अर्थात या सर्व बाह्य गोष्टी आहेत.
येथे खरी लढाई होती हृदयदेशाशी. तो हा संघर्ष आहे. त्याचे येथे चित्रण आहे. येथे
क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांमधील संघर्ष आहे. येथे आसुरीसंपदेचे दमन करुन, सर्वसंग परित्याग करुन ईश्वरात विलीन होऊन जायचे आहे.
मनबुद्धीसह भगवतमय झाल्यावर देवी संपदेचेही तेथे अस्तित्व उरत नाही. कोणते विकारच
उरत नाहीत. मग दुष्ट किंवा मुष्ट प्रवृत्ती कोठून आक्रमण करणार? योगी अशा पूर्णत्वाला पोहचल्यानंतरच त्याला परम शांती
प्राप्त होत असते. ही गीता म्हणजे अंतःप्रवृत्तीच्या लढाईचे चित्रण आहे. तेव्हा या
प्रवृत्ती इंद्रियांच्या जाणिवा यांचा त्याग का करायचा? त्याने काय लाभ होईल? याचे उत्तर श्रीकृष्णांनी पुढे दिले आहे.
यं हि न व्यथचन्त्येते
पुरुष पुरुषर्षभ ।
समदुःखसुख धीरं सोऽमृतत्वाय
कल्पते ।।१५।।
श्रीकृष्ण म्हणतात हे
पुरुषश्रेष्ठा, जो मनुष्य सुखदुःख
समान समजतो व जो त्यांनी विचलित होत नाही म्हणजे जो दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर
असतो तो मोक्षाला योग्य होतो. तो अमृततत्त्व प्राप्त करण्यास पात्र असतो.
अर्जुनाला असे वाटत होते की, या
युद्धाचा परिणाम म्हणजे जिंकलो तर पृथ्वीचे राज्य प्राप्त होईल व मृत्यू आला तर
स्वर्ग प्राप्त होईल. श्रीकृष्ण म्हणतात अरे तुला ना स्वर्ग मिळेल ना पृथ्वी! तुला
येथे अमृतत्त्वाचा लाभ होईल. पण अमृत म्हणजे काय?
नासतो विद्यते भावो नामावो
विद्यते सतः।
उभयोरपितवनयोस्तत्त्वदर्शिभिः
।।१६।।
अर्जुना, जी वस्तू असत् असते तिला अस्तित्व नसते. अरे, अभावाला असित्व नसते कारण ती वस्तू अस्तित्वातच नसते. जी
वस्तू असतच नाही,
ती थांबवशील कशी? व जी वस्तू सत्-म्हणजे सत्य असते तिला अस्तित्व असते व
तिन्ही कालात ती नाहीही होत नाही व तिला कोणी नष्टही करू शकत नाही. अर्जुन
म्हणाला- भगवन्, हे आपण सांगत आहात? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हो मीच तुला सांगत आहे व
माझ्याबरोबर ज्यांनी या दोन्हींच्या स्वरूपाचा अभ्यास केला आहे त्यांनीही हाच
निर्णय घेतला आहे. म्हणजे तत्त्वदर्शी पुरुषांनी जे तत्त्व सांगितले होते तेच
श्रीकृष्णानी येथे पुन्हा सांगितले आहे कारण श्रीकृष्णही एक तत्त्वज्ञानी महापुरुष
होते. परमतत्त्व परमात्म्याचे ज्यांना दर्शन झाले आहे व ज्यांनी स्वतःला त्यामध्ये
समर्पित करून जे अत्यंत स्थितप्रज्ञ अवस्थेत राहतात त्यांनाच तत्त्वज्ञानी म्हटले
जाते. या सत् व असत्चे अधिक स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणतात
अविनाशि तु तद्विद्धि येन
सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न
कञ्चित्कर्तुमर्हति ।।१७।।
ज्याने हे जग व्यापिले आहे
व ज्याच्यापासून हे जग विस्तावले आहे ते मूळ आत्मतत्त्व नाशरहित आहे, अविनाशी आहे असे समज व जे' अव्ययस्य' म्हणजे
अविनाशी आहे त्या अव्यय तत्त्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. परंतु या
अविनाशी'
अमृताचे नाव काय आहे? ते आहे कोण?
अन्तवन्त इमे देहा
नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य
तस्माद्युष्यस्व भारत ||१८||
अविनाशी, अमर्याद आणि नित्य अशा जीवाल्यांचे फक्त भौतिक शरीर नाशवंत
असते आणि म्हणून हे अर्जुना, तू
युद्ध कर. अरे आत्मा हेच अमृतत्व आहे. आत्मा अविनाशी आहे व त्याचा तिन्ही काळात
नाश होत नाही. आत्मा सत्य आहे. शरीर मात्र नाशवंत आहे, असत् आहे व म्हणून हे शरीर तिन्ही काळात कधीच टिकून राहू
शकत नाही.
'शरीर नाशवंत आहे, म्हणून तू युद्ध कर' असा श्रीकृष्णांनी आदेश दिलेला आहे. परंतु अर्जुनाने केवळ
कौरवांनाच मारावे असे यातून स्पष्ट होत नाही. पांडवांच्या पक्षातही सर्व शरीरधारीच
होते. मग पांडवांची शरीरे अविनाशी होती का? मग शरीर जर नश्वर आहे तर श्रीकृष्ण कोणाचे संरक्षणकरणार
होते?
शरीरधारी अर्जुनाचे? जर शरीर नश्वर आहे, त्याला अस्तित्व नाही, त्याचे संरक्षण केले जात नाही मग अशा शरीराचे रक्षण करायला श्रीकृष्ण
तेथे उभे होते? जर असे असेल तर
श्रीकृष्णांना अविवेकी म्हंटले पाहिजे; कारण पुढे स्वतः श्रीकृष्णानीच म्हटले आहे की, जो केवळ शरीरासाठी खातो किंवा शरीरसुखासाठी श्रम करतो
(३/१३) तो अविवेकी व मूर्ख समजावा. अशा पापी पुरुषाचे जगणे व्यर्थ असते. मग अर्जुन
कोण होता?
अर्जुन म्हणजे अनुराग, दयाशीलता! अशा दयशील, प्रेमळ भक्तासाठी परमेश्वर त्याचा सारखी बनून त्याच्या
बरोबर राहतो. मित्राप्रमाणे त्याला मार्गदर्शन करतो. म्हणजे येथे अर्जुन म्हणजे
शरीर नव्हे. शरीर म्हणजे जीवात्म्याचे आवरण आहे, त्याच्या राहण्याचे घर आहे व त्यात राहणारा जो जीवात्मा तो
दयाशील आहे. भौतिक युद्ध केल्याने मारल्याने किंवा कापल्याने शरीराचा अंत होत नाही
हे शरीर संपले किंवा एका शरीराचा त्याग केला तरी आत्म्याला दुसरे शरीर प्राप्त होत
असते. या संदर्भात श्रीकृष्णांनी म्हटले आहे की ज्या प्रकारे शरीराला बाल्य, युवा किंवा जरावस्था प्राप्त होत असतील त्या प्रकारे
मृत्युनंतर आत्म्याला वेगवेगळे शरीर प्राप्त होत असते. जर शरीर कापून टाकले तर
जीवात्मा शरीररूपी नवे वस्त्र बदलत असतो.
हे शरीर संस्कारांचे आश्रित
असते आणि संस्कार मनावर अवलंबून असतात. 'मन एव मनुष्याणां कारणं वन्धमोक्षयोः' मनाचे नियमन करणे, ते अचल किंवा स्थिर राहणे किंवा ते अंतिम संस्कारात विलीन
होणे ही सर्व एक क्रिया आहे. संस्कारांची मालिका तुटणे म्हणजेच शरीराचा अंत होणे
होय. तिला तोडण्यासाठी आराधना करणे आवश्यक असते. तिलाच श्रीकृष्णांनी 'कर्म' किंवा
निष्काम कर्मयोग म्हटले आहे. श्रीकृष्णाने प्रत्येक वेळी युद्धासाठी प्रेरीत केले
आहे;
पण भौतिक युद्ध किंवा हिंसा यांचे समर्थन करणारा एकही श्लोक
नाही. कारण हे युद्ध आहे ते सजातीय व विजातीय (सुष्ट व दुष्ट) प्रवृत्तींचे आहे व
ते अंतरंगात आहे.
य एवं वेत्ति हन्तारं यौनं
मन्यते इतम् । उभौ तौ न विजानीतो नार्य हन्ति न हन्यते ।।१९।।
ज्यांना असे वाटते की
जीवात्मा हा मारणारा आहे किंवा मारला जाणारा आहे त्या दोघांनाही काही समजत नाही.
कारण हा आत्मा कोणाला मारीतही नाही व कोणाकडून मारलाही जात नाही.
न जायते म्रियते वा कदाचित्
प्रार्थ भूत्वा भविता या न
भूषः।
अजो नित्यः शाखसोऽयं पुराणो
न हन्यते इन्यमाने शरीर।।२०।।
हा आत्मा कधी जन्मतही नाही
किंवा कधी मरतही नाही कारण तो फक्त वस्त्र बदलत असतो. हा जन्मला व पुन्हा नाहीसा
झाला असेही कधी होत नाही कारण हा जन्मरहित, नित्य, शाश्वत
आणि पुरातन आहे. देहाचा नाश झाला तरी ह्याचा नाश होत नाही. तेव्हा आत्माच सत्य
आहे. आत्माच पुरातन आहे, आत्माच
शाश्वत आणि सनातन आहे. मग आपण कोण? आपण सनातन धर्माचे अनुयायी आहोत. सनातन कोण आहे तर आत्मा!
तेव्हा आपण आत्म्याचे अनुयायी आहोत, आत्मा परमात्मा आणि ब्रह्म हे एक दुसऱ्याचे पर्याय आहेत. मग
आपण कोण?
तर शाश्वत धर्माचे उपासक आहोत. शाश्वत कोण आहे? शाश्वत आत्मा आहे. तेव्हा आपण सर्वजण आत्म्याचे उपासक आहोत.
जर आपण चैतन्यमय आत्याचा मार्ग जाणत नसाल तर आपल्याजवळ शाश्वत, सनातन नावाची कोणती गोष्टच नाही. त्याची तुम्ही वाट पाहत
असाल तर तुम्ही आशावादी आहात, परंतु
सनातनधर्मी म्हणता येणार नाही. सनातन धर्माच्या नावावर चुकीच्या रूढीचे तुम्ही
शिकार आहात..
जगातील सर्व मानवमात्रात
आत्मा एक सारखाच असतो. तेव्हा जगात कोठेही कोणी आत्म्याचा मार्ग जाणत असेल व तो
त्या मार्गावर प्रयत्नशील असेल तर ती व्यक्ती सनातनधर्मी आहे असे समजावे. मग ती
व्यक्ती स्वतःला खिश्चन समजो, मुसलमान
समजो किंवा यहुदी समजो अथवा कोणीही समजो. ती सनातन धर्माचे पालन करणारी आहे.
वेदाविनाशिनं नित्यं य
एनमजमव्ययम्।
कथं स पुरुषः पार्थ के घातयति हन्ति कम् ।।२१।।
पार्थिव शरीराला रथ बनवून ब्रह्मरूपी लक्ष्यावर अचूक नेम
मारणाऱ्या पृथापुत्र अर्जुना! ज्याला आत्मा हा अविनाशी नित्य, जन्मरहित व अक्षय आहे हे समजले तो पुरुष कसा मृत्युचे कारण
होईल किंवा स्वतः कोणाला कसा मारील? अविनाशीचा नाश असंभव आहे, अजन्म जन्मतच नाही, म्हणून शरीराचा शोक करू नये. याचेच स्पष्टीकरण करताना
श्रीकृष्ण म्हणतात
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णा
न्यन्यानि संयाति नवानि
देही ।।२२।।
ज्याप्रमाणे मनुष्य जुनी
वस्त्रे टाकून दुसरी नवी वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करून नवे भौतिक
शरीर धारण करतो. जर जीवात्मा जीर्ण शरीराचा त्याग करत असतो तर मग काही लहान मुले
का बरे मरतात? त्यांचे शरीररूपी
वस्त्र तर नवे असते. त्यामुळे त्याचा उलट विकास व्हायला हवा. मग असे का घडते? याचे कारण म्हणजे मनुष्याचे शरीर संस्कारांवर आधारित असते.
जेव्हा संस्कार जीर्ण होतात तेव्हा आत्मा शरीराचा त्याग करतो. जर संस्कार दोन
दिवसांचा असेल तर ते शरीर दुसऱ्या दिवशीच जीर्ण बनते. त्यानंतर मनुष्य एक श्वासही
अधिक घेवू शकत नाही. तेव्हा संस्कार हेच शरीर आहे व या संस्कारानुसार आत्मा नवीन
शरीर धारण करीत असतो. 'अथ खलु
क्रतुमयः पुरुषः । यथा इहैव, तथैव
प्रेत्य भवति कृतं लोकं पुरुषोऽभिजायते।'(छान्दोग्योपनिषद्, ३/१४) अर्थात हा आत्मा निश्चय करणारा संकल्प करणारा असतो.
मृत्युलोकात तो जसा संकल्पमयी असतो, तसाच शरीराचा त्याग केल्यावरही असतो. त्यामुळे त्याने
ठरविलेल्या, निश्चित केलेल्या
शरीरात तो निर्माण होतो. संकल्प, जीवित
कार्य संपताच निघून जातो. या प्रकारे मृत्यू म्हणजे शरीराचे परिवर्तन आहे. आत्मा
कधीही मरत नाही. आत्म्याच्या अमरतेवर भर देताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात.
नै छिन्दन्ति शखाणि मैनं
दहति पावकः । नक्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ||२३||
अर्जुना, या आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाहीत. अग्नी जाळू शकत नाही.
तसेच पाणी भिजवू शकत नाही अगर वायू सुकवू शकत नाही.
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोप्य एव च ।
नित्यः सर्वगतः
स्थाणुरथलोऽयं सनातनः ||२४||
अरे, हा आत्मा अच्छेद आहे त्याला कधी छेदता येत नाही, तोडता येत नाही, तो अदाह्य आहे. त्याला कधी कोणी जाळू शकत नाही, कारण तो जाळला जाणार नाही. तो अक्लेद्य आहे- तो न भिजणारा
आहे. आकाश त्याला स्वतःमध्ये विलीन करु शकत नाही, एकरूप करु शकत नाही. हा आत्मा निःसंदेह अशोष्य, सर्वव्यापक, अचल, स्थिर आणि
सनातन आहे.
अर्जुनाने म्हटले होते की, कुलधर्म हाच सनातन धर्म आहे व असे युद्ध करण्याने हा सनातन
धर्म नष्ट होईल. परंतु श्रीकृष्णाने अर्जुनाचे हे मत अज्ञानयुक्त आहे असे सांगून
आत्मा हाच सनातन आहे असे सांगितले. आपण कोण आहोत? सनातन धर्माचे अनुयायी! सनातन कोण आहे? तर आत्मा! जर आपल्याला आत्म्यापर्यंतचे अंतर पार करण्याची
विशिष्ट पद्धत अवगत नसेल तर आपण सनातन धर्मच जाणत नाही. याचा दुष्परिणाम भारताला
भोगायला लागला आहे. मध्यकालीन भारतात बाहेरुन आलेले मुसलमान फक्त बारा हजार होते; पण आज त्यांची संख्या अठ्ठावीस करोड आहे. बारा हजारावरुन
वाढून लाख होतील, जास्तीतजास्त
करोड होतील आणखी किती वाढतील? पण
आज अठ्ठावीस करोडपेक्षाही त्यांची संख्या जास्त वाढत आहे. हे कसे? ते सर्व आपले जातिबांधव आहेत. शिवाशीव आणि वाटण्याने ते
नष्ट झाले आहेत. अर्थात ते नष्ट झाले नाहीत; तर त्यांचा सनातन, अपरिवर्तनशील धर्म नष्ट झाला आहे. भौतिक (Matter
) क्षेत्रात निर्माण होणारी कोणतीही वस्तू
या सनातनाला स्पर्श करु शकत नाही, मग
शिवाशीव किंवा वाटण्याने सनातन धर्म कसा नष्ट होईल ? हा खरोखर धर्म नव्हे. ही एक वाईट निंद्य रुढी होती
परिस्थिती होती. त्यामुळेभारतात साम्प्रदायिक वैमनस्य वाढले, देशाचे विभाजन झाले आणि राष्ट्रीय एकता ही आज मोठी समस्या
बनली आहे.
या निंद्य रुढीच्या अनेक
कथा इतिहासात विखुरलेल्या आहेत. अशीच एक गोष्ट हमीरपूर जिल्ह्यात घडली. हमीरपूर
जिल्ह्यात पन्नास-साठ कुलीन क्षत्रिय कुटुंबे राहत होती. आज ते सर्व मुसलमान आहेत.
त्यांच्यावर ना तलवारी चालवल्या गेल्या ना तोफा डागल्या गेल्या. मग काय घडले? एक दिवस मध्यरात्री एक दोन मौलवी त्या गावातील एकमात्र
असणाऱ्या विहिरीजवळ लपून बसले. पहाटे येथे कर्मकाण्डी ब्राह्मण स्नानाला येईल अशी
त्यांची अटकळ होती. म्हणून ते तेथेच दबा धरुन बसले. पहाटे त्यांच्या होन्याप्रमाणे
ब्राह्मण तेथे आल्याबरोबर मौलवीनी पकडले, त्याचे तोंड बंद केले आणि मग त्याच्या देखत त्या मौलवींनी
विहिरीतून पाणी काढले, तोंड
लावून पाणी प्यायले व तेच उष्टे पाणी परत विहिरीत फेकून दिले. भाकरीचा एक तुकडाही
विहिरीत फेकला विद्वान ब्राह्मण विवश होऊन नुसता बघत राहिला. नंतर ते मौलवी
ब्राह्मणाला आपल्याबरोबर घेऊन गेले व आपल्या घरात त्याला डांबून ठेवले.
दुसऱ्या दिवशी त्यांनी
ब्राह्मणाला भोजन करण्याची विनंती केली. त्याबरोबर ब्राह्मण खवळून म्हणाला,
"अरे तुम्ही यवन आहात. तुमचे भोजन मी एक
कुलीन ब्राह्मण कसे घेणार" मौलवी म्हणाले "महाराज, आपल्यासारख्या विद्वान लोकांची आम्हाला अत्यंत आवश्यकता
आहे. आम्हांला क्षमा करावी" नंतर त्यांनी ब्राह्मणाला सोडून दिले.
ब्राह्मण आपल्या गावी परत
आला तेव्हा त्याने पाहिले की सर्व लोक नेहमीप्रमाणे विहिरीचे पाणी वापरत आहेत.
तेव्हा तो ब्राह्मण तेथेच उपोषणाला बसला तेव्हा लोकांनी उपोषणाचे त्याला कारण
विचारले. त्यावर तो त्यांना म्हणाला अरे काही यवन विहिरीच्या या कट्ट्यावर चढले
होते. माझ्या देखत त्यांनी विहिरीचे पाणी काढले, ते उष्टे केले व परत ते विहिरीत टाकले. त्यांनी विहिरीत
भाकरीचा एक तुकडाही टाकला. हे ऐकून गावकरी स्तब्ध झाले. त्यांनी विचारले "
आता काय होईल?" पंडितजी
म्हणाले "आता काय? तुम्ही
भ्रष्ट झालात. तुमचा धर्म नष्ट झाला".
त्यावेळी लोक सुशिक्षित
नव्हते. शुदांना व स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता. हा त्यांचा अधिकार न जाणो
केव्हापासून हिरावून घेतला गेला होता. वैश्य लोक धनोपार्जन हाच आपला धर्म आहे असे
समजत होते. क्षत्रिय लोक स्तुतिपाठकांच्या स्तुतिगीतांत रममाण झाले होते
अन्नदात्याने तलवार परजली, बिजली
त्याबरोबर तळपली, डगमगू
लागले दिल्लीचे तख्त, अशा
प्रशस्ती-गीतात क्षत्रियांचे भान हरपून गेले होते. आणि मान सन्मान तर आपोआप
प्राप्त होतच होते. मग शिकण्याची काय आवश्यकता होती? आणि धर्माशी त्यांचे काय देणे घेणे? धर्म फक्त ब्राह्मणांसाठी होता. तेच धर्मसूक्तांचे रचनाकार
होते,
तेच भाष्यकार होते व तेच धर्मातील खऱ्या खोटया गोष्टीचे
निर्णायक होते. वास्तविक प्राचीन काळी सर्वांना म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य
व शूद या चारी वर्णातील लोकांना व स्त्रियांनाही वेदपाठाचा अधिकार होता. त्यामुळे
प्रत्येक वर्णातील ऋषींनी वैदिक मंत्रांची रचना केलेली आहे, वादविवादात, शास्त्रर्थनिर्णयात भाग घेतला आहे. प्राचीन राजांनीदेखील
धर्माच्या नावावर अवडंबर माजवणाऱ्या व्यक्तींना सजा केलेली आहे, तर धर्मपरायण लोकांचा सन्मान केला आहे.
परंतु मध्यकालीन भारतात
सनातन धर्माचे यथार्थ ज्ञान नसल्यामुळे हमीरपूर गावाचे रहिवासी एखाद्या
मेंढयाप्रमाणे नेभळटाप्रमाणे एका कोपऱ्यात उभे राहिले. आपण धर्मभ्रष्ट झालो, आपला धर्म नष्ट झाला अशीच त्यांची समजूत झाली. काही लोकांनी
तर हे अप्रिय शब्द ऐकून आत्महत्या केली. परंतु कितीजण प्राण देणार? धर्मावर अतूट श्रद्धा असली तरी त्यांना विवश होऊन अन्य
मार्ग शोधावाच लागला. आजही ते लोक बांबू जमिनीत पुरून मुसळ ठेवून हिंदूच्याप्रमाणे
विवाह करत असतात. नंतर मौलवी येऊन निका वाचून निघून जातो. ते सर्वजण शुद्ध हिंदू
आहेत. पण ते सर्व लोक सगळे गाव आज मुसलमान बनले आहे.
काय घडले होते हो? विहिरीचे पाणी यवनांनी प्यायले होते. नकळत मुसलमानांनी
शिवलेले खाल्ले गेले होते. तेवढया कारणासाठी धर्म नष्ट झाला. म्हणजे धर्म'लाजाळू' बनला.
'लाजाळू' नावाचे
एक झाड असते. आपण त्या झाडाला स्पर्श केला की त्या झाडाची पाने संकुचित होतात व
हात बाजूला करताच ती पाने पुन्हा पूर्ववत विकसित बनतात. परंतु येथेधर्म तर असा
संकुचित झाला की पुन्हा तो कधीच विकसित होऊ शकणार नाही. जिवंतपणीच ते लोक मरुन
गेले,
त्यांचा धर्म मरून गेला, त्यांचे राम कृष्ण आणि परमात्मा मरून गेले. जे शाश्वत समजले
जाते तेच नष्ट झाले. वास्तविक लोक ज्याला धर्म समजत होते ती शाश्वत धर्माच्या
नावावर रूढ असणारी कुरीती होती. दुष्ट रूढी होती. आम्ही धर्माच्या आश्रयाला का
जातो?
आम्ही धर्माला शरण का जातो? कारण आम्ही मर्त्य आहोत, मरणशील आहोत आणि धर्म ही अशी एक भरीव ठोस गोष्ट आहे की तिला
शरण जाऊन आम्ही अमर बनू शकतो. धर्म केवळ स्पर्शाने किंवा वाटण्याने नष्ट झाला तर
तो आमचे रक्षण काय करणार? आम्हाला
कोणी मारले तर आम्ही मरतो व येथे हा धर्म फक्त शिवाशीवीने व उष्टे खाण्याने नष्ट
होईल ?
आम्ही तलवारीने कापले गेलो तर मरणार आणि धर्म फक्त स्पशनि
नष्ट होईल? कसला हा आमचा धर्म? वाईट रूढी, खराब
चाली पद्धती नष्ट होत असतात, सनातन
नष्ट होत नसते.
सनातन तर अशी ठोस भरीव
वस्तू आहे की जिला शस्त्र तोडू शकत नाही. अग्नी जाळू शकत नाही, पाणी जिला भिजवू शकत नाही आणि खाणे-पिणे तर दूर पण या
पृथ्वीवर निर्माण झालेली कोणतीही वस्तू तिला स्पर्शही करु शकत नाही. असे सनातन कसे
होईल?
अशाच काही वाईट रूढी
अर्जुनाच्या काळात रूढ होत्या व अर्जुन त्यांच्या आहारी गेला होता व म्हणून त्याने
विलाप करीत, शोक करीत नम्रपणे
सांगितले की, कुलधर्म हाच सनातन
धर्म आहे आणि या युद्धामुळे हा सनातन धर्म नष्ट होईल. कुलधर्म नष्ट झाल्याने
आम्हांला अनंतकालपर्यंत नरकवास भोगावा लागेल. यावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला
सांगितले अर्जुना, तुझ्यामध्ये
हे अज्ञान कोठून उत्पन्न झाले? येथे
ती कुरुढी आहे म्हणून श्रीकृष्णांनी त्याचे निराकरण केले, खंडन केले व सांगितले की, आत्मा हाथ सनातन आहे. जर तुम्ही आत्म्याचा मार्ग जाणत नसाल
तर सनातन धर्मामध्ये तुमचा अद्याप प्रवेश झाला नाही असे समजावे.
जर हा सनातन शाश्वत आत्मा
सर्वाच्या शरीराला व्यापून आहे. तर मग कोणाचा शोध घ्यायचा? यावर श्रीकृष्ण म्हणतात
तस्मादेवं विदित्वनं
नानुशोचितुमर्हसि ।। २५ ।।
हा आत्मा अव्यक्त आहे, तो इंद्रियांना अगोचर आहे. इंद्रियांच्याद्वारे आत्म्याचे
स्वरूप समजू शकत नाही किंवा जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही.
अर्थात इंद्रिय व विषय यांचा संयोग जोपर्यंत असतो, तोपर्यंत आत्म्याचे अस्तित्व असते; परंतु त्याचा स्पष्ट बोध होत नाही. तो अचिंत्य आहे, अकल्पनीय आहे. तोपर्यंत मन आणि मनातील विचार व भावनांचे
तरंग आहेत, तोपर्यंत तो शाश्वत
आहे,
परंतु आम्ही त्याला पाहू शकत नाही, त्याचा उपभोग घेवू शकत नाही. किंवा त्यात डोकावू शकत नाही.
कारण तो मनालाही अगोचर आहे. व म्हणून मनाचे नियमन करणे, मनाचा निरोध करणे आवश्यक आहे.
श्रीकृष्णांनी यापूर्वी
सांगितले आहे की, असत्
वस्तूला अस्तित्व नसते, ती शाश्चत
नसते,
ती क्षणभंगूर असते आणि जे सत् म्हणजे सत्य आहे ते तिन्ही
काळात शाश्वत असते, तिन्ही
काळात त्याचा अभाव नसतो. ते सत् म्हणजे आत्मा आहे. हा आत्माच अपरिवर्तनशील, शाश्वत सनातन व अव्यक्त आहे, अगोचर आहे. या गुणधर्मांनी युक्त असणाऱ्या आत्म्याला फक्त
तत्त्वदर्शी लोक पाहू शकले; परंतु
विद्वान पंडित किंवा वैभवसंपन्न असणारा मनुष्य त्याचे स्वरूप पाहू शकला नाही.
परंतु तत्त्वदर्शी लोकमात्र त्याला पाहू शकले आहेत. श्रीकृष्णांनी पुढे सांगितले
आहे की,
तत्त्व म्हणजेच परमात्मा होय. मनाच्या निरोधकालात साधक या
परमात्म्याचे दर्शन घेऊ शकतो, त्याच्यात
प्रवेशही करू शकतो, जेव्हा
साधकाला परमात्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा स्वतःचा आत्माही ईश्वरीय गुणांनी
युक्त असल्याचे त्याला दिसते. हा आत्मा सत्य सनातन आहे व परिपूर्ण असल्याचे त्याला
समजते,
तो अचिंत्य अकल्पनीय आहे हे तो जाणतो. आत्मा हा असा
आर्थित्य,
अगोचर व अधिकारी आहे. तो न बदलणारा आहे म्हणून श्रीकृष्ण
अर्जुनाला सांगतात की, आत्म्याचे
हे स्वरूप जाणून नश्वर शरीराबद्दल शोक करण्याचे सोडून दे. आता श्रीकृष्ण अर्जुनाला
त्याच्या विचारात असणारा विरोधाभास दाखवून अर्जुनाने शोक करणे कसे अयोग्य आहे, ते पुढे सांगत आहेत. अनित्यानित्यं वा मन्यसे मृतम् ।
तथापि त्वं महाबाहो नैवं
शोषितुमर्हसि ।। २६ ।।
हे अर्जुना, तथापि हा आत्मा नेहमी जन्म घेतो व नित्य मरतो असे जरी तुला
वाटत असेल तरीदेखील; हे
महाबाहो तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण
जातस्य हि यो मृत्यु
जन्ममृतस्य च तस्मादपरिहार्थेऽर्थे न त्वं शोषितुमर्हसि ।। २७ ।।
जो जन्मला आहे त्याचा
मृत्यू निश्चित आहे व जो मृत्यू पावला आहे
त्याला जन्म निश्चित आहे.
जन्ममृत्यूचे हे चक्र असेच फिरत राहणार आहे; तेव्हा ज्यावर काही उपाय नाही, जी गोष्ट अटळ आहे त्याचा शोक करणे अयोग्य आहे. असा शोक करणे
म्हणजे दुसऱ्या दुःखाला आमंत्रित करण्यासारखे आहे.
अव्यक्तादीनि भूतानि
व्यक्तमध्यानि भारत
अव्यक्तनिधनान्येव तत्र का
परिदेवना।।२८।।
अरे अर्जुना, ही सर्व भूते- हे सर्व प्राणिमात्र जन्माच्या म्हणजे
उत्पत्तीच्या पूर्वी अव्यक्त असतात, अशरीरी असतात आणि मृत्यूनंतरही ते अव्यक्तच असतात, अशरीरीच असतात. म्हणजे जन्माच्या पूर्वी व मृत्यूनंतर हे या
प्राणिमात्रांचे स्वरूप अव्यक्तच असते. फक्त जन्ममृत्यूच्या मधल्या काळात
प्राणिमात्र शरीर धारण करीत असतात. म्हणजे त्यांची ही मधली स्थिती फक्त दृश्य असते
व्यक्त असते. तेव्हा या परिवर्तनाबद्दल तू व्यर्थ चिंता किंवा शोक करु नयेस.
यापुढे या अव्यक्त आत्म्याला कोण कशा प्रकारे पाहतो ते सांगितले आहे.
आर्यवत्पश्यति कश्चिदेन
मावदति तथैव धान्यः ।
आश्चर्यचैनमन्यः शृणोति
मुत्वाप्येनं वेद न चैव
कश्चित् ||२९||
या पूर्वी श्रीकृष्णांनी
म्हटले होते की तत्त्वदर्शी लोक या आत्म्याला पाहू शकतात. परंतु आता हे म्हणतात
तत्त्वदर्शन करणारे लोक हे महापुरुष असतात व ते फार विरळ असतात आणि असे काही
महापुरुष या आत्म्याकडे आश्चर्य म्हणून अद्भुत वस्तू म्हणून पाहतात. केवळ ऐकत
नाहीत तर त्याला प्रत्यक्ष पाहतात. तर दुसरे काही महापुरुष आश्चर्यकारक म्हणून
त्याचे वर्णन करतात. अर्थात जे पाहू शकतात तेच त्याचे यथार्थ वर्णन करू शकतात.
दुसरे काही साधक त्याला आश्चर्यकारक म्हणून त्याच्याविषयी ऐकतात. सर्वांनाच असे
ऐकता येत नाही कारण ही गोष्ट फक्त अधिकारी साधकांनाच साधते इतरांना नाही. अरे
अर्जुना,
कोणी कोणी तर ऐकूनही या आत्म्याला मुळीच जाणू शकत नाहीत
कारण त्यांची तेवढी कठोर साधना नसते. व कठोर साधना नसेल तर मनाचा निरोध कोठून
होणार?
मग तुम्ही लक्षावधी ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या, समजून घेतल्या, अगदी केसाची शेंडी उपटून तुम्ही एखादी गोष्ट समजून घेतलीत
किंवा समजून घेण्याची दुर्दम्य इच्छा ठेवलीत तरी मोह मोठा प्रबल असतो. त्यामुळे
सर्व ऐकून, समजून घेऊनही थोडया
वेळाने तुम्ही तुमच्या सांसारिक उद्योगात मग्न होत असता. शेवटी श्रीकृष्ण निर्णय
देतात
देही नित्यमवध्योऽयं देहे
सर्वस्य भारत। तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोधितुमर्हसि ||३०||
अरे अर्जुना, सर्वांच्या शरीरात राहणारा आत्मा हा अवध्य असतो. त्याला
कधीही मारता येत नाही. तो अभंग असल्याने त्याला तोडता किंवा कापता येत नाही.
तेव्हा कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करु नकोस.
सनातन या त -सत्याचे
प्रतिपादन करून, त्याच्या महानतेचे
वर्णन करून हा प्रश्न आता येथे संपत आहे. आता प्रश्न असा आहे की या सनातन सत्याची
प्राप्ती कशी होईल? संपूर्ण
गीतेत याच्या प्राप्तीचे दोनच मार्ग सांगितले आहेत- एक निष्काम कर्मयोग आणि दुसरा
ज्ञानयोग. दोन्ही मार्गात केले जाणारे कर्म एकच आहे. त्या कर्माच्या अनिवार्यतेवर
भर देत योगेश्वर श्रीकृष्ण पुढे ज्ञानयोगाबद्दल सांगत आहेतस्वधर्ममपि आवेश्य न
विकम्पितुमर्हसि । धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते ।।३१।।
अर्जुना, तुझ्या स्वधर्माचा विचार केलास तरी तुला घाबरण्याचे काहीच
कारण नाही, कारण तुझा क्षात्रधर्म
आहे. व क्षत्रियांना धर्मयुद्धाहून अधिक श्रेयस्कर परम कल्याणकारी असा दुसरा
कोणताही मार्ग नाही. आतापर्यंत 'आत्मा
शाश्चत आहे', 'आत्मा
सनातन आहे', 'तोच
एकमात्र धर्म आहे' असे
सांगितले गेले आहे. आता प्रश्न असा की तो स्वधर्म कसा? एकमात्र आत्मा म्हणजे धर्म आहे व तो तर अचल आहे, स्थिर आहे मग धर्माचरण म्हणजे काय? आत्म्याकडे जाण्याचा जो मार्ग त्याला आत्मपथ म्हटले जाते व
या मार्गाकडे जाण्याची प्रवृत्त होण्याची प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळी
असते. मनुष्यस्वभावातून उत्पन्न होणाऱ्या या क्षमतेला स्वधर्म असे म्हटले गेले
आहे.
आत्म-पथावर चालणाऱ्या
साधकांना त्यांच्या स्वभावाच्या क्षमतेप्रमाणे महापुरुषाने चार श्रेणीत विभागले
आहे- शूद,
वैश्य, क्षत्रिय
आणि ब्राह्मण, या त्या चार श्रेणी
साधनेच्या प्राथमिक अवस्थेत प्रत्येक साधक शूद असतो म्हणजेच तो अल्पज्ञ असतो.
तासनतास भजनाला बसून तो एक दहा मिनिटेही स्वतःसाठी प्राप्त करु शकत नाही. तो
प्रकृतीचे मायाजाळही भेटू शकत नाही. या अवस्थेमध्ये महापुरुषांची सेवा केल्यास
त्याच्या स्वभावात सद्गुणांचा प्रादुर्भाव होतो व मग तो वैश्य श्रेणीचा साधक बनतो.
आत्मिक संपत्ती हीच स्थिर संपत्ती आहे व या अवस्थेत साधक या संपत्तीचा हळूहळू संग्रह
करण्यास व गोपालन म्हणजे इंद्रियांचे रक्षण करण्यास तो सक्षम बनतो काम-क्रोध
इत्यादी विकारांनी इंद्रियांची हिंसा होत असते, तर विवेक-वैराग्याने त्यांचे संरक्षण होत असते. परंतु
प्रकृतीला निर्वाज करण्याची क्षमता त्याच्यात असत नाही. क्रमशः उन्नती करता करता
साधकामध्ये तिन्ही गुणांशी प्रतिकार करण्याची क्षमता म्हणजेच क्षत्रियत्व
त्याच्यामध्ये निर्माण होते. या अवस्थेत प्रकृती व तिच्या विकारांना नष्ट करण्याची
क्षमता साधकामध्ये निर्माण होते व म्हणून युद्धाला येथूनच आरंभ होतो. क्रमशः साधना
करीत करीत साधक शेवटी ब्राह्मणत्वाची श्रेणी प्राप्त करतो. या अवस्वत मनोनिग्रह
इंदियदमन,
धारावाही चिंतन, सरलता, अनुभव
व ज्ञानप्राप्ती ही लक्षणे
साधकामध्ये प्रकट झालेली
दिसून येतात. या प्रकारे साधना करीत करीत साधक शेवटी ब्रह्ममय होऊन जातो की जेथे
त्याचे ब्राह्मणत्वही उरत नाही.
विदेश नगरीचा राजा जनक
याच्या दरबारात महर्षी याज्ञवल्क्य यांनी चक्रायाण, उबस्ती, कोल, आरुणी, उद्दालक
व गार्गी यांच्या प्रश्नांचे समाधान करताना सांगितले की, ज्याला आत्मसाक्षात्कार होतो तोच ब्राह्मण असतो. लोक-परलोक
व समस्त प्राण्यांच्या अंतरंगात आत्म्याचाच अधिकार चालत असतो. सूर्य, चंद्र, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, तारांगण, अन्तरिक्ष, आकाश
एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षण आत्म्याच्या अधिपत्याखाली आहे. हा तुमचा आत्मा
अन्तर्यामी अमृतमय आहे अमर आहे. तो अक्षर आहे व त्याच्याहून भिन्न असणारे सर्व
नाशवंत आहे. या मृत्युलोकात राहणाऱ्या कोणत्याही साधकाने या' अक्षर' आत्म्याला
न जाणता हवन केले, तप केले, हजारो वर्षे यज्ञकर्म केले तरी ते सर्व कर्म व्यर्थ आहे. या
अक्षरतत्त्वाला न जाणता जो कोणी मरतो तो दयनीय आहे. कृपण आहे. आणि जो या अक्षराचे
ज्ञान प्राप्त करून घेऊन मग मरतो तो ब्राह्मण आहे. (बृहदारण्यकोपनिषद ३/४-५-७-८)
येथे अर्जुन हा क्षत्रिय
श्रेणीचा साधक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो क्षत्रिय आहे त्याला युद्धाच्या व्यतिरिक्त दुसरा
श्रेयस्कर, कल्याणकारी मार्गच
नाही,
पण क्षत्रिय म्हणजे काय? प्रायः जन्माने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद असे समजले जाते. म्हणजे जातीनुसार हे वर्ग पाडले गेले
आहेत. यालाच चार वर्ण असे म्हणतात. परंतु हे बरोबर नव्हे. शास्त्रकारांनी स्वतः
क्षत्रिय म्हणजे काय? वर्ण
म्हणजे काय? हे सांगितले आहे. त्या
ठिकाणी त्यांनी फक्त क्षत्रियांचे नाव घेतले आहे व मग अठराव्या अध्यायापर्यंत वर्ण
म्हणजे नेमके काय याचे समाधानकारक उत्तर दिले आहे. या वर्णामध्ये कसे परिवर्तन
झाले आहे हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
श्रीकृष्णांनी सांगितले, 'चातुर्वण्य मया सुष्टं चारी वर्गांची सृष्टी मी निर्माण
केली आहे. म्हणजे सर्व लोकांना या चार वणांत विभागले असे समजायचे का? श्रीकृष्ण म्हणतात नाही, गुणकर्म विभागशः' गुणांच्या माध्यमातून कर्माची चार भागात विभागणी केली, आता ज्या कर्माची विभागणीकेली ते कर्म म्हणजे काय आहे ते
पाहणे आवश्यक आहे. गुण परिवर्तनशील आहेत आणि उचित साधनेद्वारे तामस गुणातून राजस
गुणात व राजसमधून सात्त्विक गुणात प्रवेश मिळत जातो व शेवटी साधक स्वभावाने गुणाने
ब्राह्मण बनतो. त्यावेळी ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवून देणारी योग्यता त्या
साधकामध्ये असते. वर्ण संबंधी प्रश्नाला येथे आरंभ होतो आणि अठराव्या
अध्यायात तो पूर्ण होतो. श्रीकृष्णाचे
म्हणणे मत असे आहे श्रेयान्स्वधर्मों विगुणः
परमधर्मास्यनुष्ठितात
स्वभावतः उत्पन्न झालेल्या या धर्मप्रवृत्तीची क्षमता ज्या स्तरावरील असेल, ती भले गुणरहित शूद श्रेणीची असली तरी ती परम कल्याणकारी
असेल,
कारण आपण क्रमशः तेथूनच आपल्या उत्थानाची सुरुवात करीत असतो; आपल्यापेक्षा वरच्या लोकांची नक्कल केल्याने साधक नष्ट होऊन
जातो. येथे अर्जुन क्षत्रिय वर्गातील साधक आहे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की, अर्जुना, अरे
तुझा स्वभावधर्म व स्वभावानुरूप तुझी योग्यता, आणि युद्धामध्ये प्रवृत्त होणारी तुझी क्षमता पाहून असे
वाटते की तू वृञ्चा भय बाळगू नयेस. क्षत्रियाला याच्या इतका दुसरा कल्याणकारी
मार्ग,
श्रेयस्कर कर्म दुसरे कोणतेही नाही. याच विषयावर प्रकाश
टाकीत योगेश्वर कृष्ण पुढे म्हणतात
यदृच्छया खोपपन्न
स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ
लभन्ते युद्धमीदृशम् ||३२।।
पार्थिव शरीराला रथ बनवून
अचूक लक्ष्यवेध करणाऱ्या अर्जुना, दैवयोगे
आपोआप उघडले गेलेले स्वर्गाचे द्वाररूपी हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभत
असते. क्षत्रिय श्रेणीतील साधकांमध्ये तिन्ही गुणांवर विजय मिळविण्याची क्षमता
असते. त्यांच्यामध्ये सामावलेली असल्याने त्यांच्यासाठी स्वर्गाचे-द्वार नेहमी
उपडलेले असते. स्वर्गलोकात भ्रमण करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. क्षेत्र
क्षेत्रज्ञांचे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच प्राप्त होत असते कारण
त्यांच्यातच संघर्ष करण्याची शक्ती असते.
जगात अनेक लढाया होत असतात
ते सर्व संकुचित होऊन अविवेकाने लढत राहतात. अनेक जाती लढतात. परंतु या सर्व
युद्धात जिंकणाऱ्यालाही
शाश्वत विजय मिळत नाही. हे
कसले लढणे? हा तर सूड आहे. जो
ज्याला जितका दाबण्याचा चिरडण्याचा प्रयत्न करतो, कालान्तराने तो तितकाच दबला जातो. ही कसली लढाई? व हा कसला विजय? येथे स्वर्गप्राप्तीऐवजी इंद्रियांना पीडा देणारा शोक, दुःख निर्माण होत असते. शेवटी शरीरही नष्ट होते. वास्तविक
संघर्ष तर क्षेत्र व क्षेत्रज्ञामध्ये असतो व एकदा विजय मिळवल्यावर प्रकृतीचे
कायमचे नियमन होते. म्हणजे उत्पत्तीच्या कारणाचा निरोध होतो व परम पुरुष
परमेश्वराची प्राप्ती होते. हा असा विजय आहे की त्यानंतर पराभव नसतो.
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं
संग्रामं न करिष्यसि । ततः स्वयम् कीर्ति च हित्वा पापमवाप्स्यसि ।।३३।।
तेव्हा असे हे 'धर्मयुद्ध की ज्यामुळे परमधर्म परमात्म्याची प्राप्ती होते; असा हा धर्मयुक्त संग्राम' तू केला नाहीस तर स्वधर्म म्हणजे स्वभावजात संघर्षाची
असणारी क्षमता तू गमावून बसशील व पापाचा धनी होऊन तुझी अपकीर्ती होईल. अपकीर्ती
कशी होईल हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात
अकीर्ति चापि
भूतानिभयाणापरतं मस्यन्ते त्वां महारथाः। येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि
लाघवम् ||३५ ।।
जे महारथी आजपर्यंत तुझ्या
यशाची,
पराक्रमाची वाखाणणी करीत होते, ज्यांच्या दृष्टीने तू महापराक्रमी होतास, ते सर्वजण तुझ्या या कृत्याने तुला तुच्छ लेखतील. तू केवळ
भीतीमुळे रणांगण सोडून पळालास अ समजून तुला ते भित्रा समजतील. हे महारथी कोण? आत्मपथाच्या मार्गावर खडतर परिश्रम घेत पुढे जाणारे साधक
जसे महारथी आहेत, त्याप्रमाणेच
अविद्येकडे खेचणारे काम, क्रोध, लोभ व मोहादी हे विकारही महारथीच आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला
म्हणतात की, ते सर्व महारथी तुझी
किंमत कमी समजू लागतील इतकेच नव्हे तर
अवाच्यवादोश्च बहून्
वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्य ततो
दुःखतरं नु किम् ॥३६॥
तुझे शत्रू तुझ्या
सामर्थ्याची, पराक्रमाची निंदा
करतील व जे बोलू नये असे पुष्कळ बोलतील. अरे, मनुष्यात एखादा दोष दिसला की चारी बाजूंनी निंदेचा व अपशब्दांचा
त्याच्यावर वर्षाव होतो व जे बोलू नये ते बोलून लोक उपहास करतात. अरे ह्यापेक्षा
अधिक दुःखदायक काय असू शकेल?
हतो वा प्राप्यसि स्वर्ग
जित्वा वा मोक्ष्यसे महीम्
।
तस्मादत्तिष्ठ कौन्तेय
बुद्धाय कृतनिश्चयः ।।३७।।
हे कुन्ती पुत्रा, तू युद्धात मेलास तर तुला स्वर्ग मिळेल. स्वर्गलोकात
बिहार करण्याची तुझ्यात
क्षमता येईल. परमेश्वरमय होण्यास सहाय्यभूत होणारी देवी संपदा तुझ्या हृदयात
पूर्णतः प्रवाहित होईल किंवा विजयी झालास तर पृथ्वीचे राज्य भोगशील, महामहिम स्थिती तुला प्राप्त होईल. म्हणून अर्जुना युद्धाचा
निश्चय करुन ऊठ. साधारणतः लोक या ब्लोकाचा अर्थ असा समजतात की जर युद्धात तू मेलास
तर तुला स्वर्गप्राप्ती होईल व जिंकलास तर या पृथ्वीतलावरील राज्य
प्राप्त होईल. परंतु
यापूर्वी अर्जुनाने स्पष्ट सांगितले आहे- "भगवान, केवळ पृथ्वीचेच नव्हे तर त्रैलोक्याचे राज्य मला प्राप्त
झाले किंवा देवतांचे स्वामीपद म्हणजे इंद्रपदाची जरी मला प्राप्ती झाली तरी माझ्या
इंदियांचे शोषण करणारा हा शोक जर नष्ट होणार नसेल तर मला ते काहीही नको. अरे, एवढेच जर या युद्धाने मिळणार असेल तर गोविंदा, हे युद्ध कशाला करायचे? मी ते मुळीच करणार नाही. तरीही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत
आहेत की,
अर्जुन, अरे
तू लढ. तू जिंकलास तर तुला पृथ्वीवरचे राज्य मिळेल व मेलास तर स्वर्ग मिळेल.
म्हणजे येथे श्रीकृष्णांनी अर्जुनाला नवीन काय सांगितले व काय दिले? अर्जुन सत्य व श्रेयाची इच्छा करणारा शिष्य होता. त्याला
सद्गुरु श्रीकृष्णांनी सांगितले की, ह्या क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांमधील संघर्षात जर शरीराचे
आयुष्य,
त्याचा अस्तित्वकाळ जर संपलेला असेल आणि त्यापूर्वी तुम्ही
तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकला नाहीत तरी तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल.
म्हणजेच स्वर्गात विहार करण्याची क्षमता तुम्हाला प्राप्त होईल, तुमच्यात दैवी सम्पदा समाविष्ट होईल आणि जर या संघर्षात
तुम्ही यशस्वी व्हाल (शरीरासह ) तर तुम्हाला 'महीम' म्हणजे
सर्वात महान ब्रह्माच्या महिम्याचा उपभोग घेऊ शकाल, म्हणजेच 'महामहिम' स्थिती प्राप्त करु शकाल. म्हणजे जिंकलात तर सर्वस्व म्हणजे
महामहिमत्व प्राप्त करु शकाल व हरलात तर देवत्व प्राप्त करु शकाल म्हणजे युद्ध
केल्याने संघर्षात भाग घेतल्याने दोन्ही हातात लाडू प्राप्त होणार आहेत. म्हणजे
लाभातूनही लाभ आणि हानीतूनही लाभच मिळणार आहे यावरच भर देत श्रीकृष्णही पुढे म्हणत
आहेत
सुखदुःखे समे कृत्वा
लाभालामी जयाजयी । ततो युद्धाय युज्यस्य नैवं पापमवाप्स्यसि ।।३८।।
अर्जुना, या प्रकारे सुख-दुःख लाभ-हानि आणि जय-पराजय हे सारखेच समजून
तू युद्धाला तयार हो. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. म्हणजे येथे सुखामध्ये
सर्वस्वप्राप्ती व दुःखात देवत्वाची प्राप्ती होणार आहे. लाभामध्ये महीमत्व आणि
पराजयात दैवी संपदेवर अधिकार प्राप्त होईल, तेव्हा आपला लाभ अनुकसान यांचा साकल्याने विचार करून तू
लढायला तयार हो, लढण्याने दोन्ही
प्रकारे तुझा फायदाच आहे व लढण्याने तुला पाप लागणार नाही व म्हणून तू युद्धाला तयार
हो,
बुद्धया युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ।।३९।।
हे अर्जुना, तुला येथपर्यंत सांख्यमागांतले ज्ञान सांगितले. ज्ञानयोगाती
बुद्धिविषयी सांगितले. तू म्हणशील कसली बुद्धी ? कसले ज्ञान? तर युद्ध कर हेच ज्ञानयोग म्हणजे काय? तर आपल्या जीवनाकडे बघून, लाभहानीचा नीट विचार करावा की बात आपण जिंकलो तर महामहिम
स्थिती प्राप्त होईल आणि हरलो तर देवत्त्व मिळेल. म्हणजे दोन्हीकडून लाभ मिळेल व
युद्ध नाही केले तर सर्व लोक आपला उपहास करतील. आपण भयाने रणांगणातून पळून गेलो
असे समजतील व मग आपली अपकीर्ती होईल. अशा प्रकारे आपले अस्तित्व समोर ठेवून विचार
करणे व युद्ध करायला तयार होणे हाच ज्ञानयोग आहे.
साधारणतः लोकांचा असा
गैरसमज असतो की ज्ञानमार्गात कर्म युद्ध) करावे लागत नाही. ते म्हणतात की
ज्ञानयोगात कर्म असतच नाही. मी तर 'शुद्ध आहे', मी
बुद्ध आहे', मी चैतन्य आहे"
अहं ब्रह्मास्मि" गुण गुणातच मिसळतात' असे समजून ते स्वस्थ बसून राहतात. योगेश्वर श्रीकृष्णाच्या
मते हा ज्ञानयोग नाही. ज्ञानयोगातही तेच कर्म करावे लागते जे निष्काम कर्मयोगात
केले जाते. दोन्ही मार्गामध्ये फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे. ज्ञानमार्गी मनुष्य
आपली स्थिती समजून आपल्या स्वत:च्या सामर्थ्यावर राहून कर्म करीत असतो. दोन्ही
भागांत कृती आहे. आणि ते कर्मही एकच आहे. आणि ते कर्म दोन्ही मार्गात करावेच
लागते. केवळ कर्म करण्याचे दृष्टिकोन दोन आहेत.
अर्जुना, याच विचारांना कर्मयोगाच्या संदर्भात ऐक. ह्या ज्ञानाने
कर्मबंधनाचा नाश होईल. इथे श्रीकृष्णाने कर्माचे नाव प्रथम घेतले आहे. परंतु येथे
कर्म म्हणजे काय हे स्पष्ट केलेले नाही. कर्म म्हणजे काय सांगितलेले नसले तरी त्या
कर्माची विशेषता, वैशिष्ट्ये
यावर त्यांनी पुढे प्रकाश टाकला आहे.
नेहाभिक्रमनाशोऽस्ति
प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य
जायते महतो भयात् ।।४०।।
ह्या निष्काम कर्मयोगामध्ये
आरंभिलेल्या कार्याचा अर्थात बीजाचा नाश होत नाही. यामध्ये निष्कामभावाने कर्म
केलेले असल्याने मर्यादित कर्मफलाचा दोष येथे उत्पन्न होत नाही. तेव्हा या निष्काम
कर्माचे म्हणजेच या कर्मयोगाचे, या
धर्माचे अल्प आचरणही जन्म-मृत्यूरूपी महान भयापासून रक्षण करते. तुम्ही हा कर्मयोग
समजून घ्या. याप्रमाणे थोडे तरी आचरण करा. बीज रुजवा. अर्जुना हे बीज कधीच नष्ट
पावत नाही. या जड प्रकृतीमध्ये .या बीजरूपी सत्याला नष्ट करण्याची क्षमता नसते
किंवा ते सत्य पुर्णपणे नष्ट करण्याचे कसले शस्त्रही तिच्याजवळ नसते. प्रकृती
त्यावर आवरण घालू शकते किंवा थोडी अडवणूक करू शकते, परंतु आरंभिलेल्या कर्माला नष्ट करू शकत नाही.
पुढे श्रीकृष्ण म्हणतात की
अगदी महाभयंकर पापीसुद्धा या ज्ञानरूपी नौकेने नि:संदेह तरून जाऊ शकतो. नेमकी हीच
गोष्ट येथे सांगितली आहे. ते म्हणतात हे अर्जुना, निष्काम कर्मयोगाचे बीजारोपण कर या बीजाचा कधीही नाश होत
नाही,
किंवा यात कर्मयोगाने विपरीत फळरूपी दोषही प्राप्त होत
नाही. स्वर्ग, ऋद्धी, सिद्धी तुम्हाला देऊन हा योग तुम्हाला मध्येच सोडून देत
नाही व तुम्ही जरी हा योग मध्येच सोडून दिलात तरी तो तुमचा उद्धारच करतो. या
धर्माचे,
या निष्काम कर्मयोगाचे अल्पसे आचरण जन्म मृत्युरूपी महान
भयापासून रक्षण करते. अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परां गतिम् । हा कर्मयोग अनेक
जन्मानंतरही मनुष्याला परमगतीकडेच नेतो. याच संदर्भात श्रीकृष्ण पुढे म्हणतात
व्यवसायात्मिका बुद्धिरेह
कुरुनन्दन ।
निष्काम कर्मयोगात एकच
व्यवसायात्मक म्हणजेच निश्चयात्मक बुद्धी असते व नायव परिणामही एकच असतो. यामुळे
आत्मिक संपत्तीचा विकास होतो. ही आत्मिक संपदा स्थिर असते. ही आत्मिक संपदा
प्रकृतद्वंद्रामध्ये हळूहळू स्थापित करणे यालाच व्यवसाय किंवा निश्चय म्हणतात.
परंतु ज्यांच्याजवळ ही निश्चयात्मक बुद्धी नसते, म्हणजे जे लोक अनेक प्रकारच्या इच्छा ठेवतात, ते लोक भजन-पूजन करू शकत नाहीत असे श्रीकृष्णांचे म्हणणे
आहे कारण त्यांच्या बुद्धीला अनेक प्रकारचे फाटे फुटलेले असतात.
यामिमां पुष्मितां वार्च
प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ
नान्यदस्तीति वादिनः ||४२ ||
कामात्मानः स्वर्गपरा
जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुल
भोगैश्चर्यगति प्रति ||४३||
हे पार्था, विषयभोगात तत्पर असणारे, वेदाच्या अर्थवादात रस असणारे, स्वर्गसुख हेच परमलक्ष्य मानून त्याखेरीज दुसरे मोठे सुख
नाही असे समजणारे व सांगणारे तुटपुंजे ज्ञान असणारे, असे अविवेकी लोक जन्ममृत्युफल देणारी व भोग व ऐश्वर्य
यांच्या प्राप्ती संबंधात जिच्यामध्ये पुष्कळ कर्म .सांगितले आहे अशी वेदवचने
सांगतात व वेदाच्या पुष्पित, रोचक
वाणीच्या आधाराने ते बोलतात. या अविवेकी लोकांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असते.
त्यामुळे ते कर्मफल सांगणाऱ्या वेदवाक्यांना प्रमाण मानतात, स्वर्गाला श्रेष्ठ समजतात. त्यांची बुद्धी अनंत भेदांनी
युक्त असल्याने ते अनेक कर्मकांडात मग्न असतात, ते परमेश्वराचे नाव घेत असतात, परंतु विविध कर्मकांड करीत असतात. मग ही कर्मकांडे, अनेक प्रकारची कर्मानुष्ठाने म्हणजे कर्म नव्हे का? श्रीकृष्ण म्हणतात नाही कर्मकांडे म्हणजे कर्म नव्हे? मग ती एक निश्चित क्रिया आहे का? यावर त्यांनी येथे काही सांगितले नाही. ते एवढेच इथे
म्हणतात की अविवेकी लोकांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असल्याने विविध प्रकारच्या
कर्मकांडात ते व्यस्त असतात व त्यासाठी वेदवाक्याचे प्रमाण देऊन रोचक वाणीत ते
आपले म्हणणे व्यक्तही करतात. मग याचा परिणाम काय होतो?
व्यवसायात्मिका बुद्धिः
समाधी न विधीयते ॥ ४४
अर्जुना, वेदाच्या अर्थवादात मग्न झालेल्या व वेदवाक्य प्रमाण मानून
रोचक वाणीत बोलणाऱ्या लोकांच्या वाणीने प्रभावीत झालेल्या लोकांची विवेकबुद्धी
नष्ट होते. त्यांना काहीही प्राप्त होत नाही. त्या वाणीने मोहित झालेले लोक
इंद्रिय भोगात आणि भौतिक ऐश्वर्यात अतिशय आसक्त होतात. अशा पुरुषांच्या अंत:करणात
कार्याकार्याचा निश्चय करणारी बुद्धी उद्भवत नाही. भगवंताच्या ठिकाणी टूढ होणारी, स्थिर होणारी बुद्धी त्यांच्यात निर्माण होत नाही.
अशा या अविवेकी लोकांची
वाणी कोण ऐकते? तर भौतिक
विषयभोगात-इंद्रिय भोगात व ऐश्वर्यात जे आसक्त झालेले आहेत तेच लोक अविवेकी
लोकांचे बोलणे ऐकतात. अधिकारी, विवेकी, स्थिर बुद्धीचे लोक त्यांच्या बोलण्याने मोहित होत नाहीत, परंतु अविवेकी लोक मात्र मोहित होतात व त्यामुळे आत्मसुख
देणारी,
आदितत्त्वात प्रवेश देणारी निश्चयात्मक बुद्धी त्यांच्यात
निर्माण होत नाही. त्यांचे चित्त आत्मज्ञानात कधीही स्थिर होऊ शकत नाही.
प्रश्न असा निर्माण होतो की, वेदवादरतः 'जे वेदाच्या अर्थवादात मग्न असतात तेही चूक करतात का? यावर श्रीकृष्ण म्हणतात
प्रैगुण्यविषया वेदा
निलैगुण्यो भवार्जुन। निन्द्रो नित्यसत्त्वस्थ नियोगक्षेम आत्मवान् ।।४५॥
हे अर्जुना, 'प्रैगुण्यविषया वेदा' म्हणजे त्रिगुणांनी युक्त असणारे वेद प्रकृतीच्या तीन गुणांबाबतीतच प्रतिपादन करतात. त्यांच्या पुढचे त्यांनाही माहीत नसते. तेव्हा निस्वैगुण्योभवार्जुन तू त्रिगुणातीत हो. त्रिगुणांच्या अनुभवापलीकडे जा. पण कशा प्रकारे? यावर श्रीकृष्ण म्हणतात 'ना सुखदुःखादी द्वंद्वापासून अलिप्त, सतत सात्त्विक गुणांनी संपन्न व योगक्षेमादि स्वार्थात न पडता म्हणजेच त्या संबंधीच्या काळजीतून मुक्त हो आणि आत्म्यात स्थिर हो, आत्मनिष्ठ हो. श्रीकृष्ण म्हणतात, जो अशा प्रकारे त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन आत्मनिष्ठ बनतो तो ब्रह्म म्हणजे काय ते जाणू शकतो व बझाला जाणतो,
तोच विप्र होय. तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः
॥४६॥
चोहोकडून परिपूर्ण भरलेले
जलाशय प्राप्त झालेल्या मनुष्याला लहान जलाशयाची जेवढी उपयुक्तता, जेवढे प्रयोजन असेल तेवढेच ब्रह्म जाणणान्या ज्ञानसंपन्न
ब्राह्मणाला वेदांचे प्रयोजन असते. तात्पर्य हेच की जो वेदार्थाचा विचार करुन
त्यातील इष्ट तेवढेच ग्रहण करतो, म्हणजेच
जो वेदांच्या पलीकडे जातो व जो ब्रह्माला जाणतो तोच ब्राह्मण होय. तेव्हा हे
अर्जुना तू सुद्धा असा सात्विक गुणांनी संपन्न होऊन वेदांच्या पलीकडे जा व
ब्राह्मण बन
अर्जुन जन्माने क्षत्रिय
होता आणि येथे श्रीकृष्ण म्हणतात ब्राह्मण बन. हे कसे काय ? ब्राह्मण क्षत्रिय इत्यादी वर्ण म्हणजे मनुष्य स्वभावातील
क्षमतेचे सामर्थ्याचे नाव आहे. हे वर्ण कर्मप्रधान आहेत. ते जन्माने रूढ होणारी
रूढी नव्हे. ज्याला गंगेत डुबण्याची संधी मिळाली त्याला जलाशयाचे काय प्रयोजन? त्या प्रकारे ज्याने ब्रह्माला साक्षात जाणले आहे त्या
आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला, त्या
ब्रह्माणाला, वेदांचे तेवढेच
महत्त्व असते, तेवढेच त्याचे त्यांना
प्रयोजन असते. मात्र त्यांची गरज तर असतेच. कारण मागून येणाऱ्यांना त्यांची गरज
असते. आता येथून कर्मयोगाच्या चर्चेला आरंभ होईल म्हणजे कर्म करताना कोणती दक्षता
घेतली पाहिजे, याचे यापुढे
श्रीकृष्णांनी प्रतिपादन केले आहे.
कर्मण्येवाधिकारस्ते मा
फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूमा से संगोऽस्त्वकर्मणि ।।४७।।
अर्जुना, तुझा अधिकार फक्त कर्म करणे एवढाच आहे. कर्मफलाचा
तुला अधिकार नाही. अरे, तू असे समज की तू केलेल्या कर्मापासून फळ
मिळणारच नाही. म्हणून तू
कर्मफळाला हेतु भूत होऊ नकोस, म्हणजेच
माझ्या कपचे अमुक फळ मला मिळाले असा हेतू तू मनात ठेवू नकोस आणि कर्म न
करण्याविषयी मनाचा कल होऊ देऊ नकोस. म्हणजेच कर्माबद्दल अश्रद्ध बनू नकोस. योगश्वर
श्रीकृष्णांनी एकोणचाळीसाव्या श्लोकात प्रथम क्रमांचा उच्चार केला. परंतु तेथे हे
कर्म म्हणजे काय व ते कसे करावे हे सांगितले नाही. त्या कर्माच्या वैशिष्ट्यांवर
या श्लोकात विवरण केले आहे.
(१) हे अर्जुना, अशा प्रकारच्या कर्मामुळे तू सर्व प्रकारच्या बंधनातून
मुक्त होशील.
(२) अर्जुना, या कर्मात बीजाचा नाश होत नाही. कर्माचा आरंभ केल्यानंतर
त्या कर्माला नष्ट करण्याची शक्ती प्रकृतीजवळ नाही.
(३) अर्जुना, स्वर्ग, ऋद्धी
सिद्धी प्राप्त करून देणारे मर्यादित फलरूपी दोषही या कर्मामध्ये नाहीत.
(४) या कर्माच्या अल्प
आचरणाने मनुष्याचा जन्म-मृत्यु सारख्या भयावह
संकटातून बचाव होतो. त्याचा
उद्धार होतो.
परंतु श्रीकृष्णांनी ते
कर्म आहे कसे हे अद्याप सांगितलेले नाही. ते याच अध्यायातील एक्केचाळीसाव्या
श्लोकात त्यांनी सांगितले आहे.
(५) अर्जुना, यात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, कृतीही एकच असते. ज्यांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असते, त्यांच्या क्रीयाही अनेक असतात. असे लोक भगवंताचे भजन करू
शकत नाहीत का? यावर श्रीकृष्ण
म्हणतात की अनंत भेदांनी युक्त असणाऱ्या लोकांच्या बुद्धीला अनेक शाखा फुटलेल्या
असतात व हे लोक वेदांच्या पुष्पक-रोचक वाणीत त्या क्रीयांचे प्रतिपादन करत असतात.
या त्यांच्या वाणीचा प्रभाव ज्यांच्यावर पडतो त्यांची बुद्धी नष्ट होते. म्हणून
निश्चयात्मक क्रिया एकच असते, परंतु
येथे ती क्रिया कोणती ते मात्र सांगितले नाही.
सत्तेचाळीसाव्या श्लोकात
श्रीकृष्ण म्हणतात कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, पण त्याचे फळ भोगण्याचा किंवा फळाची अपेक्षा करण्याचा तुझा
अधिकार नाही. तेव्हा तू फळाची आसक्ती धरू नकोस व कर्म करण्यास अश्रद्ध बनू नकोस.
निरन्तर आत्म्याच्या ठिकाणी रत राहा. परंतु कर्म म्हणजे काय हे येथे सांगितलेले
नाही. साधारणतः लोक हा श्लोक उधृत करतात व म्हणतात काहीही करा पण त्याच्या फळाची
अपेक्षा करू नका. बस्स! झाला निष्काम कर्म योग! पण श्रीकृष्णांनी अद्याप कोणते
कर्म करावे हे सांगितलेले नाही. येथे फक्त कर्म काय देते व ते करताना कोणती दक्षता
घ्यावी यावर श्रीकृष्णांनी येथे फक्त प्रकाश टाकला आहे. मूळ प्रश्न कर्म म्हणजे
काय?
तो अजून तसाच आहे. त्याचे विवरण श्रीकृष्णांनी अध्याय तीन व
चारमध्ये केले आहे.
योगस्थः कुरु कर्माणि संगं
त्यक्त्वा धनंजय सिद्धियोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥४८॥
हे धनंजया कर्मफलाची आसक्ती
सोडून,
अभिलाषा सोडून, यशापयशाविषयी समतोल बुद्धी ठेवून तू कर्म कर. कोणते कर्म? तर निष्काम कर्म कर. 'समत्व योग उच्यते' म्हणजे मनाच्या या समतोलपणालाच योग असे म्हणतात. ज्या
कर्माविषयी मनात विषम भावना नाही त्याला समबुद्धी असे म्हणतात. ऋद्धी सिद्धी किंवा
कर्माविषयीची आसक्ती मनाचा समतोलपणा बिघडवत असतात. फळाची इच्छा फळाची अभिलाषा मनात
विषमता निर्माण करत असतात. त्यासाठी अर्जुना, फलाची अभिलाषा धरू नकोस, पण कर्म करण्यात अश्रद्धही होऊ नकोस. समोर दिसलेल्या किंवा
न दिसणाऱ्या सर्व वस्तुविषयीच्या आसक्तीचा त्याग करून, कर्मापासून होणारी प्राप्ती अप्राप्ती यांचा विचार न करता
फक्त योगयुक्त होऊन, तू कर्म
कर. योगामुळे चित्त विचलित होत नाही.
योग ही एक परम स्थिती आहे
आणि ती प्रारम्भिक स्थितीही आहे. प्रारंभी आपली दृष्टी लक्ष्यावर असायला हवी.
म्हणून योगावर दृष्टी ठेवून कर्माचे आचरण केले पाहिजे. समत्वभाव म्हणजे पूर्ण
किंवा अपूर्ण कर्माबद्दल समभाव ठेवणे. यालाच योग म्हणतात. कर्माच्या यशापयशाने
ज्यांची बुद्धी विचलित बनत नाही, ज्यांच्या
मनात हर्ष खेद म्हणजेच विषम भाव निर्माण होत नाही त्या समबुद्धीलाच योग असे म्हणतात.
विषयस्थितीत मनाचा समतोल बिघडत नाही म्हणून याला समत्व योग असे म्हणतात. सर्व
अभिलाषांचा येथे त्याग आहे, म्हणून
याला निष्काम कर्मयोग असे म्हटले गेले आहे. कर्म करावयाचे आहे म्हणून त्याला
कर्मयोग म्हटले जाते. येथे कर्म करताना कृष्णार्पण वृती ठेवावी लागते. ही
कृष्णार्पण वृती म्हणजे समर्पणाची वृती. यामुळे या प्रक्रीयेला योग असे म्हणतात.
या कर्मयोगात बौद्धिक पातळीवर अत्यंत दक्ष राहावे लागते, कारण यशापयशाविषयी मनाचा समतोल ठेवणे, कर्माविषयी आसक्ती न ठेवणे, कर्मफलाची अभिलाषा न राखणे, महत्वाचे असते व यालाच निष्काम कर्मयोग किंवा बुद्धियोग असे
म्हणतात.
हे धनंजया, 'अवरं कर्म' म्हणजे
निकृष्ट कर्म. हे निकृष्ट कर्म म्हणजेच आसक्तीयुक्त कर्म. ते बुद्धियोगापासून फार
दूर आहे. फलाची अभिलाषा ठेवणारे कृपण असतात. ते आत्म्यामध्ये परमात्म्यामध्ये कधीच
रत होत नाहीत. तेव्हा समत्व बुद्धियोगाचा आश्रय कर. अरे, इच्छेप्रमाणे फल मिळाले तरी त्यात कल्याण कोठून असणार? साधकाने तर मोक्षाचीही अभिलाषा ठेवता कामा नये कारण
वासनांपासून मुक्त होणे यालाच तर मोक्ष म्हणतात. फलप्राप्तीचा चिंतनाने साधकाचा
वेळ वृथा वाया जातो आणि फल प्राप्त झाल्यावर त्यामध्येच साधक गुंतून पडतो. त्याची
साधना तिथेच समाप्त होते. मग पुढे तो भगवंताचे भजन-पूजन काय करणार? तेथूनच तो विचलित होतो- कुमार्गाला लागतो. म्हणून समत्व
बुद्धीने योगाचे आचरण करा.
ज्ञानमार्गालाही
श्रीकृष्णाने बुद्धियोग म्हंटले होते व सांगितले होते की, अर्जुना, हा
बुद्धियोग तुला ज्ञानयोग सांगताना सांगितला होता आणि येथे निष्काम कर्मयोगालाही
बुद्धियोग म्हंटला आहे. वस्तुतः दोन्हीमधील दृष्टीकोन वेगळा आहे. ज्ञानयोगात
लाभ-हानीचा विचार करून, त्याची
चिकित्सा करून आचरण करावे लागते निष्काम कर्मयोगामध्ये बौधिक स्तरावर समत्व राखावे
लागते म्हणून त्याला समत्व बुद्धियोग असेही म्हटले जाते, व म्हणून हे अर्जुना, तू समत्व बुद्धियोगाचा आश्रय ग्रहण कर कारण फलाची अभिलाषा
ठेवणारे फार कृपण असतात.
बुद्धियुक्त जाती उभे
कृतकृते ।
तस्माद्योगाय पुज्यस्व योगः
कर्मसु कौशलम् ।।५०।।
साम्यबुद्धीने युक्त असणारे
पुरुष या लोकीच पाप व पुण्य या दोन्ही गोष्टींचा त्याग करतात. ते त्यात बद्ध होऊन
राहत नाहीत. म्हणून तू बुद्धियोग संपादन करण्यास तयार हो. योगः कर्मसु कौशलम
म्हणजे कर्माचरणात समत्व बुद्धिरूप योग साधणे हे खरे कौशल्य आहे.
या जगात कर्म करण्याच्या
दोन पद्धती आहेत. लोक कर्म करून फलाची अपेक्षा करतात किंवा फल मिळाले नाही तर ते
कर्म करूच इच्छितनसतात. योगेश्वर श्रीकृष्णांनी या प्रकारच्या कमाना बद्धकारक
समजले असून 'आराधने ला ते एकमात्र
कर्म समजत आहेत. या अध्यायात त्यांनी कर्माचा केवळ उच्चार केला आहे. तिसऱ्या
अध्यायातील सुरुवातीच्या श्लोकात त्याची परिभाषा दिली आणि चौथ्या अध्यायात कमांचे
स्वरूप विस्ताराने सांगितले आहे. प्रस्तुत श्लोकात श्रीकृष्ण सांसारिक परंपरेने
युक्त असणारे कर्म बाजूला ठेवून कर्म करण्याची कला सांगताना म्हणतात, 'तुम्ही अत्यंत श्रद्धायुक्त भावनेने कर्म करा; परंतु फलाचा मात्र स्वेच्छेने त्याग करा. मग कर्म कुठे जाईल? कर्म करणाऱ्याचे हे तर कौशल्य आहे. निष्काम साधकाची समग्र
शक्ती अशा प्रकारची कर्मे करण्यात खर्च होत असते. आराधना करायला शरीराची गरज असते
परंतु केवळ कर्मे करायची काय? ही
जिज्ञासासुद्धा स्वाभाविक आहे. अन्यथा सदैव कर्मच करायचे की त्याचा काही परीणामही
असू शकतो.
कर्मज बुद्धियुक्ता हि फलं
त्यक्त्वा मनीषिणः ।
अरे, बुद्धियोगी असे ज्ञानी पुरुष भौतिक कर्मापासून निर्माण
झालेल्या फलाचा त्याग करून जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होतात व अत्यंत निर्दोष, दुःखरहित असे अमृतमय स्थान प्राप्त करतात.
अर्जुनाची दृष्टी
प्रैलोक्याचे साम्राज्य व स्वर्गातील इंद्रपद पेचपर्यंत सीमित होती. या दोन्ही
गोष्टी प्राप्त झाल्या तरी तो युद्ध करायला तयार होत नव्ह येथे श्रीकृष्ण एक नवीन
गोष्ट त्याला सांगतात की, आसक्तीरहित, कर्मद्वारा अनामय, दुःखाच्या पलीकडील ब्रह्मानंद देणारे असे पद प्राप्त होते.
निष्काम कर्मयोगाने परमपदाची प्राप्ती होते, जेथे मृत्यूला प्रवेश नाही. अशा स्थानाची प्राप्ती होते.
परंतु अशा प्रकारचे करण्याची मनाची वृत्ती केव्हा होईल?
यदा ते मोहकलिल बुद्धिर्व्यतितरिष्यति । तदा गन्तासि निर्वेद श्रोतव्यस्य सुतस्य च ।।५२।।
हे
अर्जुना,
तेव्हा तुझी (अर्थात साधकाची बुद्धी मोहरूपी दलदलीतून
बाहेर पडेल, जेव्हा तिला धन, संतती व प्रतिष्ठा यांचा लेशमात्र मोह राहणार
नाही, या सर्व गोष्टीबाबत असणारी आसक्ती नाहीशी होईल त्यावेळी जे
ऐकण्यास योग्य आहे ते तू ऐकू शकशील. तसेच ऐकलेल्या तत्त्वानुसार तुझ्यात वैराग्य
भावना निर्माण होईल, त्याप्रमाणे
तू आचरण करू शकशील. आता तर जे ऐकण्यास योग्य आहे ते तू ऐकू शकत नाहीस मग आचरण
करण्याचा तर प्रश्न नाही. तेव्हा ही योग्यता केव्हा प्राप्त होईल हे सांगताना
श्रीकृष्ण म्हणतात
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा
स्वास्थति निकला।
समापावचला बुद्धिस्तदा
योगमवाफ्यसि ।।५३।।
अनेक प्रकारच्या
वेदवाक्यांमुळे व वेदातील कर्मफलांच्या श्रवणामुळे विचलित झालेली चंचल झालेली तुझी
बुद्धी जेव्हा निश्चल होऊन परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी समाधिसुखाच्या ठिकाणी स्थिर
होईल तेव्हा तुला बुद्धियोगाची प्राप्ती होईल. ज्याला अनामय परमपद' म्हणतात तो समत्व स्थिती तुला प्राप्त होईल. हीच योगातील
परम स्थिती आहे आणि हीच अप्राप्याची प्राप्ती आहे. वेदांपासून ज्ञान तर प्राप्त
होतेच;
परंतु श्रीकृष्ण म्हणतात मुतिषिप्रतिपन्ना वेदांतील अनेक
सिद्धांत कर्मफले ऐकून बुद्धी विचलित होते. सिद्धांत तर अनेकजण ऐकतात, पण जे ऐकणे योग्य आहे ते मात्र लोक ऐकत नाहीत.
अशी ही चंचल बुद्धी जेव्हा
समाधिसुखाच्या ठिकाणी स्थिर होईल तेव्हा असे अमृत पद प्राप्त होईल. श्रीकृष्णाच्या
या बोलण्याने अर्जुनाची जिज्ञासा जागृत होणे स्वाभाविक होते. समाधिसुखाची प्राप्ती
करून घेणारे महापुरुष कसे असतात? त्यांची
बुद्धी स्थिर असते म्हणजे कशी असते? स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचे? अर्जुनाच्या मनात अशी जिज्ञासा निर्माण झाली म्हणून त्याने
केला अर्जुन उवाच
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्वस्य केशव स्थिती किं प्रभाषत किमासीत प्रजेत किम् ॥५४॥
'समाधीयते चित्तम् यस्मिन् स आत्मा एव समाधिज्या ठिकाणी
चित्ताला निरंतर समाधान प्राप्त होते तो आत्मा म्हणजेच समाधी होय. अनादि
तत्त्वामध्ये जो समत्व प्राप्त करतो, समत्व बुद्धिने वागतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. अर्जुन
म्हणाला,
हे केशवा समाधिस्थितीत असणाऱ्या स्थिर बुद्धी असणाऱ्या
महापुरुषाची काय लक्षणे आहेत? स्थितप्रज्ञ
पुरुष कसा बोलतो? तो कसा
बसतो?
तो कसा चालतो? अर्जुनाने हे चार प्रश्न विचारले त्यावर स्थितप्रज्ञाची
लक्षणे सांगताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात
श्रीभगवानुवाच
प्रजाति यदा
कामान्सर्वान्या मनोगतान् । आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रशस्तदोच्यते ।।५५।।
हे पार्था, मनुष्य जेव्हा मनामध्ये असलेल्या सर्व इच्छांचा त्याग करून
तो आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकणी संतुष्ट असतो, अशा व्यक्तीला स्थित असे म्हणतात. सर्व वासनांचा त्याग
केल्यानंतरच आत्म्याचे दर्शन होते, अशा स्थिर बुद्धीच्या पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात.
मनामध्ये असलेल्या इच्छांचा त्याग केल्यानंतरच आत्याचा साक्षात्कार होत असतो. अशा
आत्माराम,
आत्मतृष्ठ महापरूपाला स्थितप्रज्ञ म्हणतात.
दुःखेनुमनाः सुखेषु विगतः
दैहिक, दैविक व भौतिक दुःखानी ज्याचे मन विषण्ण होत नाही, मुखे प्राप्त झाली असता जो त्यांच्याविषयी निरिच्छ असतो व
ज्यांचे मोह, भय, क्रोध हे नष्ट झालेले असतात, मानसिक तर्क करण्याचा टप्पा ज्याने ओलांडलेला असतो, अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ मुनी म्हणावे स्थितप्रज्ञाची अन्य
लक्षणे सांगताना श्रीकृष्णा म्हणतात.
यः सर्वज्ञान
मिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिनन्दति नष्ट तस्य
प्रज्ञा प्रतिष्ठिता । ।५७।।
जो पुरुष सर्वत्र स्नेहरहित
झालेला असतो म्हणजे जो सर्व गोष्टीत असत असतो, शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद
होत नाही त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. जे परमात्मस्वरूप आहे. जे मनाला
परमात्म्याची आस लावते, ते शुभ
आणि जे जड प्रकृतीकडे नेते,
मनाला आसक्त करते ते अशुभ
आहे असे समजावे. परंतु स्थितप्रज्ञ पुरुष मात्र सानुकूल परिस्थितीने ना प्रसन्न
होतो,
ना प्रतिकूल परिस्थितीने तो विषण्ण बनतो. कारण प्राप्त
होणाऱ्या वस्तू त्याला स्वतःपेक्षा मित्र वाटत नाहीत. कारण त्याविषयी तो संपूर्ण
निरीच्छ झालेला असतो; तर पतित
करणारे विकारही त्याला विचलित करु शकत नाहीत. म्हणजेच साधनेचे त्याला आता काही
प्रयोजन उरलेले नसते. अशा व्यक्तीलाच स्थितप्रज्ञ म्हणतात.
इन्द्रियाणीन्द्रयार्थेभ्यस्तस्य
प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।५८||
ज्याप्रकारे कासव आपल्या
अवयवांना आवरून घेवू शकते त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ व्यक्ती स्थिर असल्यामुळे
आपल्या चंचल इंद्रियांना सर्व बाजूंनी आवरून घेवू शकते. पुढे धोका दिसताच, संकट दिसताच कासव ज्याप्रमाणे आपले डोके व पाय वरून घेते; त्या प्रकारे तो पुरुष विषयांमध्ये आसक्त होणाऱ्या आपल्या
इंद्रियांना सर्व बाजूंनी आवरून घेऊन आपल्या हृदयरूपी देशात त्यांना बंदिस्त करून
ठेवतो. त्यावेळी त्याची बुद्धी स्थिर असते. परंतु कासवाचे येथे फक्त उदाहरण आहे.
कारण संकट टळताच कासव आपली इंदिये पुन्हा पसरून असते. मग स्थितप्रज्ञ महापुरुष
पुन्हा विषयात आसक्त होतो का? यावर
श्रीकृष्ण म्हणतात
विषमा विनिवर्तन्ते
निराहारस्य देहिनः ।
विषयांपासून इंदियांचा
निग्रह करणाऱ्या पुरुषाचे विषय निवृत्त होतात. कारण त्या विषयांचे तो ग्रहण करीत
नाहीत. परंतु त्याची विषय असणारी गोडी मात्र नाहीशी होत नाही. ती मनात चळवळत असते.
पण विषयांपासून सर्व इंदियांना आवरू घेणाऱ्या निष्कामी पुरुषाला परंतुष्टवा परमतत
परमात्म्याचा साक्षात्कार होताच ही त्याची गोडीही नाहीशी होते.
महापुरुष कासवाप्रमाणे
आपल्या इंदियांना आवरून पुन्हा पसरतात. एकदा इंद्रियांना घेतले की त्याची
प्रवृत्तीच तेथे संपते, संस्कार
संपतात. पुन्हा ते उद्भवत नाहीत. निष्काम कर्मयोगाच्या आचरणद्वारा परमात्म्याच्या
परम साक्षात्काराबरोबरच त्या पुरुषाची असणारीओढ नष्ट होत असते. साधारणतः
ध्यानमार्गावर मार्गस्थ असणारा साधक हठयोगाने इंद्रियांचा निग्रह करून तो
विषयांपासून निवृत्त होत असतो; परंतु
त्याच्या मनामध्ये त्याचे चिंतन सुरू असते. ही त्याची विषयांबद्दलची आसक्ती 'परंतुष्टवा' परमेश्वराच्या साक्षात्कारानंतर नाहीशी . त्यापूर्वी ती
नाहीशी होत नाही.
'पूज्य महाराज' या संबंधीची स्वतःच्या जीवनात घडलेली एक गोष्ट सांगत असत.
गृह त्याग करण्यापूर्वी तीन वेळा आकाशवाणी झाली होती. आम्ही विचारले-"महाराज, आपल्यासाठी आकाशवाणी का झाली? आमच्यासाठी कधी झाली नाही." तेव्हा महाराज उत्तरले 'हो! ई शंका मो के भई रही' म्हणजे माझ्याही मनात ही शंका आली होती. मग मला प्रत्यंतर
आल्यावर समजले की गेल्या सात जन्मापासून मी साधूच आहे. पहिल्या चार जन्मांत तर मी
फक्त साधूचा वेष धारण केला होता. कपाळावर टिळा लावून, अंगाला विभूती फासून, हातात कमंडलू घेवून मी भ्रमण करीत असे. योगक्रियेची मला
काहीच माहिती नव्हती. परंतु गेल्या तीन जन्मापासून साधू जसा असायला हवा तसा मी
साधू आहे. माझ्यात योगक्रिया जागृत होती. गेल्या जन्मापासून मन भवसागर पार होऊ
लागले होते. विषयांबद्दलची आसक्ती नष्ट होऊ लागली होती. परंतु दोन इच्छा मनात
जागृत होत्या स्त्री व गांजा यांचा उपभोग घेण्याची इच्छा अतृप्त राहिली होती.
म्हणून मला जन्म घ्यायला लागला. जन्म घेतल्यानंतर थोड्या दिवसांनी देवाने माझ्या अतृप्त
इच्छा पूर्ण करून मला निवृत केले. दोन-तीनदा इच्छित गोष्टीचा स्वाद चाखायला दिला
आणि मग मला साधू बनवून टाकले.
हीच गोष्ट येथे श्रीकृष्ण
सांगतात की, इंद्रियांच्याद्वारे
विषयभोग ग्रहण न करणारे पुरुषसुद्धा विषयांपासून निवृत्त होतात; परंतु साधनेद्वारा परम पुरुष परमात्म्याचा साक्षात्कार करून
घेतल्यानंतर विषयांचायत मनात असणारी ओढ नाहीशी होते व म्हणून जोपर्यंत त्या
परमेश्वराचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत 'कर्म' करावे
लागते.
ठर का प्रथम वासना रही ।
प्रभु पद प्रीति सरित सो
वही ।।
(रामचरितमानस, ५४८/६)
इंद्रियांना विषयांपासून
परावृत करणे, आवरून घेणे कठीण आहे
याबाबत
श्रीकृष्ण म्हणतात
इन्द्रियाणि प्रमाचीनि
हरन्ति प्रसभं मनः ||६०||
हे अर्जुना, बुद्धी स्थिर होण्यासाठी निग्रहाने प्रयत्न करीत असलेल्या
विवेकी,
ज्ञानी पुरषांच्या मनालाही ती उच्छृंखल इंद्रिये जबरदस्तीने
ओढून नेतात तेव्हा त्यासाठी
तानि सर्वाणि संयम्य मुक्त
आसीत् मत्परः ।
यशे हि यस्येन्द्रियाणि
तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ||६१।।
अर्जुना, इंद्रियांचे दमन करून, योगयुक्त होऊन, चित्त माझ्या ठिकाणी समपर्ण करून तू मला शरण ये, कारण ज्या पुरुषांची इंदिये त्याच्या स्वाधीन असतात त्याची
बुद्धी स्थिर आहे असे समज, या ठिकाणी
योगेश्वर कृष्ण योगसाधनेत अडसररूप ठरणाऱ्या इंदियांचा निषेध करीत साधनेच्या विधायक
पैलूवर भर देत आहेत. केवळ संयम व निषेध करून इंद्रिये संपूर्ण स्वाधीन राहत नाहीत, ती संपूर्ण वश होत नाहीत व म्हणून समर्पणाबरोबर त्या
परमेश्वराचे इष्ट-चिंतनसुद्धा अत्यंत अनिवार्य आहे. इष्ट चिंतन नसेल तर मनात
विषयांचे चिंतन केले जाईल व त्याचे दुष्परिणाम काय होतात ते श्रीकृष्णांच्याच
शब्दात पाहू.
ध्यायतो विषयान्पुंसः
सगस्तेषूपजायते।
संगात्संजायते कामः
कामाकोषोऽभिजायते।।६२।।
विषयांचे चिंतन करणाऱ्या
पुरुषाला विषयाविषयी आसक्ती निर्माण होते. आसक्तीमुळे काम निर्माण होतो. व
कामपूर्ती मध्ये जर काही व्यवधान आले, अडचण निर्माण झाली तर क्रोध निर्माण होतो. आता हा क्रोध
कोणाला जन्म देतो.
क्रोधाद् भवति सम्मोहः
सम्मोहात् स्मृतिविधमः। क्रोधामुळे विवेकाची कास सुटून जाते. तेथे अविवेक निर्माण
होतो. नित्य अनित्य वस्तूचा विचार राहत नाही. कार्याविषयीचा विवेक राहत नाही.
संमोह निर्माण होतो. या संमोहापासून अविवेकापासून स्मृतिभ्रंश होतो. विस्मरण होते.
(जसे अर्जुनाला झाले 'भ्रमतीव च
मे मनः। काय करू आणि काय नको याचा मी निर्णय घेऊ शकत नाही) विस्मरणाने, स्मृती भ्रमिष्ट होण्याने योग-परायण बुद्धी नष्ट होते आणि
बुद्धिनाश झाल्याने त्या पुरुषाच्या सर्वस्वाचा नाश होतो.
येथे श्रीकृष्णांनी
विषयांचे चिंतन करू नये यावर भर दिला आहे. साधकाने ईश्वराच्या नामरूपाचे, त्याच्या लीलांचे, ईश्वरधामाचे सतत चिंतन केले पाहिजे. आपले मन-बुद्धी
त्याच्या ठिकाणीच समर्पित केली पाहिजे. जर ईश्वरसाधनेत टाळाटाळ केली, आळस केला तर चंचल मन पुन्हा विषयांकडे खेचले जाईल. या
विषयांच्या चिंतनाने त्यांच्याविषयी पुन्हा आसक्ती निर्माण होईल. आसक्तीमुळे त्या
विषयाची कामना साधकाच्या अंतर्मनात उत्पन्न होईल. या कामनापूर्तीमध्ये काही विघ्न, काही अडचण निर्माण झाली तर मग क्रोध निर्माण होईल.
क्रोधापासून अविचार, अविचारापासून
स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशापासून बुद्धी नष्ट होते. निष्काम कर्मयोगालाच
बुद्धियोग असे म्हटले जाते. कारण मनात अभिलाषा निर्माण होऊ नये, फलाची अपेक्षा ठेवू नये, अभिलाषा निर्माण झाल्यानेच बुद्धियोग नष्ट होतो; या सर्व गोष्टींचा विचार बुद्धीच्या पातळीवर करावयाचा असतो-
'साधन करिय विचारहीन मन शुद्ध होय नहि तैसे। (विनयपत्रिका, पद संख्या ११५/३) म्हणून विवेक असणे अत्यंत आवश्यक आहे.
कारण विचारहीन पुरुष श्रेय साधनापासून भ्रष्ट होतो, त्याच्या सर्वस्वाचा नाश होतो.
विषयाभिमुख साधकाची अशी
अवस्था होत असते, परंतु
ज्याची इंद्रिये त्याच्या पुर्ण ताब्यात असतात त्यांना कोणती गती प्राप्त होते हे
सांगताना श्रीकृष्ण म्हणतात
रागद्वेववियुक्तैस्तु
विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैविधेयात्मा प्रसादमधिगच्छति ।।६४।।
राग द्वेषरहित व पूर्णपणे
स्वाधीन असलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेणारा व ज्याचे मन त्याच्या पुर्णपणे
स्वाधीन आहे असा आत्मानंदात तल्लीन असणाऱ्या व शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहणाऱ्या
पुरुषाला मनाची प्रसन्नता प्राप्त होते. अशा महापुरुषाला कशाचाच विधि-निषेध असत
नाही. त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट अशुभ असत नाही की, जिच्यापासून त्याने स्वतःचा बचाव
करावा किंवा ज्या गोष्टीची
त्याने अभिलाषा घरावी, अशी काही
शुभ गोष्टही त्याच्यासाठी असत नाही.
प्रसादे सर्वदुः खानां
हानिरस्योपजायते । प्रसन्नचेतसो प्राशु बुद्धिः पर्यषतिष्ठते ।।१५।।
भगवतस्वरूप झालेल्या
पुरुषाचे चित्त प्रसन्न झाले असता त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो. दुःखालचम अशात
त्याला संसार असार वाटतो तुच्छा वाटतो आणि मग प्रसन्न चित्त पुरुषाची बुद्धी
परमात्मस्वरूपी लवकर स्थिर होते. परंतु जो योगमुक्त असत नाही, त्याचे वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणतात
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न
आयुक्तस्य भावना।
न चाभावयतः शान्तिरशान्तस्य
कुतः सुखम् ।। ६६
योग-साधनरहित पुरुषाच्या
अंत:करणात निष्काम कर्मयुक्त बुद्धी असत नाही. त्याच्या अंतःकरणात भाव असत नाही.
म्हणजे त्याचे मन आत्मस्वरूपी स्थिर असत नाही. जो असा भावनारहित आहे अशा पुरुषाला
शांती कोठून मिळणार? आणि जो
अशांत आहे. शांतिरहित आहे त्याला सुख कोठून प्राप्त होणार? योगसाधना केल्याने काही प्रत्यंतर आल्यानंतरच स्थिर
बुद्धिची इच्छा निर्माण होते. 'जाने
बिनु न होई परतीति भावनेशिवाय शांती मिळत नाही व शांतिरहित पुरुषाला सुखाची अर्थात
शाश्वत सनातनची प्राप्ती होत नाही.
इन्द्रियाणां हि चरतां
यन्मनोऽनुविधीयते । तदस्य हरति प्रज्ञा वायुनावमिवाम्मसि ।।६७।।
ज्याप्रमाणे सोसाट्याच्या
वाऱ्याने पाण्यातील नाव भलतीकडेच ओढून नेली जाते, त्याप्रमाणेच विषयांच्या मागे धावणाऱ्या इंद्रियांपैकी ज्या
इंदियाबरोबर मन राहते ते एक इंदिय जरी स्वतःची तृप्ती करण्यात गुंतले असले तरी
बुद्धीला हरण करते. म्हणून साधकाने योगाचे आचरण अवश्य करावे.
आचरणावर भर देताना
श्रीकृष्ण म्हणतात
तस्माद्यस्य महाबाहो
निगृहीतानि सर्वशः । इन्द्रियाणीन्द्रयार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता
।।१८।।तेव्हा हे माहाबाहो अर्जुना, इंद्रियांच्या विषयांपासून ज्याची इंद्रिये सर्व बाजूंनी
आवरून घरलेली असतात, त्याची
बुद्धी स्थिर आहे असे समजावे. येथे'बाहू' हे
कार्यक्षेत्राचे पराक्रमाचे प्रतीक आहे. परमेश्वराला 'महाबाहू' तसेच
'अजानुबाहू' असे
म्हंटले आहे; पण ईश्वर
हातापायांशिवाय सर्वत्र संचार करीत असतो. जो ईश्वरस्वरूप बनतो, त्यालाही महाबाहू असेच म्हटले जाते. म्हणून येथे कृष्णाला व
अर्जुनाला दोघांनाही महाबाहू म्हटले आहे.
या निशा सर्वभूतानां तस्यां
जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ||६९।।
सर्व प्राणिमात्रांसाठी तो
परमात्मा रात्रीप्रमाणे आहे. कारण तो दिसत नाही, तेथे विचार काम करीत नाही म्हणून तो रात्र-सदृश आहे. त्या
निशारूप परमात्म्यामध्ये संयमी पुरुष चांगल्याप्रकारे चालू शकतो, पाहू शकतो, जगू
शकतो कारण तेथे त्याची पकड असते. योगी पुरुष इंद्रियांचे नियमन करुन त्या संयमाद्वारे
त्याच्या ठिकाणी प्रवेश मिळवतो. ज्या नश्वर सांसारिक सुखभोगासाठी सर्व प्राणी
रात्रंदिवस परिश्रम करतात तीच योग्यांसाठी रात्र असते.
रमा विलासु राम अनुरागी ।
तजत बमन जिमि जन बड़भागी ।।
(रामचरितमानस, २/३२३/८)
जो योगी परमार्थ मार्गात
निरंतर दक्ष आणि भौतिक इच्छांमध्ये संपूर्णपणे निःस्पृह असतो तोच परमेश्वरस्वरूप
होऊ शकतो. तो या जगात राहत असला तरी येथील भौतिक पाश त्याला बद्ध करू शकत नाहीत.
महापुरुषाच्या आचरणाचे वर्णन करताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठ
समुद्रमापः प्रविशन्ति यत्
तत्कामा में प्रविशन्ति
सर्वे
स शान्तिमाप्नोति न कामकामी
।।७०।।
ज्याप्रमाणे पाण्याने
परिपूर्ण असलेल्या समुद्रात नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी वेगात प्रवेश करते; पण समुद्रावर परिणाम होतनाही, त्याच प्रकारे परमात्मस्वरूपी स्थिर असणाऱ्या स्थितप्रज्ञ
पुरुषामध्ये सर्व विकार त्याची शांती विचलित न
करता प्रवेश करतात. अशा
पुरुषाला परमशांती प्राप्त होत असते. विषयभोगांची अभिलाषा राखणाऱ्याला अशा
प्रकारची शांती प्राप्त होत नाही. भयंकर वेगाने सुसाट वाहणाऱ्या नद्या शेते नष्ट
करीत,
अनेकांचा बळी
घेत, गावे बुडवीत हाहाकार माजवीत, अत्यंत वेगाने समुदात प्रवेश करतात, परंतु त्यामुळे समुद्राला भरती येत नाही किंवा तो क्षुब्ध
होत नाही. तसेच उन्हाळयात नद्या आटून गेल्याने समुद्रात त्यांचे पाणी न येण्याने
समुदाला ओहटी लागत नाही. त्या प्रकारे स्थितप्रज्ञ मनुष्याचे मन विषयभोगांनी
क्षुब्ध होत नाही, उलट ते
भोग त्याच्या मनात सामावून जातात. ते त्याच्या मनात चांगला किंवा वाईट कोणत्याच
भावना निर्माण करू शकत नाहीत. कारण योगयुक्त पुरुषाचे कर्म' अशुक्ल' आणि
'अकृष्ण' असते.
ज्या चित्तावर संस्कार होतात ते चित्तव परमात्मस्वरूप झालेले असते. मग आता
संस्कारक्षम उरले काय? केवळ या
एकाच श्लोकात श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या अनेक प्रश्नांचे उत्तर दिले आहे.
स्थितप्रज्ञ महापुरुषाचे लक्षण कोणते? तो कसा बोलतो? तो कसा चालतो? या सर्व गोष्टी अर्जुनाला जाणून घ्यायचा होत्या. तेव्हा
ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर श्रीकृष्णांनी येथे एका शब्दात दिले आहे. स्थितप्रज्ञ
महापुरुष समुदासारखा असतो. अशाप्रकारे बसावे किंवा अशा प्रकारेच चालावे असा कसलाच
विधीनिषेध त्याला नसतो. समुद्रवत तो संयमी असल्याने परमशान्ती त्याला प्राप्त
होते. विषयभोगांची लालसा ठेवणान्याला अशा प्रकारची शांती प्राप्त होत नाही. यावर
भर देत श्रीकृष्ण म्हणतात
विहाय कामान्यः सर्वान्
पुमांझरति निःस्पृहः। निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ।।७१।।
जो पुरुष सर्व इच्छांचा
त्याग करून ममत्वशून्य, निराभिमानी
व निरीच्छ होऊन आचरण करीत असतो, वागत
असतो त्यालाच परमानंद देणारी परमशांती प्राप्त होते. यानंतर त्याला काहीही प्राप्त
करण्याचे बाकी राहत नाहीत. एवा ब्राही स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विति ||३८ ।।
स्थित्वास्यामन्त-कालेऽपि ब्रह्मानिर्वाणमृच्छति ।।७२।।
पार्था ही उपरोक्त अवस्था म्हणजेच ब्राह्मी स्थिती
आहे. समुद्रवत् असणाऱ्या महापुरुषामध्ये विषय नदीप्रमाणे परमात्मदर्शी असतो. अहं
ब्रह्मास्मि' असे नुसते म्हणण्याने
ही स्थिती प्राप्त होत नाही. साधना करूनचही स्थिती प्राप्त केली जाते. असा
महापुरुष अंतकाळीदेखील या अवस्थेत स्थिर होऊन बह्मानंदाप्रत पोहचतो.
काही लोकांचे असे म्हणणे
आहे की,
साधारणतः दुसऱ्या अध्यायातच गीता पूर्ण होते. परंतु जर केवळ
कर्माच्या उच्चारणाने जर कर्म पूर्ण होत असेल तर मग गीता इथे पूर्ण झाली म्हणता
येईल. या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णाने सांगितले आहे की अर्जुना निष्काम कर्मयोग
म्हणजे काय ते ऐक, तो समजून
घे. तो समजून घेतल्यावर तू संसार बंधनातून मुक्त होशील. कर्म करण्याचा तुला अधिकार
आहे,
पण फल घेण्याचा अधिकार तुला मुळीच नाही. कर्मामध्ये तू
अश्रद्ध असता कामा नये. ते करण्यास तू नेहमी तत्पर असला पाहिजेस. असे आचरण केलेस
तर 'परं दृष्टवां' परमपुरुषाचा तुला साक्षात्कार होईल व तू स्थितप्रज्ञ बनशील.
परमशान्ती तुला प्राप्त होईल. परंतु या अध्यायात कर्म म्हणजे काय? हे मात्र सांगितलेले नाही.
हा सांख्ययोग' नावाचा अध्याय नाही. हे नाव म्हणजे शास्त्रकारांची नव्हे पण
टीकाकारांची देणगी आहे. ते आपल्या बुद्धीला अनुसरून ग्रहण करीत असतात. मग आश्चर्य
कसले?
या अध्यायात कर्माचे श्रेष्ठत्व, ते कर्म करीत असताना घ्यावयाची दक्षता आणि स्थितप्रज्ञाची
लक्षणे सांगून श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनात कर्माबद्दल उत्कंठा जागृत केली आहे.
व त्याला सांगितले आहे की आत्मा शाश्वत आहे, सनातन आहे. त्याला तू जाण व तत्त्वदर्शी बन त्याच्या
प्राप्तीची दोन साधने आहेत 'ज्ञानयोग
आणि निष्काम कर्मयोग आपली योग्यता समजून, हानी व लाभाचा स्वतः निर्णय घेऊन कर्मात प्रवृत्त होणे
म्हणजे ज्ञानमार्ग आहे आणि परमेश्वरावर भार घालून स्वतःला त्याच्या ठायी समर्पित
करुन तेच कर्म करण्यास प्रवृत्त होणे हाच निष्काम कर्म मार्ग किंवा भक्ति मार्ग
आहे. गोस्वामी तुलसीदासांनी या दोन साधनांचे योगांचे चित्रण पुढील प्रमाणे केले
आहे.
मोरे प्रौढ तनय सम ग्यानी ।
बालक सुत सम दास अमानी ।
जनहि मोर बल निजबल ताही
दुहु कई काम क्रोध रिपु आही
।।
(रामचरितमानस, ३/४२/८-९)
माझे दोन प्रकारचे भक्त
आहेत. एक ज्ञानमार्गी व दुसरा भक्तिमार्गी. निष्काम कर्मयोगी किंवा भक्तिमार्गी
मला शरण येऊन माझा आश्रय घेतात तर ज्ञानयोगी आपल्या शक्तीचा अंदाज घेवून, आपल्या लाभहानीचा विचार करून ते आपल्या भरवशावर, आत्मविश्वासावर चालतात. दोघांचा शत्रू मात्र एकच असतो.
ज्ञानमार्गी भक्ताला काम-क्रोधादि शत्रूंवर विजय मिळवावा लागतो आणि जो कर्मयोगी
आहे त्यालाही या शत्रूशी सामना करावा लागतो. इच्छांचा त्याग दोघेही करतात आणि
दोन्ही मार्गात केले जाणारे कर्मही एकच असते. या कर्माच्या आचरणामुळे परमशान्ती
प्राप्त होते. तथापि श्रीकृष्णांनी कर्म म्हणजे काय हे अद्याप सांगितले नाही.
आपल्या समोरही कर्म म्हणजे काय हा प्रश्न उभा आहे. अर्जुनाच्या मनातही कर्माबद्दल
जिज्ञासा निर्माण झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या अध्यायाच्या आरम्भीच त्याने
कर्मविषयक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
ॐ तत्सदिति
श्रीमद्भगवद्गीतासुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसम्वादे 'कर्मजिज्ञासा' नाम द्वितीयोऽध्यायः ।।२।।
या प्रमाणे
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदातील बह्मविद्यांतर्गत
योगशास्त्रातील 'कर्म
जिज्ञासा'
म्हणजेच 'सांख्य
प्रकरण'
नावाचा दुसरा अध्याया समाप्त झाला!
इति श्रीमत्परमहंस
परमानन्दस्य शिष्य स्वामी अड़गड़ानन्दते श्रीमद्भगवद्गीतायाः 'यथार्थगीता' भाष्ये 'कर्मजिज्ञासा' नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥
या प्रकारे श्रीमत्परमहंस
परमानंद स्वामीचे शिष्य अड़गड़ानन्दकृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य' यथार्थ गीते' मधील 'कर्म
जिज्ञास'
नावाचा दुसरा अध्याय पुर्ण होत आहे.
।। हरिः ॐ तत्सत् ।।
x